मे महिन्यातील औद्योगिक उत्पादन निर्देशांक शुक्रवारी जाहीर झाला. या निर्देशांकातील वाढ ४.७ टक्के असून हा निर्देशांक ऑक्टोबर २०१२ म्हणजे गेल्या तब्बल १९ महिन्यांच्या उच्चांकावर आहे. या वाढीत उत्पादित वस्तूंचा (Manufacturing sector) वाटा ४.८ टक्के आहे. औद्योगिक उत्पादन निर्देशांकातील उत्पादित वस्तू, वीज निर्मिती, खनिकर्म या सर्वच घटकांनी २४ महिन्यांत पहिल्यांदाच वाढ नोंदविली. आíथक सर्वेक्षणात भारताची अर्थव्यवस्था ५.५ ते ६ टक्के वाढ अपेक्षित आहे. अर्थव्यवस्था ही वाढ गाठू शकेल की नाही याबद्दल मतमतांतरे असली तरी अर्थव्यवस्था रुळावर येत असल्याची सुचिन्हे दिसू लागली आहेत. जेव्हा अर्थव्यवस्था मंदीतून वर येत असते तेव्हा भांडवली वस्तूची मागणी अर्थव्यस्थेच्या इतर घटकांपेक्षा आधी वाढते. याला अर्थशास्त्रात  ‘Early Expansion’  अशी संज्ञा वापरली जाते. भांडवली वस्तू व वाहन निर्मिती उद्योगाची पुरवठादार असलेल्या ‘टिमकेन इंडिया’ची शिफारस याच निकषांवर या वेळी करावीशी वाटते.

टिमकेन इंडिया ही अमेरिकेच्या टिमकेन कंपनीची भारतातील उपकंपनी आहे. बेअिरग व्यवसायात ‘टिमकेन’ ही १०० वष्रे जुनी नाममुद्रा आहे. १९८७ मध्ये टाटा स्टील व टिमकेन कंपनी यांच्या भागीदारीतून या कंपनीची स्थापना टाटा टिमकेन लिमिटेड म्हणून झाली. सुरुवातीला दोन्ही भागीदारांचा भांडवलात प्रत्येकी ४० टक्के व उर्वरित २० टक्के हिस्सा हाकिरकोळ गुंतवणूकदारांचा होता. १९९२ मध्ये टाटा टिमकेनच्या जमशेटपूर येथील कारखान्यातून उत्पादनास प्रारंभ झाला. १९९९ मध्ये टाटा स्टीलने आपला भांडवली हिस्सा टिमकेनला विकल्यानंतर कंपनीचे नाव टिमकेन इंडिया लिमिटेड असे बदलण्यात आले. टिमकेन इंडियाच्या भांडवलात टिमकेनचा ७५ टक्के वाटा असून २५ टक्के वाटा किरकोळ गुंतवणूकदारांचा वाटा आहे. टिमकेन कंपनी ही ‘स्पेरिकल रोलर बेअिरग’, ‘टेपर रोलर बेअिरग’ व ‘सिलिंड्रिकल रोलर बेअिरग’  या प्रकारच्या बेअिरग उत्पादनाची आघाडीची उत्पादक आहे. कंपनीने भारतात टिमकेन इंडिया मॅन्युफॅक्चिरग लिमिटेड ही उपकंपनी २०१३ मध्ये चेन्नई येथील ‘सेझ’मध्ये स्थापन केली. या कंपनीतून टिमकेनच्या बेअिरगचे उत्पादन होऊन तिची निर्यात केली जाते. तर टिमकेन इंडिया इंजिनीअिरग रिसर्च सेंटर २०१३ मध्ये रायपूर येथे सुरू केले. या इंजिनीअिरग रिसर्च सेंटरमध्ये टिमकेनच्या जागतिक स्तरावरील विविध प्रकारच्या बेअिरगचे आरेखन, संशोधन, पेटंटसंबंधी काम केले जाते. कंपनीने आपला व्यवसाय बेअिरगच्या वापरानुसार चार उत्पादन गटात विभागाला आहे. मोबाइल इंडस्ट्रीज ग्रुप (वाहने), प्रोसेस इंडस्ट्रीज ग्रुप (अवजड उद्योग, विमाने, गिअर ड्राइव्ह्ज), सíव्हस इंडस्ट्रीज ग्रुप (रेल्वे बेअिरग दुरुस्ती, रिलायबिलिटी टेिस्टग) व्हॅल्यू अ‍ॅडेड सोल्युशन (अलॉय स्टील वापरून तयार केलेली बेअिरग).
मागील दोन वर्षांत कंपनीचा व्यवसाय जागतिक मंदीमुळे बाधित झाला आहे. कंपनीचा कच्चा माल पोलाद असून ते जपानहून आयात होते. रुपयाच्या घसरणीमुळे कंपनीच्या कच्च्या मालाच्या किमतीत मोठी वाढ झाली व मंदीमुळे कंपनी बेअिरगच्या किमतीत आवश्यक तितकी वाढ करू शकली नाही. याचा परिणाम कंपनीला रांची येथील नवीन क्षमता वाढविण्याचा कार्यक्रम सध्या स्थगित करावा लागला आहे. तर कंपनीचा ‘फिलाडेल्फिया गिअर्स’बरोबरचा संयुक्त प्रकल्प मागील वर्षी सुरू झाला. चालू आíथक वर्षांत या कारखान्याचा संपूर्ण लाभ कंपनीला मिळणे अपेक्षित आहे.
नवीन सरकार स्थापन झाल्यावर औद्योगिक विकासाला व पायाभूत सुविधांच्या गुंतवणुकीस चालना मिळणे अपेक्षित असल्यामुळे याचा सकारात्मक परिणाम कंपनीच्या विक्रीवर सहा महिने ते वर्षभरानंतर दिसू लागेल. प्रतिकूल औद्योगिक वातावरणातही आíथक वर्ष २०१२-१३ मध्ये कंपनीने विक्रीत २ टक्के वाढ दर्शविली होती. २०१३-१४ या वर्षांतही कंपनीची विक्री ५ टक्क्याच्या आत वाढलेली दिसेल. सद्य भाव मागील वर्षीच्या प्रति समभाग मिळकतीच्या ३०.२२ पट असला तरी किमतीचे पुस्तकी किमतीशी गुणोत्तर फक्त ४ आहे.
भारताची अर्थव्यवस्था उभारी घेत असल्याची सुचिन्हे व अमेरिकेसहित जगाच्या सुधारत असलेल्या इतर अर्थव्यवस्थेचा लाभार्थी म्हणून तीन ते पाच वर्षांसाठी या कंपनीच्या समभागात गुंतवणूक करावी, असे सुचवावेसे वाटते.