अजय वाळिंबे

इन्फो एज ही भारतातील एक प्रमुख ऑनलाइन कंपनी असून कंपनीकडे नोकरी डॉट कॉम (ऑनलाइन जॉब पोर्टल), ९९ एकर्स डॉट कॉम (ऑनलाइन रिअल इस्टेट), जीवनसाथी डॉट कॉम (ऑनलाइन विवाह) तसेच शिक्षा डॉट कॉम (ऑनलाइन शिक्षण माहिती सेवा) यांसारख्या विविध क्षेत्रांतील प्रसिद्ध नाममुद्रांची मालकी आहे. या नाममुद्रांच्या पोर्टफोलियोव्यतिरिक्त कंपनीने ऑनलाइन व्यवसाय क्षेत्रात कार्यरत अनेक स्टार्ट-अपमध्ये गुंतवणूक केली आहे.

multi asset portfolio, investment, shares, stocks, mutual fund, commodity market, gold, expensive paintings, crypto currency, finance article
मार्ग सुबत्तेचा : मल्टिअ‍ॅसेट पोर्टफोलिओ – काय, का आणि कसा?
mumbai, charkop, Architect s Attempt to fraud , fungible carpet area in MHADA Housing, MHADA Housing Societies charkop, redevlopment of mhada socieities, mhada society charkop, chrkop news,
चारकोपमधील म्हाडा पुनर्विकासात फंजीबल चटईक्षेत्रफळाचा घोटाळा, अधिकाऱ्याच्या दक्षतेमुळे अनर्थ टळला!
Force Motors out of tractor business news
फोर्स मोटर्स ट्रॅक्टर व्यवसायातून बाहेर
indigrid cio meghana pandit talks about future Investment flow in invit
‘इन्व्हिट्स’मध्ये गुंतवणूक ओघ वाढत जाणार ! इंडिया ग्रिड ट्रस्टच्या मुख्य गुंतवणूक अधिकारी पंडित यांचे प्रतिपादन  

सध्याच्या युगात आणि विशेषत: तरुण वर्गासाठी ऑनलाइन पोर्टल्स नवीन नाहीत. नोकरी डॉट कॉमपासून सुरुवात केलेली ही कंपनी आज अनेक पोर्टल्सवर ऑनलाइन व्यवसाय करत आहे. कंपनीच्या एकूण उलाढालीपैकी सुमारे ७५ टक्के उलाढाल नोकरी डॉट कॉम या पोर्टलची आहे. व्यवसायाचे विस्तारीकरण करताना कंपनीने विवाह, रिअल इस्टेट, फायनान्स, शिक्षण इत्यादी अनेक उपयोगी तसेच आकर्षक पोर्टल्स स्थापन केलीच. परंतु कालानुरूप त्यात बदलही केले. कंपनीच्या प्रत्येक ब्रॅंड पोर्टलचे व्यवस्थापन वेगवेगळे केले जाते.

भारतात ४३ शहरांतून ५८ कार्यालये असलेल्या इन्फो एजने स्वतंत्र उपक्रमांद्वारे संकल्पना आणि विकसित केलेल्या ब्रँडमध्ये आर्थिक गुंतवणूकदार या नात्याने गुंतवणूक करून आपल्या व्यवसायाची व्याप्ती वाढवली आहे. कंपनीची गुंतवणूक नवीन कल्पना आणि उत्पादनांमध्ये असून कंपनी तिच्या उपकंपन्या जसे ‘स्टार्टअप इन्व्हेस्टमेंट्स (होल्डिंग) लिमिटेड’ आणि नवीन सेट-अप फंड ‘इन्फो एज व्हेंचर फंड’द्वारे गुंतवणुका करते. कंपनीकडे रेस्टॉरंट रेटिंग आणि परीक्षण करणारी सुप्रसिद्ध झोमॅटो या कंपनीचे १५ टक्के भांडवल असून, तिने पॉलिसी बझार (१९.५ टक्के भागभांडवल) यासह इतरही अनेक क्षेत्रांतील विविध पोर्टल्समध्ये गुंतवणूक केली आहे. यांत प्रामुख्याने पॉलिसी बझार (विमा योजनांचे वितरण), सनराइज मेंटर्स, जुनो लर्निग, इंटरनॅशनल गेटवे एज्युकेटर्स (सर्व शैक्षणिक), शॉप किराणा ई ट्रेडिंग (विविध उत्पादने सवलतीत विकणारी), प्रिंतो डॉक्युमेंट सव्र्हिसेस, हॅप्पीली अनमॅरिड, ज्वायम डिजिटल (रोजगार संधी) आणि ग्रेटीप सॉफ्टवेअर इ.चा समावेश करावा लागेल.इन्फो एजने स्वतंत्र उपक्रमांद्वारे, टेक आणि टेक-सक्षम संस्थांमध्ये गुंतवणूक करून योगदानकर्त्यांसाठी आर्थिक परिणाम निर्माण करण्याच्या उद्देशाने ‘इन्फो एज व्हेंचर फंड’ची स्थापना केली आहे. फंडाचा एकूण निधी ८०० कोटी असून यंदाच्या आर्थिक वर्षांत दुसरा व्हेंचर फंड आणि इन्फो एज कॅपिटल आणि कॅपिटल २बी हे दोन ‘एआयएफ’ तिने स्थापन केले आहेत.

