फंडाविषयक विवरण
फंडाचा गुंतवणूक प्रकार: समभाग गुंतवणूक  
जोखीम प्रकार: समभाग गुंतणूक असल्याने धोका अधिक (मुद्दलाची शाश्वती नाही)  
गुंतवणूक: समभाग गुंतवणूक ८०% पेक्षा कमी नसेल व जास्तीत जास्त २०% गुंतवणूक रोखे प्रकारची असेल.  
फंडाच्या परताव्याच्या तुलनेसाठी निर्देशांक       : एस अँड पी बीएसई १०० निर्देशांक
 

av-07     
निधी व्यवस्थापक : या फंडाचे निधी व्यस्थापक अनुप भास्कर असून त्यांना २३ वर्षांचा समभाग गुंतवणुकीचा अनुभव आहे. त्यांनी या आधी सुंदरम अ‍ॅसेट मॅनेजमेंट येथे समभाग गुंतवणूक प्रमुख व टेम्पल्टन म्युच्युअल फंडात समभाग विश्लेषक म्हणून काम केले आहे. त्यांनी दिल्ली विद्यापीठाची            वाणिज्य शाखेची पदवी तर वित्तीय व्यवस्थापन विषयात पदव्युत्तर पदवी घेतली आहे. ते यूटीआय मास्टर व्हॅल्यू फंड, यूटीआय मिडकॅप फंड, यूटीआय अपॉच्र्युनिटी फंड या योजनांचे निधी व्यवस्थापक आहेत.
 पर्याय: वृद्धी (ग्रोथ) व लाभांश (पे आउट व रिइन्व्हेंस्ट)
फंड खरेदीची पद्धती: यूटीआय म्युच्युअल फंडांच्या विक्रेत्या मार्फत अथवा म्युच्युअल फंडाच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने  या सदरातून अव्वल म्युच्युअल फंड योजनांची ओळख करून देताना वेळेचेही भान राखले जाते.  ३ फेब्रुवारी रोजी जाहीर झालेल्या पतधोरणात रेपो दर कपात न झाल्यामुळे परंतु भविष्यात होऊ घातलेल्या दर कपातीचे भान राखून ‘अ‍ॅक्सिस कॉन्स्टंट मॅच्युरिटी टेन इयर फंडा’त गुंतवणूक करण्याची शिफारस का फायद्याची होती हे मागील आठवड्यात रिझव्‍‌र्ह बँकेने रेपो दर कमी केल्याने वाचकांनी अनुभवले असेल.    
जे कोणी गुंतवणूकदार तुलनेने सुरक्षित गुंतवणुकीचा विचार करीत असतील अशा प्रकारच्या गुंतवणूकदारांसाठी हा फंड आदर्श गुंतवणुकीचा पर्याय ठरु शकेल. यूटीआय इक्विटी फंड हा प्रामुख्याने लार्ज कॅप प्रकारच्या समभागात गुंतवणूक करणारा फंड आहे. वेगवेगळ्या आíथक आवर्तनात या फंडाने तुलनेसाठी निवडलेल्या निर्देशांकापेक्षा अव्वल परतावा दिला आहे. या फंडाने गुंतवणूकदारांना दिलेल्या तिमाही परताव्याचा दर निर्देशांकाच्या परताव्याच्या दरापेक्षा चार ते पाच टक्क्यांनी अधिक आहे. २०१० पासूनच्या परताव्याच्या दराची वार्षकि चलत सरासरी (अ‍ॅन्युअल रोिलग रिटर्न्‍स) निर्देशांकाच्या दराच्या वार्षकि चलत सरासरीपेक्षा अधिक आहे. तर घसरत्या निर्देशांक वर्षांतील २००९, २०११, २०१३ मधील परताव्याची वार्षकि चलत सरासरी निर्देशांकातील घसरणीपेक्षा कमी आहे.
३० जानेवारीच्या गुंतवणूक पत्रकानुसार योजनेने एकूण १८ प्रकारच्या उद्योगक्षेत्रात गुंतवणूक केली आहे. सर्वाधिक २३.३८ टक्के गुंतवणूक बँकांच्या समभागात आहे. या बँकांच्या गुंतवणुकीत स्टेट बँक, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा सारख्या राष्ट्रीयीकृत बँका, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, अ‍ॅक्सिस बँक सारख्या खासगी बँका आढळतात. अशीच विविधता वाहन उद्योगातील गुंतवणुकात आढळते. मारुती, टाटा मोटर्सच्या जोडीने आयशर मोटर्स व अव्वल परंतु सहसा म्युच्युअल फंडांच्या गुंतवणुकीत न आढळणारा एसएमएल इसुझू सारखा समभाग असणे हा निधी व्यवस्थाकाचा द्रष्टेपणा दर्शवतो. योजनेच्या एकूण मालमतेच्या सव्वा टक्के गुंतवणूक बँकांच्या मुदत ठेवीत गुंतविलेली होती. ३० जानेवारी रोजी फंडाच्या गुंतवणुकीत एकूण ७० समभाग होते. पहिल्या पाच समभागातील गुंतवणुकीचे प्रमाण २३.९७ टक्के तर पहिल्या दहा समभागांच्या गुंतवणुकीचे प्रमाण ३८.७८ टक्के आहे. या प्रकारच्या गुंतवणूक पद्धतीमुळे एकाच प्रकारच्या कंपनीत अथवा उद्योगक्षेत्रावर केंद्रीकरणाचा धोका टळला आहे. या फंडाला मॉíनग स्टारने ‘फाईव्ह स्टार रेटिंग’ दिले आहे तर क्रिसिल रॅकिंगनुसार सप्टेंबर-डिसेंबर २०१४ तिमाहीत हा फंड दुसऱ्या क्रमांकावर असून मागील पाच वर्षांपासून प्रत्येक तिमाहीत हा फंड क्रिसिल रॅकिंगनुसार पहिल्या तीन क्रमांकात आपले स्थान टिकवून आहे. यामुळे निर्देशांक उच्चांकी स्तरावर असताना नवीन एसआयपी सुरु करण्यासाठी हा फंड योग्य वाटतो.
mutualfund.arthvruttant@gmail.com