portfolio4मागच्या लेखात म्हटल्याप्रमाणे सध्याची परिस्थिती ही दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी खरेदीची उत्तम संधी ठरू शकते. अर्थात संयम मात्र हवा. आज सुचविलेला हा असाच एक ब्ल्यूचिप कंपनीचा शेअर आहे. सुमारे ३५ वर्षांपूर्वी पुण्यात सुरू झालेली थरमॅक्स इंजिनीयिरग क्षेत्रातील व्यवसायात असून सध्या भारतातील एक आघाडीची कंपनी म्हणून ओळखली जाते. गेल्या १५ वर्षांत कंपनीने अमेरिका, कॅनडा, थायलंड, ब्राझील इ. देशांत काही कंपन्या ताब्यात घेऊन तर कुठे उपकंपनी स्थापन करून आपला विस्तार वाढविला. या खेरीज रशिया, युरोप, आखाती देश, आफ्रिका, चीन आणि दक्षिण पूर्वेतही कंपनीने आपली कार्यकक्षा वाढवली आहे. जगभरात ७५ देशांत, १९ कार्यालये, १२ उत्पादन केंद्रे आणि १२ विक्री आणि सेवा केंद्रे असलेल्या थरमॅक्सचे महत्व वाढते ते तिच्या व्यवसायामुळे. जगातील फार थोडक्या कंपन्या बॉयलर, हिटिंग, कूिलग, वॉटर अँड वेस्ट मॅनेजमेंट अशा अनेक इंजीनीिरग सेवा एका छत्राखाली देऊ शकतात. भारतात पाच उपकंपन्या तर जगभरात १६ उपकंपन्या आणि दोन संयुक्त भागीदारीत कंपन्या असलेल्या थरमॅक्सने गेल्या आíथक वर्षांत ४,६४५.८८ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ३३५.९४ कोटी रूपयांचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत तो ४०% अधिक आहे. खरं तर गेली दोन-तीन वष्रे मंदीमुळे कंपनीची यंदाच्या आíथक वर्षांतही खास कामगिरी  नसेल असेच वाटले होते. मात्र कंपनीने उत्तम आíथक निकाल जाहीर करून सुखद धक्का दिला आहे. येत्या दोन वर्षांत इंजिनीयिरग क्षेत्र पुन्हा भरारी घेईल अशी आशा आहे. त्यामुळेच थरमॅक्ससारखे शेअर्स खरेदी करून ठेवावेत. पोर्टफोलियोला झळाळी देण्यासाठी हे शेअर्स खूप उपयोगी पडतात.
stocksandwealth@gmail.com

china people punished for not paying debt
जीवनावश्यक वस्तू खरेदी करणेही कठीण; कर्ज फेडू न शकणाऱ्यांना चीन कशी शिक्षा करत आहे?
Can eggs help diabetic patient to control blood sugar
मधुमेही व्यक्तींनी अंडी खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते का? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
Big falls in Sensex and Nifty
सेन्सेक्स अन् निफ्टीत मोठ्या प्रमाणात पडझड; शेअर बाजाराच्या घसरणीला ‘या’ तीन गोष्टी ठरल्या कारणीभूत
Why MHADA will not build houses in high income group
म्हाडाकडून यापुढे उच्च उत्पन्न गटातील घरांची निर्मिती नाही?