आशीष ठाकूर ashishthakur1966 @gmail.com

गेल्या लेखात व्यक्त केलेली महागाईची भीती लेखाची शाई वाळते न वाळते तोच प्रत्यक्षात आली. मार्चमध्ये घाऊक महागाई दर हा ७.३९ टक्के होता तो मे महिन्यात १२.९४ टक्क्य़ांवर पोहोचला. हे निमित्त पुढे करत अपेक्षित असलेली सेन्सेक्सवरील ५१,६०० आणि निफ्टीवरील १५,४५० पर्यंतची हलकीफुलकी घसरण येऊन गेली. या पार्श्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळू या.

शुक्रवारचा बंद भाव : सेन्सेक्स : ५२,३४४.४५ / निफ्टी : १५,६८३.३५

राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय घटना या सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेरच्या असतात. यातील मंदीची ज्ञात कारणे.. अर्थसंकल्पीय वित्तीय तूट, खनिज तेलाच्या वाढणाऱ्या किमती, किंबहुना उकळत्या तेलाला ‘अडाणीं’ची खमंग फोडणी वगैरे. या मंदीच्या ज्ञात कारणांचा अतिशय खुबीने वापर करून घेत, निर्देशांकाच्या उच्चांकावरून अर्थात सेन्सेक्सवर ५२,८७० आणि निफ्टी निर्देशांकाच्या १५,९०० च्या उच्चांकावरून अपेक्षित असलेली हलकी-फुलकी घसरण आली. ज्याचा फायदा सामान्य गुंतवणूकदाराला झाला. या तेजीच्या बाजारात त्यांना सेन्सेक्सवर ५१,६०० आणि निफ्टी निर्देशांकावर १५,४५० च्या स्तरावर स्वस्तात खरेदीची संधी उपलब्ध करून दिली गेली. हे सरलेल्या सप्ताहातील निर्देशांकाच्या वाटचालीचे वैशिष्टय़ म्हणावे लागेल.

येणाऱ्या दिवसात सेन्सेक्सवर ५१,६०० ते ५०,४५० आणि निफ्टीवर १५,४५० ते १५,१५० चा भरभक्कम आधार असेल. हा स्तर राखण्यात निर्देशांक यशस्वी ठरल्यास निर्देशांकांचे वरचे लक्ष्य हे सेन्सेक्सवर ५२,८७० ते ५४,००० आणि निफ्टीवर १५,९०० ते १६,२०० असेल. या स्तरावर अल्प मुदतीची गुंतवणूक धारणा असलेल्या गुंतवणूकदारांनी नफारूपी विक्री करणे श्रेयस्कर.

निकालपूर्व विश्लेषण

१) भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (बीईएल)

’ तिमाही वित्तीय निकाल – मंगळवार, २२ जून

’ १८ जूनचा बंद भाव – १४६.२५ रु.

’  निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – १४० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून १४० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य १५५ रुपये, द्वितीय लक्ष्य १७० रुपये.

ब) निराशादायक निकाल : १४० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत १२५ रुपयांपर्यंत घसरण.

२) मॅक्स इंडिया लिमिटेड

’  तिमाही वित्तीय निकाल – मंगळवार, २२ जून

’ १८ जूनचा बंद भाव – ७२.१५ रु.

’ निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – ६८ रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ६८ रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ८० रुपये, द्वितीय लक्ष्य ९५ रुपये.

ब) निराशादायक निकाल : ६८ रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ५५ रुपयांपर्यंत घसरण.

३) एनएमडीसी लिमिटेड.    

’  तिमाही वित्तीय निकाल – मंगळवार, २२ जून

’  १८ जूनचा बंद भाव – १७८.१५ रु.

’  निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – १७० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून १७० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य १९५ रुपये, द्वितीय लक्ष्य २१० रुपये.

ब) निराशादायक निकाल : १७०चा स्तर तोडत १४५ पर्यंत घसरण.

४) शोभा लिमिटेड

’  तिमाही वित्तीय निकाल – मंगळवार, २२ जून

’ १८ जूनचा बंद भाव – ४९९.२० रु.

’ निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – ४९० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ४९० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ५४० रुपये, द्वितीय लक्ष्य ५९० रुपये.

ब) निराशादायक निकाल : ४९० चा स्तर तोडत ४४५ पर्यंत घसरण.

५) अपोलो हॉस्पिटल एंटरप्राइसेस लिमिटेड

’  तिमाही वित्तीय निकाल – बुधवार, २३ जून

’ १८ जूनचा बंद भाव – ३,२२१.९० रु.

’  निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – ३,२०० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ३,२०० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ३,४०० रुपये, द्वितीय लक्ष्य ३,६०० रुपये.

ब) निराशादायक निकाल : ३,२०० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ३,००० रुपयांपर्यंत घसरण.

६) अशोक लेलँड लिमिटेड

’ तिमाही वित्तीय निकाल – गुरुवार, २४ जून

’ १८ जूनचा बंद भाव – ११६.५० रु.

’ निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – १२० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून १२० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य १३५ रुपये, द्वितीय लक्ष्य १५० रुपये.

ब) निराशादायक निकाल : १२० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत १०५ रुपयांपर्यंत घसरण.

लेखक भांडवली बाजार विश्लेषक

अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.