सुधीर जोशी sudhirjoshi23@gmail.com

नवीन वर्षांचे उत्साहपूर्ण स्वागत करीत बाजाराने गेल्या सप्ताहाची सुरुवात दणक्यात केली. ओमायक्रॉनचे वाढते आकडे व वाहन क्षेत्राचे घसरलेले उत्पादन यांना अवाजवी महत्त्व दिले गेले नाही. निर्मिती क्षेत्राच्या पीएमआय निर्देशांकाची डिसेंबर महिन्यातील समाधानकारक पातळी आणि नऊमाही निर्यातीने प्रथमच गाठलेला ३०० अब्ज डॉलरचा टप्पा बाजारासाठी सकारात्मक ठरला. बँक निफ्टीच्या सहभागाने बाजाराने सलग तिसऱ्या सप्ताहात तेजीची वाट धरली.

Municipal Corporation ignoring quakes in navi mumbai delayed in making rule for builders
नवी मुंबई : हादऱ्यांच्या मालिकेकडे महापालिकेचा काणाडोळा, बिल्डरांच्या सोयीसाठी नव्या नियमावलीला मुहूर्त सापडेना
Bengaluru firm workers hire goons to beat strict colleague arrested video viral
कामाचा दबाव टाकणाऱ्या व्यवस्थापकाला कर्मचाऱ्यांनी गुंडांच्या मदतीने केली बेदम मारहाण; पाहा धक्कादायक Video
5 Crore and 45 lakh embezzlement in Nandura Urban Bank
नांदुरा अर्बन बँकेत साडेपाच कोटींचा अपहार, कर्मचाऱ्यांनी ऑनलाईन…
Ola Uber Pune
ओला, उबरवरील कारवाईला ‘ब्रेक’! आरटीओचे एक पाऊल मागे; कारण काय…

माहिती तंत्रज्ञान कंपन्या: अ‍ॅक्सेंच्युअरने भविष्यातील कामगिरीबाबत दिलेल्या संकेतांमुळे माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांकडून अपेक्षा वाढल्या आहेत. या सप्ताहात या क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांच्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर होतील. जरी डिसेंबरअखेरचे तीन महिने हा सुटय़ांचा काळ असून तुलनेने कमी उलाढालीचा असला तरी डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण या कंपन्यांच्या पथ्यावर पडेल. मोठय़ा कंपन्यांकडून ३ ते ४ टक्के तर मध्यम कंपन्यांकडून ५ ते ६ टक्के उत्पन्न वाढ अपेक्षित आहे. टीसीएस, इन्फोसिस व विप्रो सारख्या कंपन्यांजवळ असलेल्या रोकड जमेचे प्रमाण बघता समभागांच्या पुनर्खरेदीच्या घोषणा होऊ शकतात.

पोलाद कंपन्या: गेल्या तीन महिन्यांत निफ्टी एक टक्क्याने घसरला असला तरी बाजारातील धातू क्षेत्राचा निर्देशांक साडेतीन टक्क्यांनी घसरला आहे. हिवाळी ऑिलपिकच्या तयारीचा भाग म्हणून चीनने प्रदूषण रोखण्यासाठी कारखान्यांवर निर्बंध आणले आहेत. त्यामुळे चीनचे पोलाद उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. भारतातील पोलाद कंपन्यांनी किमतीत वेळोवेळी वाढ केली आहे तसेच कर्ज फेड करून नफाक्षमता वाढविली आहे त्याचा परिणाम गेल्या सहा महिन्यांच्या निकालात पाहायला मिळाला होता. त्यामुळे सध्याच्या घसरलेल्या भावात टाटा स्टील, जेएसडब्ल्यू स्टीलसारख्या कंपन्यांतील गुंतवणूक माफक कालावधीत फायदा मिळवून देईल.

एचडीएफसी बँक: एचडीएफसी बँकेने डिसेंबरअखेर तिमाहीची आकडेवारी जाहीर केली. बँकेच्या कर्ज वितरणात गेल्या वर्षांच्या तुलनेत १६ टक्के तर गेल्या तिमाहीच्या तुलनेत पाच टक्के वाढ झाल्याचे ही आकडेवारी सांगते. बँकेचा ‘कासा रेशो’ सुध्दा ४७ टक्के असा मजबूत आहे. गेल्या वर्षी बँकेच्या कार्ड व्यवसायावर घातलेले निर्बंध व करोनाचे कर्ज वसुलीवरील परिणाम यामुळे बँकेच्या समभागाने माफक कामगिरी केली होती. पण आता दोन्ही कारणे दूर झाली आहेत. बँकेची व्यवसाय वृद्धी बघता या वर्षी हा समभाग दोन हजाराचा टप्पा गाठू शकतो.

