बाजाराचा तंत्र-कल : का रे दुरावा, का रे अबोला

शुक्रवारचा बंद भाव : सेन्सेक्स : ५९,३०६.९३ / निफ्टी : १७,६७१.६५  

आशीष ठाकूर

समभागांच्या नफारूपी विक्रीसाठी उच्चांकाची आणि बाजार कोसळल्यावर नफ्यात विकलेल्या समभागांची स्वस्तात पुन्हा खरेदी करण्यासाठी नीचांक,असे दोन्ही स्तर अवगत करून घ्यायला हवेत. तरच गुंतवणूकदार म्हणून तुमची आर्थिक, मानसिक बैठक पक्की होऊ शकेल..

निफ्टी निर्देशांकावर नितांत सुंदर तेजी सुरू होती. या वेळेला निफ्टी २०,००० च्या उच्चांकाचा फटाका दिवाळीला फोडणारच आणि ही नयनरम्य आतषबाजी अल्पावधीत सर्वजण ‘याचि देही याची डोळा’ अनुभवणार, असे भासवले जात होते. असे असताना मध्येच का कुणास ठाऊक, इतके दिवस आर्थिक नकारात्मक घटनांचा ‘गालिच्याखाली लोटलेल्या कचऱ्याचा प्रश्न’ आत्ताच उकरून काढून तेजी खंडित का केली गेली? तेजी आणि निफ्टीमध्ये बेबनाव होऊन, प्रथम दोघांमध्ये दुरावा आणि नंतर अबोला निर्माण होऊन, तेजी निफ्टीला सोडून निघून गेली की काय? या प्रश्नांकडे वळण्यापूर्वी सरलेल्या आठवडय़ाच्या वाटचालीला पाहू या. 

शुक्रवारचा बंद भाव : सेन्सेक्स : ५९,३०६.९३ / निफ्टी : १७,६७१.६५  

या स्तंभातील ४ ऑक्टोबरच्या ‘मन धागा धागा जोडते नवा’ लेखात ‘गालिच्याखाली लोटलेल्या कचऱ्याचा’ ऊहापोह होता. विविध प्रश्न.. जसे आंतरराष्ट्रीय पटलावर इंधनाची, विजेची भीषण टंचाई निर्माण झाली आहे; ब्रिटनमध्ये पेट्रोल पंपावर इंधनाची टंचाई, ८० डॉलर प्रति पिंप झेपावलेले खनिज तेल, त्यात आमच्या अर्थव्यवस्थेने ५५ डॉलर प्रति पिंप हा दर गृहीत धरून केलेली आर्थिक गणिते. (५५ पुढे ८० डॉलपर्यंत होणारी वाढ ही पुढे अनियंत्रित वित्तीय तुटीला जन्म देते.) याचा थेट दृश्य परिणाम आपल्याकडे पेट्रोल पंपावर पेट्रोलचे दर शंभर रुपयांच्या पल्याड झेपावल्याने दुचाकी-चारचाकी वाहनधारकांना याची जास्त झळ पोहोचली.. या सर्व आर्थिक नकारात्मक घटनांचा ‘कचरा’ त्या वेळेला सोयीस्कररीत्या गालिच्याखाली लोटला जात होता. अगदी त्याने परिसीमा गाठली असताना, त्या वेळी भाकीत केल्याप्रमाणे निफ्टी निर्देशांकाने  १८,६०० चा उच्चांकही दाखविला. हा उच्चांक साध्य झाल्याचा आनंद होता, पण त्याहूनही महत्त्वाच्या अशा घातक उतारांची भीती जास्त सतावत होती.

आता, उच्चांकापासून संभाव्य नीचांक काय असेल?

यासाठी पुन्हा वाचकांसाठी विकसित केलेले उच्चांकापासून १,००० अंशांच्या घसरणीच्या जुन्या सूत्राचा आधार घेऊ. निफ्टी निर्देशांकाचा उच्चांक १८,६०० उणे १,००० अंश जो सरलेल्या सप्ताहातील शुक्रवारचा निफ्टी निर्देशांकाचा १७,६१३ नीचांक होता. अशा रीतीने समभागांच्या नफारूपी विक्रीसाठी उच्चांकाची व बाजार कोसळल्यावर नफ्यात विकलेले समभाग स्वस्तात फेरखरेदीसाठी नीचांक, असे दोन्ही स्तर वाचकांनी अवगत करून घ्यायला हवेत. तरच त्यांची आर्थिक,मानसिक तयारी होऊ शकेल. यासाठी जुनीच प्रमेये, सूत्रे वापरली आहेत. जी आता पुन्हा एकवार काळाच्या कसोटीवर अचूकपणे उतरली आहेत. येणाऱ्या दिवसात निफ्टी निर्देशांकाने सातत्याने १७,६०० चा स्तर राखल्यास निफ्टी निर्देशांकाचे वरचे लक्ष्य हे १८,००० आणि द्वितीय लक्ष्य १८,३०० असे असेल.  

