28 March 2020

News Flash

निंबोणीच्या झाडामागे…

गुढीपाडवा आला की आपल्याला आठवण होते ती कडुलिंबाची. हे अस्सल भारतीय, बहुगुणी झाड आहे.

गुढीपाडवा आला की आपल्याला आठवण होते ती कडुलिंबाची. हे अस्सल भारतीय, बहुगुणी झाड आहे. कडुनिंब आणि कढीलिंब यातला आपला गोंधळ तर नेहमीच मनोरंजक असतो.

आज चत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा. एका संवत्सरातून दुसऱ्या संवत्सरात प्रवेश करायचा दिवस. अर्थातच मराठी नवीन वर्षांरंभ. फाल्गुन संपून चत्रात प्रवेशणारा निसर्ग जणू उत्साहाने सळसळलेला असतो. आसमंतात या उत्साहाचं िबब सगळीकडे दिसत असतंच. नववर्षांच्या स्वागताला एका झाडाचं महत्त्व अचानक जाणवतं. गुढीपाडवा आणि हे झाड यांचं जणू अतूट समीकरणच बनलेलं असतं. लक्षात आलं असेलच की मी बोलतेय कडुिनबाबद्दल! गुढीला बांधायला, शास्त्रापुरती का होईना, निदान चार पानं तोंडात टाकायला याची आठवण हमखास होते. आपल्या देशात सर्वत्र आढळणारं सदाहरित प्रकारात गणलं जाणारं हे झाड जिथली हवा कोरडी असते, तिथे चक्क पानझडी बनून जोमानं वाढतं. देशात बहुतांश राज्यांमध्ये हे आढळत असल्याने बहुतेक सर्व भाषांमध्ये या झाडाला विविध नावे दिली गेली आहेत. मायबोलीत कडुिनब म्हणून ओळखलं जाणारं हे झाड िहदीत िनब म्हणून ओळखलं जातं. कडुिनब माहीत नसलेली व्यक्ती विरळाच म्हणावी लागेल नाही! तरीही या झाडाचं वर्णन करायचं झालं तर याला साधारण मध्यम ते मोठय़ा आकाराचं म्हणता येऊ शकतं. ‘मेलिएसी’ कुटुंबातल्या पंधरा ते वीस मीटर उंच होणाऱ्या या झाडाबद्दल लिहावं तितकं कमीच ठरेल.

63-lp-kadu-nimbबहुतांश झाडांच्या नावात त्यांचं मूळ स्थान आढळतं. म्हणूनच, ‘अ‍ॅझ्ॉडिरॅक्टा इंडिका’ या वनस्पतीशास्त्रीय नावातच कडुिनबाचं शंभर टक्के भारतीयपण सामावलंय. वर्षभर अंगावर कातरलेल्या झिरमिळ्यांची पानं मिरवणाऱ्या या झाडाच्या फांद्या खोडापासून जरा उंच झाल्यावरच फुटतात. वर्षभर याला नवीन पालवी फुटत राहते नि जुनी पानं गळत राहतात. मात्र हे प्रमाण वसंतात म्हणजेच साधारण मार्चमध्ये जास्त असतं. याची पानं साधारण पंधरा ते वीस सेंमी आकाराची, मस्त तजेलदार हिरव्या रंगाची असतात. जसजशी ही पानं जून होतात तसतसा यांचा रंग काळपट हिरवा होत जातो. मग ही गळून पडतात. कडुिनबाची पानं हवेत जास्त प्राणवायू सोडतात असं पूर्वापार समजत आल्याने घराजवळ, बागेत हे झाड न चुकता लावलं जातं. मला आठवतंय, माझी आज्जी न चुकता गुढीपाडव्याला कडुिनबाची पानं आणि गुळाची गोळी बनवून खायला लावायची. का? तर याने पोटातल्या कृमी मरतात नि पचनसंस्था सुधारते. निव्वळ वैताग वाटायचा या गोष्टीचा लहान असताना, पण आज या प्रथेचं महत्त्व जाणवतंय. कडुिनबाच्या पानांचं सुबक देखणी पानं म्हणून कौतुक करावं तर या पानांच्या जोडीला चत्रात जेव्हा झाडावर फुलं येतात ना, तीही खूप सुंदर दिसतात. वरून खाली येणाऱ्या घोसातली, लहानशी, पाच पाकळ्यांची चांदणं फुलं अगदी पाहत राहावी अशीच असतात. मार्च ते मे आणि पावसाळा या काळात, साधारण पिवळट रंगाची ही फुलं पानांच्या आड येतात म्हणून चटकन दिसत नाहीत. यांचा वास अगदी भन्नाट गोड असतो. याच गोड सुवासामुळे त्यांच्याकडे किडेमकोडे आकर्षति होतात. संध्याकाळ झाली की आसमंतात या फुलांचा अक्षरश: धुंद वास पसरायला सुरुवात होते. या सुगंधी फुलांचं पुढचं स्थित्यंतर असतं फळ. कडुिनबाच्या फळाला िनबोणी म्हणून ओळखलं जातं. तीच ती िनबोणी.. ‘िनबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई’ गाण्यातली. लहान असताना हिरव्या, पिकायला लागल्यावर पिवळ्या होणाऱ्या या िनबोण्या लांबट आकाराच्या असतात. मी तर सांगेन, संधी मिळाली तर जरूर या िनबोण्या खाऊन पाहायला हरकत नाही. पिकायला लागल्यावर, साधारण गोडसर कडसर तुरट चवीची ही फळं खायला पक्षी गर्दी करतात. िनबोणीचा तंतूमय पांढरा पिवळा गर नि गोड रस पक्ष्यांना आणि कीटकांना भरपूर आवडतो. पावसाळा संपला की या िनबोण्यांना कुजट उग्र वास यायला सुरुवात होते आणि हळूहळू त्या गळून पडायला सुरुवात होते.

