आशीष ठाकूर ashishthakur1966@gmail.com

जे हजार शब्दांतून व्यक्त होऊ शकत नाही ते एका चित्रातून व्यक्त होते असे नेहमीच एखाद्या उत्कृष्ट चित्राबद्दल बोलले जाते. तसेच काहीसे आमच्या ‘तांत्रिक विश्लेषण’ शास्त्राबद्दल आहे. आमचे शास्त्र हे गणितातील संख्याशास्त्र विभागात येते. आमच्याकडे शब्दापेक्षा गणिती आकडेमोड जास्त, पण या गणिताच्या क्लिष्ट आकडेमोडीत अडकून न पडता साध्या, सोप्या, खेळकर भाषेत बाजारात तेजी चालू असेल तर निफ्टी निर्देशांकाचे १८,१०० चे वरचे लक्ष्य, त्यानंतरच्या हलक्याफुलक्या घसरणीत निफ्टी निर्देशांक १७,५०० पर्यंत घसरू शकतो; तर अकल्पितपणे आलेल्या एचडीएफसी आणि एचडीएफसी बँकेच्या विलीनीकरणाच्या सुखद बातमीवर एचडीएफसी बँकेच्या समभागाचे वरचे लक्ष्य काय? आता या गाफील क्षणासाठीदेखील निकालपूर्व विश्लेषणातील कंपनीचा उत्कृष्ट निकाल आल्यास त्या सुखद बातमीवर १,६७० रुपयांचे वरचे लक्ष्य नमूद केलेले त्याचा आधार घेत, तो ध्यानीमनी नसलेला गाफील क्षणदेखील आनंदात साजरा केला. अशा भांडवली बाजारातील विविध संकल्पना, संज्ञा गणिती-संख्याशास्त्राचा आधार घेत मोजक्या शब्दात आमचे शास्त्र व्यक्त करीत असते. अशा मोजक्या शब्दात पण अचूकपणे व्यक्त होण्याच्या प्रक्रियेला पं. अभिषेकीबुवांच्या ‘शब्दांवाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले’ या अजरामर गीताचे बोल अगदी चपखल लागू पडतात. या पार्श्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळूया. 

बुधवारचा बंद भाव :

सेन्सेक्स : ५८,३३८.९३ / निफ्टी : १७,४७५.६५

निफ्टी निर्देशांकाने १८,१०० चा उच्चांक नोंदवत अपेक्षित असलेली १७,५०० पर्यंतची घसरण नोंदवली. येणाऱ्या दिवसांत निफ्टी निर्देशांकाने सातत्याने १७,३५० चा स्तर राखल्यास निर्देशांकाचे प्रथम वरचे लक्ष्य १७,७०० आणि द्वितीय लक्ष्य १७,९०० असे असेल.

निफ्टी निर्देशांकाला तेजीच्या नवीन दालनात प्रवेश करायचे असल्यास, निर्देशांकावर १८,१०० ते १८,३००चा भरभक्कम अडथळा असणार आहे. १८,३०० च्या पातळीवर निफ्टी निर्देशांक सातत्याने दहा दिवस टिकल्यास १८,६००, १८,९००, १९,२०० ही निफ्टी निर्देशांकाची वरची लक्ष्य असतील.

या तेजीच्या वाटचालीत निफ्टी निर्देशांक वांरवार १७,९०० पातळीवर अडखळत असेल आणि १७,००० चा स्तर राखण्यात अपयशी ठरल्यास निफ्टी निर्देशांक १६,५०० ते १५,८०० पर्यंत खाली घसरू शकतो.

निकालपूर्व विश्लेषण

माइंड ट्री लिमिटेड

तिमाही वित्तीय निकाल – सोमवार, १८ एप्रिल   

१३ एप्रिलचा बंद भाव – ४,०९७.१५ रु. 

निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर – ४,००० रु.

* उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ४,००० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ४,४०० रु., द्वितीय लक्ष्य ४,७०० रु.

* निराशादायक निकाल : ४,००० रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत ३,७०० रुपयांपर्यंत घसरण.

एंजलवन लिमिटेड

तिमाही वित्तीय निकाल – बुधवार, २० एप्रिल        

१३ एप्रिलचा बंद भाव – १,६८५.८५ रु.  

निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर – १,६०० रु.

* उत्कृष्ट निकाल : समभागाकडून १,६०० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य १,९०० रुपये, द्वितीय लक्ष्य २,१०० रुपये.

* निराशादायक निकाल : १,६०० रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत १,५०० रुपयांपर्यंत घसरण.

एचसीएल टेक्नॉलॉजीज लिमिटेड  

तिमाही वित्तीय निकाल – गुरुवार, २१ एप्रिल   

१३ एप्रिलचा बंद भाव – १,१२५.१० रु. 

निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर – १,१६० रु.

* उत्कृष्ट निकाल : समभागाकडून १,१६० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य १,२०० रुपये, द्वितीय लक्ष्य १,२५० रुपये.

* निराशादायक निकाल : १,१६० रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत १,०७० रुपयांपर्यंत घसरण.

एसीसी लिमिटेड

तिमाही वित्तीय निकाल – मंगळवार, १९ एप्रिल   

१३ एप्रिलचा बंद भाव – २,२०७.१५ रु. 

निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर – २,२०० रु.

* उत्कृष्ट निकाल : समभागाकडून २,२०० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य २,३५० रु., द्वितीय लक्ष्य २,५५० रु.

* निराशादायक निकाल : २,२०० रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत २,०५० रुपयांपर्यंत घसरण.

टाटा एलेक्सी लिमिटेड

तिमाही वित्तीय निकाल – बुधवार, २० एप्रिल   

१३ एप्रिलचा बंद भाव – ८,३८२ रु. 

निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर – ८,१५० रु.

* उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ८,१५० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ८,८०० रुपये, द्वितीय लक्ष्य ९,४०० रुपये.

* निराशादायक निकाल : ८,१५० रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत ७,५०० रुपयांपर्यंत घसरण.

अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’, इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

लेखक भांडवली बाजार विश्लेषक