डॉ. आशीष थत्ते ashishpthatte@gmail.com

अर्थशास्त्रासारख्या सामाजिक शास्त्रातील संकल्पनांचा सर्वसामान्यांकडून होत असलेल्या वापराचे भान करून देणारे साप्ताहिक सदर..

Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
All information about OpenAI GPT 4 Vision in marathi
प्रतिमा, मजकूर आणि ध्वनी अशा तिन्ही गोष्टींवर करणार प्रक्रिया; GPT- 4 Vision नक्की काय आहे?
Addicted to junk food and can’t seem to stop Here’s how to overcome it
तुम्हाला जंक फूड खाण्याचे व्यसन आहे का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या कशी सोडावी ही वाईट सवय
Before blaming diabetes drugs understand What chemicals are used in medicines
मधुमेहावरल्या औषधांना दोष देण्याआधी समजून तरी घ्या…

काही सोप्या संकल्पनांनिशी सुरुवात करूया. व्यवस्थापनात, विशेषत: उत्पादन व्यवस्थापनात, स्तर पुनक्र्रमित करण्याबाबत काही नियम आहेत. जसे की, काही विशिष्ट माल साठा शिल्लक राहिला की पुन्हा उत्पादनाला लागणारे साहित्य मागवून घेणे. हा साठा किती असावा याचे ठोकताळे मात्र प्रत्येक कंपनीनुसार बदलतात.

ही संकल्पना तशी सोपी पण अमलात आणायला खूपच कठीण. पण आपल्या घरात गृहिणींना मात्र ते सांगावे लागत नाही किंवा त्यांना याचा कागदोपत्री हिशेबदेखील ठेवावा लागत नाही. सोपा विचार करा की चहा व साखर असे पदार्थ कधी घरात संपलेले आहेत आणि आता चहा करायला चहा पावडर शिल्लकच नाही असे कधी झाले आहे का हो? मसाले, धान्य, पिठे आणि हो अगदी मॅगी नूडल्ससुद्धा स्तर पुनक्र्रमित करण्याचा पातळीवर पोहोचताच पुन्हा एकदा मागवून घेतले जाते. काही काळापूर्वी इंटरनेटचा डेटा पॅक वेळोवेळी पुनक्र्रमित केला की पुढची काळजी मिटली असे असायचे. आता कंपन्यांनी डेटा पॅकचे वर्गीकरण नाशवंत नसल्याचे बघून आजीवन अमर्यादित अशा ऑफर आणल्यात. बिचारे चहा साखर मात्र नाशवंत असल्यामुळे त्यांचा पुनक्र्रमित स्तर निर्धारित करावा लागतो

घरात छोटय़ा पातळीवर करणे तसे सोपे पण मोठय़ा उलाढालीच्या कंपन्यांना ही प्रक्रिया चोख आणि औपचारिक ठेवावी लागते. एखाद्या वेळेला घरात चहा नाही मिळाला तर चालेल पण उत्पादनाची साधने, जशी मोठी यंत्रे, रिकामी ठेऊन चालत नाहीत. सामान्यत: औषधे या सदरात मोडतात की त्यांचा स्तर विशिष्ठ पातळीला पुनक्र्रमित करावाच लागतो.     

उत्साही तरुण मंडळी व सामान्य माणसेसुद्धा आपल्या ऊर्जा पातळीचा स्तर पुनक्र्रमित करून घेतात. जसे गड डोंगरांवर फिरायला जाणे, गाणी ऐकणे, बाहेरगावी सहल काढणे वगैरे. हे सगळे आपण अजाणतेपणे करतो पण व्यस्थापनशास्त्रात त्यामागे एक गृहीतक आहे व त्याचे किचकट हिशोब ठेवावे लागतात. 

व्यवस्थापनातल्या अशा नियमाप्रमाणे आपणही रोजच्या जीवनात थोडासा विचार करून सर्व गोष्टींची पातळी पुनक्र्रमित करण्याच्या स्तरावर पोहोचलो की ती वस्तू हळूहळू भरून घ्यावी. या संकल्पनेचा थोडा विचार केला तर आपल्याला आपलेच कळून चुकेल की केव्हा पातळी पुनक्र्रमित करायची असते मग ती वस्तूंची, ऊर्जेची, पैशांची किंवा अगदी विचारांचीसुद्धा.

लेखक कॉस्ट अँड मॅनेजमेण्ट अकाउंटंट म्हणून कार्यरत