सप्टेंबर ३०, २०१२ रोजी संपणाऱ्या तिमाहीसाठी टेकप्रो सिस्टीम्स लि.ने गत वर्षीच्या तुलनेत विक्रीत ३०% वाढ साध्य करून अपेक्षित निकाल जाहीर केला आहे. १५.१% ऑपरेटिंग मार्जन्सिमुळे ढोबळ नफा ५० टक्क्यांनी वाढला असला तरीही व्याज आणि घसाऱ्यामुळे नक्त नफ्यात आधीच्या वर्षांच्या तुलनेत ४५ टक्क्यांचीच वाढ होऊन तो १२.४७ कोटी रुपयांवर गेला आहे. यंदाच्या आíथक वर्षांच्या पहिल्या सहामाहीत कंपनीकडे १,४०९ कोटी रुपयांच्या नवीन ऑर्डर्स मिळाल्या आहेत. आजच्या तारखेला कंपनीकडे एकूण ४,६४० कोटी रुपयांच्या ऑर्डर्स आहेत. कोल आणि अॅश हँडिलगचे तंत्रज्ञान केवळ टेकप्रोकडे असल्याने एनटीपीसी, एनएमडीसी, भेल आदी सरकारी नवरत्न कंपन्यांकडून तसेच ऊर्जा क्षेत्रातील अन्य कंपन्यांकडून येती दोन वष्रे मोठ्या ऑर्डर्स मिळण्याची शक्यता आहे. यंदाच्या वर्षांत कंपनी ३२०० कोटी रुपयांच्या उलाढालींवर १२० कोटींचा नफा कामावेल अशी अपेक्षा आहे. पुढील वर्षी साधारण २५-३०% वाढीने कंपनीची घोडदौड चालूच राहील. यातून नक्त नफा १४० कोटी रुपयांवर निश्चितच जाईल. कर्जे आणि व्याजाचा भार कमी करण्यासाठी कंपनीने काही प्रकल्पांसाठी ‘लेटर ऑफ क्रेडिट’ पद्धत अवलंबिली आहे तसेच रिझव्र्ह बँकेच्या आगामी पातधोरणात व्याजदरात कपातीचीही अपेक्षा आहे. याचा सकारात्मक परिणाम लवकरच दिसायला हवा! बॅलेन्स ऑफ प्लान्ट (इढ) प्रकल्पांमध्ये वाकबगार असलेल्या टेकप्रोला लॅन्को इन्फ्रा, जीव्हीके, पूंज लॉंईड इत्यादी कंपन्यांकडून मोठी कंत्राटे मिळाली आहेत. सध्या केवळ सहाच्या आसपास पी/ई गुणोत्तर असलेला आणि पुस्तकी मूल्याला उपलब्ध असलेला हा शेअर मध्यम ते दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी योग्य वाटतो.     

टेकप्रो सिस्टीम्स लिमिटेड     रु. १५१.४५
मुख्य व्यवसाय     :    इंजिनीयरिंग
भरणा झालेले भागभांडवल     :    रु. ५०.४७ कोटी
प्रवर्तकांचा हिस्सा     :    ५२.६३%
दर्शनी मूल्य     :     रु. १०    
पुस्तकी मूल्य     :     रु. १५०    :    रु. २५.९
किंमत/उत्पन्न गुणोत्तर (पी/ई)    :    ६.२ पट
वर्षभरातील उच्चांक/नीचांक   :   रु. २११/१२३

अजय वाळिंबे walimbeajay@yahoo.com