आशीष ठाकूर  ashishthakur1966@gmail.com

या  स्तंभातील गेल्या दोन लेखातून एक वाक्य सतत अधोरेखित केले गेले आहे. निर्देशांकाच्या वरच्या दिशने सुरू असलेल्या जलद वाटचालीला अनुलक्षून आलेले ते वाक्य म्हणजे.. सर्व काही आलबेल चालू आहे, अशा थाटाच बाजाराच वर्तन आहे. हीच सावध व्हायची वेळ आहे.

येणाऱ्या दिवसात सेन्सेक्सवर ३१,७०० आणि निफ्टीवर ९,३०० हा अवघड टप्पा आहे. या स्तरावरून एक घसरण अपेक्षित असून जिचे खालचे लक्ष्य हे सेन्सेक्सवर ३०,७०० आणि निफ्टीवर ९,००० असे असेल.. या वाक्याची प्रचीती आपण सरलेल्या सप्ताहात घेतली. या पार्श्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळू या.

शुक्रवारचा बंद भाव :

सेन्सेक्स: ३१,३२७.२२/निफ्टी : ९,१५४.४०

निर्देशांकाला सेन्सेक्सवर ३१,७०० आणि निफ्टीवर ९,३०० चा स्तर पार करण्यास वारंवार अपयश येत असल्याने आता तेजीची आशा मावळत चालली आहे. आताच्या घडीला निर्देशांकाला सेन्सेक्सवर ३०,३०० आणि निफ्टीवर ८,९०० चा भरभक्कम आधार आहे. हा स्तर राखल्यास पुन्हा सेन्सेक्सवर ३१,७०० आणि निफ्टीवर ९,३०० पर्यंतची सुधारणा असेल.

उपरोक्त स्तर जरी पार केला तरी त्याची संभावना ही.. दिव्याची ज्योत ही विझण्याअगोदर मोठी होते, अशाच धाटणीची असेल. कदाचित सेन्सेक्सवर ३२,८०० आणि निफ्टीवर ९,६०० चा स्तरही दिसेल; पण जोपर्यंत निर्देशांकावर २८,५०० आणि निफ्टीवर ८,३००च्या स्तरावर पायाभरणी होत नाही, तोपर्यंत निर्देशांकावर शाश्वत, दीर्घकालीन तेजीची शक्यता धूसरच आहे.

आगामी तिमाही निकालांचा वेध..

१) अंबुजा सिमेंट

* तिमाही निकाल – सोमवार, २७ एप्रिल

* २४ एप्रिलचा बंद भाव – रु. १६७.९५

* निकालानंतर महत्वाचा केंद्रबिंदू स्तर – १६० रुपये

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून १६० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य १८० रुपये. भविष्यात १६० रुपयांचा स्तर सातत्याने राखल्यास २०० रुपयांच्या लक्ष्याकडे वाटचाल.

ब) सर्वसाधारण निकाल : १६० ते १८० रुपयांच्या पट्टयात वाटचाल.

क) निराशादायक निकाल : १६० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत १४० रुपयांपर्यंत घसरण.

२) अ‍ॅक्सिस बँक लिमिटेड

* तिमाही निकाल – मंगळवार,२८ एप्रिल

* २४ एप्रिलचा बंद भाव – रु. ४०४.१०

* निकालानंतर महत्वाचा केंद्रबिंदू स्तर – ४०० रुपये

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ४०० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ४४० रुपये. भविष्यात ४०० रुपयांचा स्तर सातत्याने राखल्यास ४८० रुपयांच्या लक्ष्याकडे वाटचाल,

ब) सर्वसाधारण निकाल : ४०० ते ४४० रुपयांच्या पट्टयात वाटचाल.

क) निराशादायक निकाल : ४०० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ३२५ रुपयांपर्यंत घसरण.

३) हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड

* तिमाही निकाल – गुरुवार,३० एप्रिल

* २४ एप्रिलचा बंद भाव – रु. २,२८२.९०

* निकालानंतर महत्वाचा केंद्रबिंदू स्तर – २,००० रुपये

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून २,००० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य २,५०० रुपये. भविष्यात २,००० रुपयांचा स्तर सातत्याने राखल्यास २,८००रुपयांच्या लक्ष्याकडे वाटचाल.

ब) सर्वसाधारण निकाल : २,००० ते २,५०० रुपयांच्या पट्टयात  वाटचाल.

क) निराशादायक निकाल : २,००० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत  १,७५० रुपयांपर्यंत घसरण.

४) टेक महिंद्र लिमिटेड

* तिमाही निकाल – गुरुवार,३० एप्रिल

* २४ एप्रिलचा बंद भाव – रु. ५०३.५५

* निकालानंतर महत्वाचा केंद्रबिंदू स्तर – ४७० रुपये

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ४७० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ५३० रुपये. भविष्यात ४७० रुपयांचा स्तर सातत्याने राखल्यास ५८० रुपयांच्या लक्ष्याकडे वाटचाल.

ब) सर्वसाधारण निकाल : ४७० ते ५३० रुपयांच्या पट्टयात वाटचाल.

क) निराशादायक निकाल : ४७० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ४५० रुपयांपर्यंत घसरण.

समभाग संच बांधणीचे निकष :

१९६०च्या दशकात ‘मै ज़िंन्दगी का साथ निभाता चला गया, हर फिम्क्रको धुएँ मे उडाता चला गया’ असं देव आनंदवर चित्रित केलेल हे गाणे, आजही कॉलेजबाहेरच्या कट्टय़ांवर कटिंगसोबत, सिगारेटच्या धुरांच्या वलयात, आपले भावी वलयांकित आयुष्य शोधणारी युवा पिढी, या दोहोंमधला समान दुवा ही सिगारेट आहे. हाच धागा पकडत सिगारेटचे उत्पादन करणारी इंडियन टोबँको कंपनी ही समभाग संचबांधणीतला तिसरा समभाग आहे.

प्रत्येक जाहिरातीत धूम्रपान हे आरोग्यास हानीकारक आहे, हा इशारा छापणे बंधनकारक केल्याच्या अगोदरपासूनच, या कंपनीने एकाच उत्पादनावर अवलंबून राहणे कंपनीस हितकारक नाही हे जाणवले. जाणीवपूर्वक विविध उद्योगांमध्ये विस्तार योजना अवलंबण्यास तिने सुरुवात केली. याची सुरुवात कंपनीच्या नावातील प्रत्येक शब्दातील आद्याक्षर घेत आयटीसी असे आकर्षक नामाभिधान घेत भारतातील विविध राज्यात पंचतारांकित हॉटेल्स,जसे की मुंबईत आयटीसी ग्रँड मराठा, कागद उद्योगातील क्लासमेटच्या वह्य, सौंदर्यप्रसाधन, विविध बिस्किट, नुडल्स, सॅवलॉन जंतुनाशक, फळांचे रस, प्रक्रिया केलेले दूध,आताच्या संचारबंदीच्या काळातील जीवनावश्यक असलेली विविध आशीर्वाद पीठ. असा हा कंपनीचा हानीकारक ते हितकारक असा जाणीवपूर्वक झालेल्या प्रवासामुळे आयटीसी ही भारतीय बनावटीची बहुराष्ट्रीय कंपनी (एमएनसी) म्हणून नावारूपाला आली आहे.

लेखक भांडवली बाजार विश्लेषक

अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक .