बाजाराचा तंत्र-कल : भय इथले संपले का! | the market Ukraine war Russia Nifty Index International Financial amy 95 | Loksatta

बाजाराचा तंत्र-कल : भय इथले संपले का!

आंतरराष्ट्रीय राजकीय पटलावरील आर्थिक प्यादी ही बुद्धिबळाच्या मोहऱ्यांसारखी वापरली गेली.

बाजाराचा तंत्र-कल : भय इथले संपले का!

आशीष ठाकूर

गेल्या लेखात ‘चिकित्सा महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर’ या मथळय़ाखालील मजकुरात सूतोवाच केल्याप्रमाणे – ‘युक्रेनबरोबरच्या युद्धामुळे रशियातून युरोपात जो पाइपलाइनद्वारे गॅस पाठवला जातो त्याचा वापर आता येणाऱ्या हिवाळय़ात हाडे गोठवणाऱ्या थंडीत रशिया ‘तेलास्त्र’ म्हणून करत युरोपला वेठीला धरले जाणार काय?’ ही व्यक्त केली गेलेली भीती लेखाची शाई वाळते न वाळते तोच प्रत्यक्षात आली. असे घडल्यास निफ्टी निर्देशांक १७,२०० चा स्तर राखण्यास अपयशी ठरेल व इथून ‘भय इथले संपत नाही’ स्थिती ओढवली जाईल आणि निफ्टी निर्देशांकाचे प्रथम खालचे लक्ष्य १६,८०० असे असेल, हेही त्याच लेखात सुचवण्यात आले होते. या विधानाची दाहकता आणि प्रचीती आपण सरलेल्या सप्ताहातील गुरुवापर्यंत अनुभवली. या पार्श्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळू या.

आंतरराष्ट्रीय राजकीय पटलावरील आर्थिक प्यादी ही बुद्धिबळाच्या मोहऱ्यांसारखी वापरली गेली. रशियाने चार हत्तींचे बळ वापरत युक्रेनवर थेट चाल केली. रशियाची ही तिरपी चाल अमेरिका, नाटो करारातील देश, युरोपमधील अमेरिकेच्या प्याद्यांना कधीही मानवणार नाही, हे गृहीत धरून युरोपला दहशत बसावी म्हणून युरोपची दुखरी नस म्हणजे हिवाळय़ात भासणारी वाढीव इंधनाची, ऊर्जेची गरज – त्यावरच बोट ठेवले गेले. युरोपला इंधनाचा पुरवठा रशिया करत असल्याने, रशियाने कागदी घोडे न नाचवता अडीच महिन्यांअगोदरपासून युरोपचे ‘नाक दाबून तोंड कसे उघडायचे’ याचे नियोजन आखले. रशियाने अमेरिकेला-युरोपला शह-काटशह देत आपली योजना आखली व तडीस नेली. या उलथापालथीत मात्र निफ्टी निर्देशांक १८,०९६ च्या उच्चांकापासून १६,७४७ पर्यंत घसरला. हे लक्षात घेऊन येणाऱ्या दिवसांत निफ्टी निर्देशांकाची वाटचाल कशी असेल त्याचा आढावा घेऊ या.
या घातक उतारात निफ्टी निर्देशांकाने आपल्याभोवती ४०० अंशांचा परीघ निर्माण केला आहे. जसे की १६,८०० ते १७,२००. निफ्टी निर्देशांकावर १६,८०० ते १७,२०० या चारशे अंशांच्या परिघात पायाभरणी होणे आताच्या घडीला नितांत गरजेचे आहे. तरच निफ्टी निर्देशांकावर १७,६०० ते १७,८०० चे वरचे लक्ष्य दृष्टिपथात येईल व त्या वेळेला तात्पुरत ‘भय इथले संपले’ असे म्हणण्यास हरकत नाही. या प्रक्रियेत निफ्टी निर्देशांकाने १७,००० ते १७,२०० चा स्तर किमान महिनाभर राखणे नितांत गरजेचे आहे. याला आपण कालानुरूप पायाभरणी म्हणू या आणि तसे घडल्यास ठीकच. मात्र तसे न घडल्यास निफ्टी निर्देशांकाचे खालचे लक्ष्य १६,६०० असे असेल.