62-lp-kadu-nimbकधी तरी वाटतं की मनुष्य स्वभाव खरंच विचित्रच. प्रत्येक गोष्टीचा स्वत:ला उपयोग काय? हे तपासून पाहणारा नि मग त्याच्यावर तुटून पडणारा. निसर्गात मात्र उपयोगाचे मोजमाप साधारण त्या झाडाचे कुठले भाग सभोवतालासाठी उपयोगी आहेत याच्यावर ठरवलं तर कडुिनबाचे पान, फळ, फूल, साल, लाकूड, मूळ.. कचरा असे सगळेच भाग शंभर टक्के उपयोगी आहेत. या झाडाचं लाकूड जड असतं नि कुठल्याही प्रकारची कीड त्याला लागत नाही. होडय़ा बनवण्यासाठी, कुंपणाचे खांब, वल्ही बनवण्यासाठी याचा खास उपयोग केला जातो. कीड न लागण्याच्या याच गुणधर्मामुळे, रथयात्रेसाठी प्रसिद्ध असलेला पुरीच्या जगन्नाथाचा रथसुद्धा याच लाकडाचा बनवलेला आहे. याच्या कोवळ्या काटक्यांत असलेला रस हिरडय़ांना, दातांना उत्तम समजला जातो. म्हणूनच कडुिनबाच्या कोवळ्या काडय़ा दात घासण्यासाठी दातण म्हणून आजही गावाकडे वापरल्या जातात. सुकल्यावर, उत्तम सरपण म्हणूनही याच्या गळक्या फांद्या वापरल्या जातात. या झाडाचे उपयोग लिहायचे म्हटले ना तर माझी लिहिता लिहिता नि तुमची वाचता वाचता दमछाक होईल हे नक्की. मला आठवतंय, माझी आई आणि आज्जी कडुिनबाची पानं कपडय़ाच्या कपाटात, धान्यांच्या साठवणीत ठेवायची. का? तर किडे येऊ नयेत म्हणून. कडुिनबाच्या पानांचा उपयोग खत म्हणून, कीटकनाशक म्हणून खेडय़ापाडय़ांमध्ये अजूनही केला जातो. कडुिनबाच्या िनबोण्या गुरांनाही खायला दिल्या जातातच, पण त्यातून निघणाऱ्या बियांचं तेल जगप्रसिद्ध आहे. अनेक त्वचारोगांवर या तेलाचा वापर केला जातोच, पण वंगण म्हणूनही ते वापरलं जातं. आपल्या अंघोळीच्या साबणांमध्ये याचा वापर केलेला असतो. डोक्यातल्या उवा, जनावरांच्या अंगावरचे किडे याने मरतात नि त्वचेची खाजही जाते. आणि हो, आपल्या नेलपेंट्स, लिपस्टिक्समध्येही हे वापरलं जातच. शंभर टक्के भारतीय झाड असल्याने आयुर्वेदाला याचा उपयोग माहीत आहेच. आयुर्वेद सांगतो की, कडुिनब सगळ्या प्रकारच्या बुरशीला दूर ठेवतो. उत्तर भारतात विविध पिकांवर कडुिनबाच्या बियांची पावडर मिसळून किडय़ांना दूर ठेवण्यासाठी होणारा वापर मी मोठय़ा प्रमाणात पाहिलाय.