बामर लॉरी: ही एक सरकारी मालकीची मिनी रत्न प्रकारातील बहुउदेदशीय कंपनी आहे जी देशात अनेक ठिकाणी औद्योगिक पॅकेजिंग, चर्म उद्योगासाठी लागणारी रसायने, चहा, ग्रीस, प्रवासी सेवा व पर्यटन असे विविध व्यवसाय करते. देशातील स्टील बॅरल, कंटेनर बनविणारी ही सर्वात मोठी कंपनी आहे. कंपनी कर्जमुक्त असून तिचा लाभांश वाटपाचा इतिहास चांगला आहे. कंपनीच्या व्यवसायात धिम्या गतीने वाढ होत असली तरी सरकारच्या निर्गुतवणूकीच्या  धोरणाचा भविष्यात या कंपनीला फायदा होईल. थोडय़ा जास्त कालावधीसाठी एक कमी जोखमीची गुंतवणूक म्हणून या कंपनीकडे पाहता येईल.

फाईन ऑरगॅनिक: ही एक ओलिओकेमिकल्स बनविणारी जगातील आघाडीची कंपनी आहे जी कमी-कार्बन उच्च तंत्रज्ञानावर आधारित रासायनिक उत्पादने बनविते. कंपनीकडे ४५० हून अधिक उत्पादने आहेत जी आईसक्रीम, बेकरी, चॉकलेट्स, तयार अन्नपदार्थ उत्पादनात, क्रीम, लोशन्ससारख्या सौंदर्य उत्पादनात, फूड ग्रेड पॅकेजिंग तसेच पेट पॉलिमर उत्पादनात वापरली जातात. कंपनीला स्पर्धात्मक आव्हाने कमी आहेत. सध्याची उत्पादन क्षमता पुढील तीन वर्षांसाठी पुरेशी आहे. त्यामुळे नजीकच्या काळात भांडवली खर्च संभवत नाही. मागील पाच वर्षांत मिळकतीत सरासरी १२ टक्के तर नफ्यात २५ टक्के वाढ झाली आहे. सध्याचा बाजारभाव गुंतवणुकीसाठी आकर्षक आहे.

बाजाराने तीव्र स्वरूपाच्या अस्थिरतेची एक झलक गेल्या सप्ताहात दाखविली. २०२२ वर्षांची सुखद सुरुवात करून पहिले तीन दिवस उत्साहात गेले. बुधवारी अमेरिकन फेडरल रिझव्‍‌र्हने वाढत्या महागाईबद्दल, घसरलेल्या रोजगार उपलब्धतेबद्दल चिंता व्यक्त केली व या वर्षांत उत्पादनात टाळेबंदीमुळे अडथळे येऊ शकण्याचे आडाखे बांधले. लगेचच त्याचा परिणाम अमेरिकी व भारतीय बाजारावर झाला. भारतीय बाजारातील अस्थिरतेचा निर्देशांक (व्हिक्स) १० टक्यांनी वाढला. बाजाराच्या प्रमुख निर्देशांकात गुरुवारी घसरण झाली. पुढील काही आठवडे कंपन्यांचे निकाल, केंद्रीय अर्थसंकल्पाच्या चर्चा व ओमायक्रॉनचे वाढते आकडे यामुळे बाजारात अस्थिरता कायम राहण्याची चिन्हे आहेत.

सप्ताहातील या घडामोडींकडे लक्ष ठेवा

* माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील टीसीएस, एचसीएल टेक्नोलॉजी, विप्रो, इन्फो एज  या कंपन्या डिसेंबरअखेर समाप्त तिसऱ्या तिमाहीचे निकाल व अंतरिम लाभांश जाहीर करतील.

* इन्फोसिस, माईंडट्री, टाटा मेटॅलिक व एचडीएफसी बँक या कंपन्या डिसेंबरअखेर समाप्त तिमाहीचे निकाल जाहीर करतील.

* गेल्या महिन्यांत प्राथमिक समभाग विक्री केलेल्या काही कंपन्यांमधील आरंभिक गुंतवणूकदारांच्या (अँकर इन्व्हेस्टर्स) विक्रीवरील बंधनाची एक महिन्याची मुदत या सप्ताहात संपत आहे. – आनंद राठी (१० जानेवारी), रेट गेन व श्रीराम प्रॉपर्टीज (१४ जानेवारी) या दिवशी समभागांवर विक्रीचा दबाव येऊ शकतो.

* इझी ट्रीप प्लॅनर्स बक्षीस समभागांची (बोनस) घोषणा करणार *   भारताच्या किरकोळ महागाई निर्देशांकाचे आकडे