निकालपूर्व विश्लेषण
१) विप्रो लिमिटेड
तिमाही वित्तीय निकाल – बुधवार, १२ ऑक्टोबर
३० सप्टेंबरचा बंद भाव – ३९४.२५ रु.
निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर – ४१५ रु.
अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ४१५ रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ४४५ रुपये, द्वितीय लक्ष्य ४७० रुपये.
ब)निराशादायक निकाल : निराशादायक निकाल : ४१५ रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत ३८० रुपयांपर्यंत घसरण.

२) बजाज ऑटो लिमिटेड
तिमाही वित्तीय निकाल- शुक्रवार, १४ ऑक्टोबर
३० सप्टेंबरचा बंद भाव – ३,५२७.७५ रु.
निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर – ३,६५० रु.
अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ३,६५० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ३,८५० रुपये, द्वितीय लक्ष्य ३,९५० रुपये.
ब)निराशादायक निकाल : ३,६५० रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत ३,४५० रुपयांपर्यंत घसरण.

३) एचडीएफसी बँक लिमिटेड
तिमाही वित्तीय निकाल – शनिवार,१५ ऑक्टोबर
३० सप्टेंबरचा बंद भाव – १,४२१.३५ रु.
निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर – १,४५० रु.
अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून १,४५० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य १,५०० रुपये, द्वितीय लक्ष्य १,६०० रुपये.
ब) निराशादायक निकाल : १,४५० रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत १,३७० रुपयांपर्यंत घसरण.

महत्त्वाची सूचना : उपरोक्त समभागांचे प्रत्यक्ष तिमाही वित्तीय निकाल जाहीर होण्यास अजून १० ते १२ दिवसांचा अवधी हा गुंतवणूकदारांना चिंतन, मनन, तज्ज्ञांचा सल्ला घेऊन मानसिक, आर्थिक तयारीसाठी उपयोगात आणावा. कंपनीचे प्रत्यक्ष निकाल जाहीर झाल्यावर, समभागाचा बाजारभाव महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर राखत असल्यास जाहीर झालेला तिमाही निकाल चांगला, अन्यथा वाईट हे गृहीत धरावे. त्या अनुषंगाने अत्यल्प मुदतीची, दीर्घ मुदतीची गुंतवणूक धारणा असलेल्या गुंतवणूकदारांनी आपल्या गुंतवणुकीचे नियोजन करावे.

अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’, इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

शुक्रवारचा बंद भाव :
सेन्सेक्स : ५७,४२६.९२
निफ्टी : १७,०९४.३५

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त ( Arthvrutant ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
लक्ष्मीची पाऊले.. : तसा उन्हांत गारवा, असेलही, नसेलही..

संबंधित बातम्या

कमावत्या वयातच निवृत्तजीवनाचे नियोजन का गरजेचे?

व्हिडिओ

ताज्या बातम्या
आफताबवर तलवारीने हल्ला का केला? हिंदू सेनेचा कार्यकर्ता म्हणाला, “आम्ही त्याला फाडून…”
भारतातील प्रसिद्ध रुग्णालय AIIMSचा सर्व्हर हॅक; हॅकर्सनी मागितली २०० कोटींची खंडणी
करण जोहरच्या आगामी चित्रपटात झळकणार काजोल? ‘या’ स्टारकीडच्या आईची भूमिका साकारणार
शेतकऱ्याचा नादच खुळा! शेतात आलेल्या सिंहिंणींना दिलं जशाच तसं उत्तर, Viral Video पाहून म्हणाल ‘कमाल है’
सुपरस्टार चिरंजीवी यांनी चित्रपट महोत्सवात चाहत्यांना दिलं मोठं वचन; म्हणाले “मी चित्रपटसृष्टी…”