चित्र हे पाहणाऱ्याच्या मनात असते असे म्हणतात. मग कदाचित इतर कुणाला तरी त्यात आणखीनच वेगळे काही भासते का? आणि चित्रकार ते साकारतो तेव्हा त्य़ाला स्वतला नेमके काय वाटत असते?

रेल्वेची खिडकी, आतमध्ये या खिडकीला टेकून एक जण निद्राधीन झालेला, दुसरी व्यक्ती बाहेर पाहतेय, पलीकडच्या बाकावर खिडकीकडे तोंड करून बसलेली महिला आणि खिडकीच्या गजांबाहेर  तुलनेने तरुण दिसणारा चेहरा; तो दरवाजाच्या फूटबोर्डवर उभा राहून प्रवास करणाऱ्या मुलाचा असावा. शहरी जीवनाचे हे असे अनोखे पदर असलेले चित्र पाहिल्यानंतर आपल्याला ‘बाहेरचे आणि आतले’ हा ललितनिबंध आठवतो. बाहेर असलेल्यांना सतत वाटत असते की, आतील सारे सुखी आहेत आणि ‘बाहेरचे’ सारे आतमध्ये त्या रेल्वे डब्यात शिरण्यासाठी प्रयत्न करीत असतात. आतमध्ये शिरले, स्थिरावले की, तेही ‘आतले’ होतात आणि मग बाहेरून आत ढकलणाऱ्यांच्या, शिरणाऱ्यांच्या विरोधात पुढच्या स्टेशनवर बोलू लागतात. दोन वेगळी जगं, त्यांना त्यांचे वेगळेपणही आहे आणि त्यांना जोडणारा एक दुवाही आहे. शहरी आयुष्याचं हे अनोखेपण त्या ललित निबंधाप्रमाणेच प्रसिद्ध चित्रकार गीव्ह पटेल यांच्या या चित्रामध्येही येतं.

Watch waiter’s priceless reaction to sketch artist's sweet surprise
न मिळालेल्या कौतुकाची पोचपावती! कलाकारानं हॉटेलच्या बिलवर रेखाटलं वेटरचं सुरेख चित्र; चेहऱ्यावर उमटलं सुंदर हास्य, Video Viral
jallianwala bagh 105 years
जालियनवाला बाग हत्याकांड : १०५ वर्षांपूर्वीच्या रक्तरंजित इतिहासाचे स्मरण! नक्की काय घडले त्या दिवशी?
istanbul fire
इस्तंबूलच्या नाईटक्लबमध्ये भीषण आग, २९ जणांचा होरपळून मृत्यू!
rbi commemorative coins
पंतप्रधान मोदींच्या हस्ते ९० रुपयांचे नाणे लाँच, RBI ला ९० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल गिफ्ट

गीव्ह पटेल यांचे दुसरे चित्र हे पूर्वीच्या मालिकेशी काही साधर्म्य असलेले असते. ‘लुकिंग इनटू द वेल.’ अशा प्रकारची त्यांची चित्रे आपण पाहिलेली असतात. विहिरीमधील प्रतिबिंब हा चित्रविषय. त्यात विविध भावावस्था येत राहतात. कधी कलणारा लालभडक झालेला मावळतीचा सूर्य तर कधी फुललेला वसंत. चित्रे पाहताना रसिकांना सतत असे वाटत राहते की, पुन्हा एकदा हे दोन भावावस्थांचेच चित्रण आहे का? यालाही एक ‘विहिरीबाहेर’ असलेल्याची व दुसरी विहिरीच्या त्या ‘पाण्यात आत’मध्ये असलेल्याची अशा दोन मिती आहेत का? की एकाच माणसाच्या आतील व बाहेरील अशा दोन भावावस्था?

