सुधीर जोशी sudhirjoshi23@gmail.com

भारतातील आतापर्यंतच्या सर्वात मोठय़ा विलीनीकरणाची घोषणा एचडीएफसी समूहाने गेल्या सोमवारी बाजार उघडायच्या आधी केली व सप्ताहाची सुरुवात तेजीच्या मोठय़ा लाटेने झाली. सेन्सेक्स १,३०० अंशांनी उसळला होता. नंतरच्या तीन दिवसांत मुख्यत्वे अमेरिकन फेडरल रिझव्‍‌र्हकडून व्याज दर जलद वाढण्याचे संकेत तसेच चीनच्या महत्त्वाच्या शहरांमधे लागू झालेली टाळेबंदी आणि त्यामुळे चीनचा विकास दर कमी राहाण्याची शक्यता त्याचप्रमाणे युरोपियन राष्ट्रांकडून रशियावर निर्बंध वाढण्याची शक्यता अशा अनेक कारणांमुळे गुंतवणूकदारांनी विक्रीचा मारा केला. शुक्रवारी रिझव्‍‌र्ह बँकेच्या द्वैमासिक आढावा बैठकीनंतर महागाईचा धोका असूनही व्याज दर कायम ठेवून विकासावर भर देण्याच्या घोषणेचे बाजाराने स्वागत केले व प्रमुख निर्देशांकांना पुन्हा बळ येऊन बाजार स्थिरावला.

Difficulties in the redevelopment of redeveloped buildings
मुंबई : पुनर्विकसित इमारतींच्या पुनर्विकासात अडचणी!
Loksatta vasturang Lessons from redevelopment buildings Layout of flats
पुनर्विकासाचे धडे : कौटुंबिक अवकाश जपू या!
snatched compensation of 11 crores of land in Nilje village near Dombivli on name of dead person
डोंबिवलीजवळील निळजे गावात मयत व्यक्तीच्या नावाने जमिनीचा ११ कोटीचा मोबदला लाटला
fraud of 21 lakhs by promising huge investment returns
नवी मुंबई : गुंतवणुकीतून भरघोस परताव्याचे आमिष दाखवून २१ लाखांची फसवणूक 

एचडीएफसी बँक : विलीनीकरणाचे विविध पैलू उलगडायला लागले तशी नफावसुली होऊन एचडीएफसी आणि एचडीएफसी बँकेचे तेजाळलेले समभाग पुन्हा पूर्वपदापर्यंत घसरले. कारण ही प्रक्रिया थोडी वेळ काढू आहे तसेच रिझव्‍‌र्ह बँकेच्या नियमांप्रमाणे नव्याने जमा झालेला निधीचा काही वाटा रिझव्‍‌र्ह बँकेच्या नियमांप्रमाणे रोख राखीव प्रमाण (सीआरआर) व वैधानिक तरलता प्रमाण (एसएलआर) राखण्यासाठी वापरावा लागेल तसेच प्राधान्य क्षेत्रासाठी कर्जवाटप वाढवावे लागेल. तरीही साधारण दीड ते दोन वर्षांत विलीनीकरणानंतर एचडीएफसी बँकेला जगातील पहिल्या १०० कंपन्यांमधे स्थान मिळेल. एचडीएफसी बँकेच्या विस्तीर्ण शाखांचा वापर गृह कर्ज वाटपासाठी करता येईल. बँकेच्या कमी व्याजाच्या ठेवी अधिक चांगल्या प्रकारे वापरता येतील. त्यामुळे दीर्घ मुदतीमध्ये गुंतवणूकदारांच्या फायद्याचाच हा निर्णय आहे. घसरलेल्या भावात एचडीएफसी बँकेचे समभाग जमवून ठेवावेत.

 एसबीआय कार्डस : कार्लाइल या खासगी गुंतवणूक संस्थेने एसबीआय कार्डसमधील आपला उरलेला तीन टक्के हिस्सा विकल्यामुळे एसबीआय कार्डसच्या समभागांवर विक्रीचे दडपण गेल्या सप्ताहात आले होते. परंतु गेले काही महिने असलेली ही टांगती तलवार नाहीशी झाल्यामुळे आता कंपनीच्या समभागाला मोठा धोका संभवत नाही. गेल्या तीन वर्षांत डिजिटल पेमेंटचा स्वीकार मोठय़ा प्रमाणात वाढत आहे. क्रेडिट कार्डाच्या उपयोगात गेल्या वर्षी ६५ टक्के वाढ झाली आहे. स्टेट बँकेचे पाठबळ व शाखांचे विस्तीर्ण जाळे लाभलेल्या या उदयोन्मुख व्यवसायात गुंतवणुकीची ही संधी आहे.