कंपनीचा सर्वात मोठा व्यवसाय म्हणजे नोकरी डॉट कॉम आणि त्या अंतर्गत चालविली जाणारी ऑनलाइन भरती होय. या पोर्टलद्वारे साडे आठ कोटी रिझ्युमे आणि ९३ हजार नोकरी इच्छुकांनी प्रीमियम सेवांचा लाभ घेतला असून, कंपनीकडे जून २०२२ पर्यंत ७५,८७६ प्रमुख रोजगार प्रदाते ग्राहक आहेत. कंपनी या पोर्टलवर सातत्याने नवीन उत्पादने (टॅलेंट पल्स, एंटरप्राइझ रेसडेक्स इ.) प्रस्तुत करत असून जास्तीत जास्त रोजगार युवकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करत आहे.कुठलेही कर्ज नसलेल्या इन्फो एजचे जून २०२२ अखेर संपलेल्या तिमाहीचे निकाल अपेक्षेप्रमाणे उत्तम असून या पहिल्या तिमाहीच्या कालावधीत कंपनीने ५४७ कोटी रुपयांच्या उलाढालीवर (१३० टक्के वाढ) १७९ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या तिमाहीच्या तुलनेत तो तब्बल ८७९ टक्क्यांनी अधिक आहे. पाच वर्षांपूर्वी याच स्तंभातून हा शेअर ८५० रुपयांना सुचविला होता. ज्या वाचक गुंतवणूकदारांनी यांत गुंतवणूक केली असेल त्यांना नक्कीच फायदा झाला असणार. पण ज्यांची ही संधी हुकली असेल त्यांच्यासाठी चालून आलेली ही दुसरी संधी आहे. सध्या ४,१००/- रुपयांच्या आसपास असलेला हा शेअर थोडासा महाग वाटत असला तरीही आपल्या पोर्टफ़ोलिओमध्ये आधुनिक युगातील इन्फो एजचा समावेश हवाच.

बाजारातील अनिश्चितता पाहता हा शेअर सुचविलेल्या किमतीपेक्षा कमी भावात मिळू शकतो, म्हणून प्रत्येक मंदीत तसेच टप्प्याटप्प्याने शेअर खरेदीचे धोरण ठेवावे.

इन्फो-एज (इंडिया) लिमिटेड
(बीएसई कोड – ५३२७७७)
शुक्रवारचा बंद भाव : रु. ४,१२२/-
वर्षभरातील उच्चांक/ नीचांक : रु. ७,४६३ / ३,३१४

बाजार भांडवल : रु. ५३,१६९ कोटी

भरणा झालेले भागभांडवल : रु. १२८.९८ कोटी
शेअर होल्डिंग पॅटर्न (%)
प्रवर्तक ३८.११
परदेशी गुंतवणूकदार ३२.७२
बँक/ म्यु. फंड/ सरकार १६.३७
इतर/ जनता १२.८०

संक्षिप्त विवरण
शेअर गट : लार्ज कॅप
प्रवर्तक : संजीव भीकचंदानी
व्यवसाय क्षेत्र : माहिती-तंत्रज्ञान
पुस्तकी मूल्य : रु. १,३३६.७०
दर्शनी मूल्य : रु. १०/-
गतवर्षीचा लाभांश : १३०%

शेअर शिफारशीचे निकष
प्रति समभाग उत्पन्न : रु. २४६.३
पी/ई गुणोत्तर : १८.१
समग्र पी/ई गुणोत्तर : ८५
डेट इक्विटी गुणोत्तर : ००
इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर : ७११
रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड : २४.३
बीटा : १.३

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यापेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.