आशीष ठाकूर ashishthakur1966@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिखर स्तरावर सलगपणे घोडदौड राखल्यानंतर, सरलेल्या आठवडय़ात तेजीचे वारे मंदावलेच नाही तर सलग चार सत्रात निर्देशांक गडगडले. या उलटफेरीची कारणमीमांसा आणि भविष्यवेध..

या साप्ताहिक सदरातील १८ ऑक्टोबरच्या लेखातील वाक्य होते – ‘‘निफ्टी निर्देशांकावर मैलाचा दगड असलेल्या १८,००० ची पातळी पकडल्यास त्यात ४५० अंश मिळवले असता १८,४५० आणि निफ्टी निर्देशांकाचा १८,१०० ची पातळी पकडल्यास त्यात ५०० अंश मिळवले असता १८,६०० हा संभाव्य उच्चांक दृष्टिपथात येईल. या उच्चांकी पातळीवर समभाग खरेदी करण्यापेक्षा हलक्या-फुलक्या घसरणीत समभाग खरेदी करणे श्रेयस्कर.’’ या वाक्याची अचूक प्रचीती सरलेल्या सप्ताहात निर्देशांकाच्या वाटचालीने दिली.

मंगळवारी निफ्टी निर्देशांकाने १८,६०४ चा उच्चांक नोंदवला आणि घसरणीला सुरुवात झाली. वाचकांना उच्चांकाचे भाकीत सांगण्यामागचा मुख्य उद्देश हा निफ्टीचा संभाव्य उच्चांकी स्तरावर समभागांची खरेदी थांबवून समभागांची विक्री करून हलक्या-फुलक्या घसरणीत त्यांनी पुन्हा समभाग खरेदी करावी असा होता. वाचकांची त्या दिशेने आर्थिक, मानसिक तयारी व्हावी हा उद्देश होता. हे उच्चांकी पातळीचे भाकीत आणि त्यानंतरची घसरण काळाच्या कसोटीवर उतरल्याने आता निर्देशांकाची भविष्यातील वाटचाल कशी असेल याची वाचकांना उत्सुकता असेलच. ती विस्तृतपणे जाणून घेऊच पण तत्पूर्वी सरलेल्या सप्ताहातील बाजाराचा साप्ताहिक बंद बघूया. 

शुक्रवारचा बंद भाव :

सेन्सेक्स: ६०,८२१.६२

निफ्टी : १८,११४.९० 

आता निफ्टी निर्देशांकाच्या भविष्यकालीन वाटचालीचे आलेखन करण्यासाठी आपण ज्ञात आकडेवारीचा आधार घेऊया.

ल्ल  प्रथम आपण तेजीची वाटचाल जाणून घेऊया –

निफ्टी निर्देशांकावर मैलाचा दगड असलेल्या १८,००० ची पातळी केंद्रस्थानी ठेवत भविष्यात ही पातळी सातत्याने राखल्यास निफ्टी निर्देशांकाचे वरचे लक्ष्य हे १८,३५० ते १८,४५० असे असेल. भविष्यात निफ्टी निर्देशांक सातत्याने १८,४५० अंशांच्या वरच्या पातळीवर टिकल्यास निफ्टी निर्देशांकाचे वरचे लक्ष्य हे १८,६०० आणि त्यापुढे १८,९०० ते १९,१३५ असे असेल.

ल्ल  आता नाण्याची दुसरी बाजू जाणून घेऊया –

निफ्टी निर्देशांक १८,४५० अंशांची पातळी ओलांडण्यास सतत अपयशी ठरल्यास आणि सातत्याने १८,००० पातळीच्या खाली राहिल्यास, निफ्टी निर्देशांकाचे खालचे लक्ष्य काय? यासाठी वाचकांसाठी पूर्वी विकसित केलेले जुनेच गृहीतक म्हणजे उच्चांकी पातळीवरून हजार अंशांची घसरण हे गृहीतक सद्य:स्थितीत अमलात आणल्यास १८,६०० उणे १,००० अंश १७,६०० हा संभाव्य नीचांक असेल.

निकालपूर्व विश्लेषण

१) अम्बुजा सिमेंट लिमिटेड 

६  तिमाही वित्तीय निकाल – मंगळवार, २६ ऑक्टोबर

६ २२ ऑक्टोबरचा बंद भाव- ३७५.९५ रु. 

६  निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – ३९० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ३९० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ४२५ रुपये, द्वितीय लक्ष्य ४५० रुपये.

ब) निराशादायक निकाल : ३९० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ३५० रुपयांपर्यंत घसरण.

२) अ‍ॅक्सिस बँक लिमिटेड

*  तिमाही वित्तीय निकाल – मंगळवार, २६ ऑक्टोबर     

*  २२ ऑक्टोबरचा बंद भाव- ८१६.९० रु. 

*  निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – ७९० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ७९० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ८३० रुपये, द्वितीय लक्ष्य ८६० रुपये.

ब) निराशादायक निकाल : ७९० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ७६० रुपयांपर्यंत घसरण.

३) बजाज फायनान्स लिमिटेड 

*  तिमाही वित्तीय निकाल – मंगळवार, २६ ऑक्टोबर       

*  २२ ऑक्टोबरचा बंद भाव- ७,७१३.४० रु. 

*  निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर- ७,७०० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ७,७०० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ८,००० रुपये, द्वितीय लक्ष्य ८,३५० रुपये.

ब) निराशादायक निकाल : ७,७०० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ७,१०० रुपयांपर्यंत घसरण.

४) मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड     

*  तिमाही वित्तीय निकाल- बुधवार, २७ ऑक्टोबर         

*  २२ ऑक्टोबरचा बंद भाव- ७,४११  रु. 

*  निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – ७,५५० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ७,५५० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ७,८०० रुपये, द्वितीय लक्ष्य ८,१०० रुपये.

ब) निराशादायक निकाल : ७,५५० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ७,१०० रुपयांपर्यंत घसरण.

५) टाटा पॉवर कंपनी लिमिटेड

*  तिमाही वित्तीय निकाल – गुरुवार, २८ ऑक्टोबर       

*  २२ ऑक्टोबरचा बंद भाव- २२२.१५ रु. 

*  निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – २१७ रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून २१७ रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य २५० रुपये, द्वितीय लक्ष्य २८० रुपये.

ब) निराशादायक निकाल : २१७ रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत १८५ रुपयांपर्यंत घसरण.

लेखक भांडवली बाजार विश्लेषक

अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’, इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Technical analysis of stock market stock market outlook for next week zws
First published on: 25-10-2021 at 00:54 IST