 एशियन पेन्ट्स : एशियन पेन्ट्स या आघाडीच्या कंपनीने रंग साहित्याबरोबर गृह सजावटीच्या व्यवसायात पाऊल टाकण्यासाठी ‘व्हाइट टिक’ या नाममुद्रेची मालकी असणाऱ्या ऑबजेनिक सॉफ्टवेअर कंपनीत व व्हेदरसील या कंपनीत टप्प्याटप्प्याने हिस्सा खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. या दोन्ही कंपन्या अनुक्रमे डेकोरेटिव्ह लॅंप, पंखे व पीव्हीसी दरवाजे व खिडक्यांच्या व्यवसायात आहेत. एशियन पेन्ट्ससाठी ही एक नैसर्गिक विस्तार संधी आहे. कंपनी स्वत:ची विपणन व्यवस्था वापरून या उत्पादनांची विक्री करू शकेल. एशियन पेन्ट्सच्या मूळ व्यवसायाला खनिज तेल दरवाढीचा धोका असला तरी कंपनी उत्पादनांच्या किमती वाढविण्यासाठी सक्षम आहे. कर्जरहित असणाऱ्या एशियन पेन्ट्सचे समभाग कुठल्याही घसरणीमध्ये घेऊन कायम ठेवावेत असे आहेत. 

 टीसीआय : ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड ही भारतातील अग्रगण्य एकात्मिक पुरवठा साखळी आणि लॉजिस्टिक सेवा पुरविणारी कंपनी आहे जी भारतातील माल वाहतुकीच्या क्षेत्रात अग्रणी आहे. कंपनीने रस्ते वाहतुकीबरोबर जलमार्गाने देखील वाहतूक सेवा पुरविते. रेल्वे वाहतुकीसाठी कॉनकॉरबरोबर कंपनीने करार केला आहे. कंपनीची माल वाहतूक कंत्राटे इंधनदरांशी निगडित असतात. त्यामुळे इंधन दर वाढीचा नफ्यावर परिणाम होत नाही. करोनाचे निर्बंध कमी झाल्यावर औद्योगिक क्षेत्राच्या उलाढालीतील वाढ वस्तू व सेवा कर संकलनातील वाढीमध्ये दिसून आली होती. ई-वे बिल व जीएसटीसारख्या सुधारणांमुळे वाहतूक सेवा प्रस्थापित उद्योगांकडून घेण्याकडे उद्योगधंद्यांचा कल वाढला आहे. टीसीआयने गेल्या दोन तिमाही निकालांत नफ्याचे प्रमाण १३ टक्क्यांहून जास्त राखले आहे. या व्यवसायातील अपेक्षित वाढीमुळे कंपनीच्या समभागातील गुंतवणूक फायद्याची ठरेल.

पुढील सप्ताहात वार्षिक निकाल जाहीर होण्यास सुरुवात होईल. माहिती तंत्रज्ञान क्षेत्राच्या वार्षिक निकालांवर युक्रेन युद्धाचा फारसा परिणाम जाणवणार नाही. बँकांच्या थकीत कर्जाच्या प्रमाणातील घट व नवीन कर्जाची वाढलेली मागणी यामुळे बँकांचे निकाल चांगले असतील. धातूंच्या वाढत्या किमतींचा या क्षेत्रातील कंपन्यांच्या निकालांवर चांगला परिणाम दिसेल. पण अमेरिकन फेडरल रिझव्‍‌र्हच्या महागाई विरोधातील आक्रमक धोरणामुळे व्याजदर वेगाने वाढतील तसेच रोखे खरेदी करून रोकडतरलता कमी करण्याच्या उपायांनी शेअर बाजारावर दबाव राहील. गुंतवणूकदारांनी नफावसुलीच्या संधी घेऊन सावध वाटचाल करायला हवी.

सप्ताहातील या घडामोडींकडे लक्ष ठेवा.

टीसीएस, इन्फोसिस, एचडीएफसी बँक, आलोक इंडस्ट्रीज, ओरिएंट हॉटेल्स, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाईफ या कंपन्या गेल्या आर्थिक वर्षांचे निकाल जाहीर करतील. बीएलएस इंटरनॅशनल बोनस समभागांची घोषणा करेल.