अजय वाळिंबे

सोमाणी सिरॅमिक्सची सुरुवात एच. एल. सोमाणी यांनी सुमारे पन्नास वर्षांपूर्वी म्हणजे १९६९ मध्ये केली होती. गेल्या पाच दशकांमध्ये, सजावटीच्या बदलत्या सौंदर्यशास्त्र आणि नवप्रवाहांसह उत्पादने विकसित करण्याच्या क्षमतेच्या आधारे आज सोमाणी सिरॅमिक्सने भारतीय सिरॅमिक उद्योगात एक आघाडीची कंपनी म्हणून नाव प्राप्त केले आहे. कंपनीकडे सिरॅमिक वॉल आणि फ्लोअर टाइल्स, पॉलिश्ड व्हिट्रिफाइड टाइल्स आणि ग्लेझ्ड व्हिट्रिफाइड टाइल्सपासून सॅनिटरीवेअर आणि बाथ फिटिंग्सपर्यंत एक संपूर्ण डेकोर सोल्युशन्स/ विविध उत्पादनांचा पोर्टफोलिओ आहे. कंपनीचे प्रमुख उत्पादन टाइल्सचे असून, विविध प्रकारच्या व्हिट्रिफाइड आणि सिरॅमिक टाइल्सच्या विक्रीतून कंपनी सुमारे ८८ टक्के कमाई करते, तर कंपनीच्या कमाईत बाथवेअरचा वाटा सुमारे १२ टक्के आहे.

mumbai ramabai ambedkar nagar zopu marathi news
रमाबाई आंबेडकर नगर पुर्नविकास : ‘झोपु’चे सर्वेक्षण अंतिम टप्प्यात, पुढील आठवड्यात १६८४ रहिवाशांची प्रारूप यादी प्रसिद्ध करणार
Portfolio, Stock Market, knr constructions Limited Company, knr constructions Limited share, share market, road construction, bridge construction, construction of irrigation projects, Hybrid Annuity Model, BOT,EPC, knr road construction, knr constructions company share,
माझा पोर्टफोलिओ – कामगिरी उजवी, ताळेबंदही सशक्त! केएनआर कन्स्ट्रकशन लिमिटेड
easy trip planners limited, company share, stock market, share market, portfolio, share market portfolio, stock market portfolio, easemytrip, trip planning company, holiday planning company, holiday packages, trip planning service, airline ticket service, finance article,
माझा पोर्टफोलियो : प्रवास सोपा नाही म्हणून!
Vartaknagar Police Colony
प्रकल्प खर्च वसुलीसाठी गृहबांधणीऐवजी भूखंडविक्री, वर्तकनगर पोलीस वसाहत पुनर्विकास; ४०० कोटी अपेक्षित

कंपनीचे संपूर्ण देशभरात ११ उत्पादन प्रकल्प कार्यरत असून विस्तृत वितरण जाळे फैलावले आहे. यामध्ये गुजरातमधील कडी  आणि हरियाणातील कासार येथे प्रमुख उत्पादन प्रकल्प असून, इतरत्र संयुक्त प्रकल्प आहेत, ज्याची एकूण उत्पादन क्षमता वार्षिक ६० दशलक्ष चौरस मीटर आहे. कंपनीचे ८,०००  पेक्षा जास्त टच-पॉइंट्सचे मजबूत वितरण जाळे आहे ज्यात २००० सक्रिय डीलर्स, ६००० सब डीलर्स आणि भारतातील राज्यांमध्ये ३३० शोरूम /डिस्प्ले सेंटर आहेत. उत्तर भारतीय क्षेत्र ही कंपनीसाठी सर्वात मजबूत बाजारपेठ आहे. कंपनीच्या एकूण उलाढालीपैकी सुमारे ४३ टक्के महसूल केवळ उत्तर प्रदेशचा आहे.

मार्च २०२२ साठी संपलेल्या तिमाहीसाठी कंपनीची कामगिरी निराशाजनक आहे. कंपनीने या कालावधीत ६१६ कोटी रुपयांच्या उलाढालीवर १७ कोटी (गेल्या वर्षीच्या तिमाहीत ३१ कोटी) रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. मात्र गेल्या आर्थिक वर्षांच्या तुलनेत कंपनीने २०२२ साठी उलाढालीत २७ टक्के वाढ नोंदवून ती २,०९४ कोटी रुपयांवर गेली आहे तर नक्त नफ्यात जवळपास ५१ टक्के वाढ होऊन तो ५८ कोटींवरून ८९ कोटींवर गेला आहे.

स्वस्त गृह-कर्ज, पंतप्रधान आवास योजनांमधून गृहनिर्माण क्षेत्राला प्रोत्साहन, तसेच घरांची वाढती मागणी पाहता, आगामी कालावधीत कंपनीच्या उत्पादनांना वाढती मागणी राहील अशी अपेक्षा असून, परिणामी आर्थिक कामगिरीत भरीव सुधारणा होईल. सध्या सुमारे ५९० रुपयांना उपलब्ध असलेला हा शेअर मध्यम कालावधीसाठी लाभदायी गुंतवणूक ठरू शकेल.

सध्याची शेअर बाजारातील अनिश्चितता पाहता प्रत्येक मंदीत तसेच टप्प्या टप्प्याने शेअर खरेदीचे धोरण ठेवावे.

सोमाणी सिरॅमिक्स लिमिटेड

(बीएसई कोड – ५३१५४८)

शुक्रवारचा बंद भाव :          रु. ५९४/-

वर्षभरातील उच्चांक/ नीचांक :     रु. १,२९३ / ९५७

बाजार भांडवल :

रु. २,५११ कोटी

भरणा झालेले भागभांडवल : रु. ८.४९ कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक                   ५४.७८ 

परदेशी गुंतवणूकदार            २.५२

बँक/ म्यु. फंड / सरकार       २०.२०

इतर/ जनता                 २२.५०

संक्षिप्त विवरण

* शेअर गट           :      स्मॉल-मायक्रो कॅप

* प्रवर्तक         :          एच. एल. सोमाणी

* व्यवसाय क्षेत्र :            सिरॅमिक टाइल्स, बाथ फिटिंग्स

* पुस्तकी मूल्य :            रु. १७१

* दर्शनी मूल्य         :      रु. २/-

* गतवर्षीचा लाभांश :         १२० %

शेअर शिफारशीचे निकष

*  प्रति समभाग उत्पन्न :      रु. २०.९

*  पी/ई गुणोत्तर:            २८.३ 

*  समग्र पी/ई गुणोत्तर :       ३१.८

*  डेट इक्विटी गुणोत्तर :      ०.७५

*  इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर :   ५.२६

*  रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉइड : १३.१

*  बीटा :                 ०.९१ 

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यापेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.