निकालपूर्व विश्लेषण

१) एचडीएफसी लिमिटेड  

*  तिमाही वित्तीय निकाल – सोमवार, १ नोव्हेंबर

* २९ ऑक्टोबरचा बंद भाव- २,८४३.८० रु. 

*  निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर   – २,८०० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून २,८०० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य २,९५० रुपये, द्वितीय लक्ष्य ३,१०० रुपये.

ब) निराशादायक निकाल : २,८०० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत २,६५० रुपयांपर्यंत घसरण.

२) आयआरसीटीसी लिमिटेड

*  तिमाही वित्तीय निकाल  – सोमवार, १ नोव्हेंबर       

*  २९ ऑक्टोबरचा बंद भाव- ८४५.६५ रु.  

*  निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर- ८०० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ८०० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ९०० रुपये, द्वितीय लक्ष्य १,००० रुपये.

ब) निराशादायक निकाल : ८०० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ६५० रुपयांपर्यंत घसरण.

३) टाटा मोटर्स लिमिटेड  

*  तिमाही वित्तीय निकाल – सोमवार, १ नोव्हेंबर        

*  २९ ऑक्टोबरचा बंद भाव- ४८३.७५ रु.  

*  निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर         – ४६० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ४६० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ५३० रुपये, द्वितीय लक्ष्य ५९० रुपये.

ब) निराशादायक निकाल : ४६० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ४३५ रुपयांपर्यंत घसरण.

४) भारती एअरटेल लिमिटेड

*  तिमाही वित्तीय निकाल      – मंगळवार, २ नोव्हेंबर          

*  २९ ऑक्टोबरचा बंद भाव- ६८६.२५ रु.  

*  निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर   – ६७५ रु.

अ) उत्कृष्ट निकाल: समभागाकडून ६७५ रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ७१० रुपये, द्वितीय लक्ष्य ७४० रुपये.

ब) निराशादायक निकाल : ६७५ रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ६५० रुपयांपर्यंत घसरण.

५) गोदरेज प्रॉपर्टी लिमिटेड  

*  तिमाही वित्तीय निकाल      – मंगळवार, २ नोव्हेंबर 

*  २९ ऑक्टोबरचा बंद भाव- २,२४८.७५ रु. 

*  निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर   – २,२०० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून २,२०० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य २,४०० रुपये, द्वितीय लक्ष्य २,६००  रुपये.

ब) निराशादायक निकाल : २,२०० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत २,०५० रुपयांपर्यंत घसरण.

६) नोसिल लिमिटेड 

*  तिमाही वित्तीय निकाल – मंगळवार, २ नोव्हेंबर        

*  २९ ऑक्टोबरचा बंद भाव- २६६.९५ रु.  

*  निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – २६० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून २६० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य २९० रुपये, द्वितीय लक्ष्य ३१० रुपये.

ब) निराशादायक निकाल : २६० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत २३० रुपयांपर्यंत घसरण.

७) सन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज लिमिटेड       

*  तिमाही वित्तीय निकाल- मंगळवार, २ नोव्हेंबर          

*  २९ ऑक्टोबरचा बंद भाव- ७९४.४० रु.  

*  निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर   – ८०० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ८०० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ८५० रुपये, द्वितीय लक्ष्य ९०० रुपये.

ब) निराशादायक निकाल : ८०० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ७५० रुपयांपर्यंत घसरण.

८) स्टेट बँक ऑफ इंडिया

*  तिमाही वित्तीय निकाल- बुधवार, ३ नोव्हेंबर        

*  २९ ऑक्टोबरचा बंद भाव- ५०२.४० रु.  

*  निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर- ५०० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ५०० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ५२५ रुपये, द्वितीय लक्ष्य ५७० रुपये.

ब) निराशादायक निकाल : ५०० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ४५० रुपयांपर्यंत घसरण.

* लेखक भांडवली बाजार विश्लेषक

ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’, इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Stock market technical analysis stock market analysis for next week zws

Next Story
माझा पोर्टफोलियो : गुणात्मक परंपरा
ताज्या बातम्या