चित्र हे पाहणाऱ्याच्या मनात असते असे म्हणतात. मग कदाचित इतर कुणाला तरी त्यात आणखीनच वेगळे काही भासते का? की यात आणखी काही खूप वेगळे दडलेले आहे? याबद्दल खुद्द चित्रकार गीव्ह पटेल यांना काय वाटते? या व अशा अनेक प्रश्नांच्या शोधासाठी गॅलरी मिरचंदानी स्टाइनऱ्हुकमध्ये सुरू असलेले गीव्ह पटेल यांचे प्रदर्शन पाहायला हवे! प्रश्नांचा शोध घेण्यासाठी मार्गदर्शक ठरणारी अशी एक दृकश्राव्य मुलाखतही इथे मोहिले पारिख सेंटरच्या सौजन्याने प्रदर्शन दालनातच ऐकता येते. अलीकडे अनेक गॅलऱ्यांनी केलेली ही सोय रसिकांसाठी खूप चांगली मार्गदर्शक ठरू शकते. नवीन काही समजून घेणे व नवीन प्रश्न पडणे या दोन्हींसाठी हे महत्त्वाचे आहे.

02-lp-art

गीव्ह पटेल यांच्या या पूर्वीच्या कलाकृती ज्यांनी पाहिलेल्या असतील त्यांना आणखीही काही प्रश्न पडलेले असू शकतात. कारण गीव्ह पटेल अनेकदा जीवनाच्या अनेकविध पैलूंना भिडताना, मृत्यू या एका महत्त्वाच्या पैलूकडे अधिक सरकलेले दिसतात. मृत्यूचा शोध-वेध हाही एक पैलू असतोच. मग प्रश्न मनात येतो की, रेल्वे डब्यातील त्या खिडकीचे चित्र त्याचे शीर्षक असते, फुटबोर्ड रनर. त्यातला तो खिडकीबाहेरचा चेहरा मृत्यूच्या अधिक जवळ जाणारा आहे का? कारण फुटबोर्डवर असलेल्या आणि मृत्युमुखात शिरलेल्या अनेक प्रवाशांच्या बातम्या आपण सातत्याने वाचलेल्या असतात. शिवाय पुढे आपल्याला आणखी तीन चेहरे दिसतात ‘शोकं’ करणारे. या चेहऱ्यांवर दु:ख आहे, ते दु:ख मृत्यूनंतरचे अधिक असावे.

आणखी काही चित्रे आहेत ती वृद्धांच्या चेहऱ्यांची. काही सुरकुतलेले, चेहऱ्यावरही वळ्या असणारे या सुरकुत्या कुठे संघर्षांच्या आहेत तर कुठे अनुभवाच्या आणि वाढत्या वयासोबत आलेल्या. काही चेहऱ्यांवर काहीसे खाचखळगेही जाणवावेत असे तर कुठे त्वचा काहीशी लोंबणारी. आजवरचे अनुभवाचे अनेक पदर आणि त्यामधली मानवी आद्र्रतादेखील. हे सारे पटेल यांच्या चित्रातून येते तेव्हा पुन्हा जाणवते की, हे पैलतीराच्या प्रवासाला निघालेले चेहरे आहेत. ते सारे येतात ते गीव्ह यांच्या अप्रतिम शैलीतून. ती शैली पाहण्यासारखी आहे. कमी-अधिक जाडीच्या रंगलेपनातून ते चेहरे जिवंत करतात. सोबत एक असेही चित्र आहे की, जे अर्धवट अवस्थेतील आहे. चित्र आता समजून घेणे आणि ते पूर्ण झाल्यानंतर आपल्यासमोर पुन्हा आणखी एका प्रदर्शनात समोर येईल तेव्हा समजून घेणे ही आपल्यासारख्या रसिकांसाठीही एक प्रक्रियाच असणार आहे, कलावंताची चित्रप्रक्रिया समजून घेण्याची! या अनोख्या संधींसाठी हे प्रदर्शन पाहायला हवे!

(मुंबईमध्ये ताजमहाल हॉटेलच्या मागच्या गल्लीमध्ये असलेल्या सनी हाऊसमध्ये पहिल्या मजल्यावर असलेल्या दालनातील हे प्रदर्शन १८ मार्चपर्यंत पाहता येईल.)
विनायक परब – vinayak.parab@expressindia.com
@vinayakparab