आपल्याला कडुिनब ठरावीक वेळीच म्हणजे गुढीपाडव्याला आठवतो. पण दक्षिणेकडे कडुिनबाची फुलं, कळ्या, कोवळी पानं खाण्यात नेहमी वापरली जातात. फार थोडय़ा लोकांना माहीत आहे की आंध्र प्रदेश राज्याने या झाडाला राज्यवृक्षाचा दर्जा दिलाय. गुजरातमध्ये, उत्तरेत तर याची खास बनं बनवली जातात. इतकं बहुगुणी झाड उत्तम सावलीही देतंच म्हणा. कडुिनबाची सावली आठवली की आठवण होते ती माझ्या जुन्या वाडय़ाची, अंगणातल्या विहिरीजवळ शालीनतेने उभ्या असलेल्या कडुिनबाची आणि गुढीपाडव्याच्या सुमारास लोकांनी त्याच्या फांद्या तोडून ओरबाडून नेऊ नये म्हणून डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवणाऱ्या माझ्या आज्जीची.

58-lp-kadu-nimbमाझी आज्जी अगदी हिरवी बोटं घेऊन जगणारी मायाळू स्त्री होती. बाजारातून आणलेल्या भाजीत आलेल्या मुळांना, पेरांना निगुतीने परसातल्या मातीत रुजवायची नि फुलवायची. तिच्या या परसमायेने इतकी हिरवाई जगवली होती की नुसत्या आठवणीने आजही मनावर गार सावली तरंगून जाते. एकदा आजीने बाजारातून आलेल्या ओल्या मसाल्याच्या सामानातल्या एका फांदीला ‘डोळे आहेत, नक्की जगेल’ असं म्हणत निगुतीने जगवलं होतं. पुढे ही फांदी जगली, तगली नि मस्त झुडुपवजा झाड बनून गेली. कडुिनबाच्या जवळच लावलेल्या या काडीत नि कडुिनबात फरक समजेस्तोपर्यंत माझं निम्मं बालपण गोंधळात गेलं खरं. ही गोंधळात टाकणारी काडी होती कढीलिंब ऊर्फ कढीपत्त्याची.

माझ्यासारखाच आजही अनेक जणांचा या शब्दसाम्यामुळे गोंधळ उडताना पाहून गंमत वाटते. ‘रुटेसी’ कुटुंबातलं हे झाड आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य अंग आहे. या झाडाबद्दल तसं पाहिलं तर आपण माहिती करूनच घेत नाही. आहे म्हणून आहे असाच काहीसा दृष्टिकोन आपण याच्याबद्दल बाळगतो. व्यवस्थित वाढलं तर पाच ते सहा मीटर्सची उंची गाठणारं हे झाड बहुतेकांच्या घरात कुंडीत वाढत असतंच. कढीलिंबाच्या ‘मुराया कोनिगी’ या वनस्पतिशास्त्रीय नावात दोन लोकांच्या नावाचं कॉम्बो आहे हे वाचून गंमत वाटेल. वर्गीकरण शास्त्राचा पितामह कार्ल लिनियस याने आपला अभ्यासू विद्यार्थी जॉन मुरेच्या स्मरणार्थ या झाडाच्या प्रजाती नाम ‘मुराया’ केलं. याच्या नावातलं ‘कोनिगी’ हे जातीविशेषण स्विस गणितज्ज्ञ ‘कोनिग’ याच्या स्मरणार्थ केलं गेलंय.

कढीलिंब ऊर्फ कढीपत्ता हा त्याच्या पानांना येणाऱ्या विशिष्ट वासामुळे ओळखला जातो. वर्षभर हिरवंगार असणारं म्हणजेच सदाहरित प्रकारातलं हे झाड सह्यद्रीच्या जंगलात विपुल प्रमाणात आढळतं असं कुणी सांगितल्यास अजिबात आश्चर्य वाटायची गरज नाही. सह्यद्रीची जंगलं या झाडांनी व्यापलेली आहेत. वसंत ऋतूमध्ये कढीलिंबाच्या फांद्यांच्या टोकावर पांढरी सुवासिक फुलं येतात. हिरव्या शेल्यावर जणू पांढरी सुवासिक नक्षीच काढलेली वाटावी अशी ही फुलं कीटकांना आकर्षति करतात. पुढे उन्हाळ्यात या झाडाला हिरवी फळं येतात. अगदी करवंदासारखी पिकत जाऊन ही फळं काळीभोर होतात. या पिकलेल्या फळात दोनच बिया असतात.

59-lp-kadu-nimbहे सगळं पाहायला आपल्याला वेळच नसतो. आपण निव्वळ त्याची पानं फोडणीसाठी वापरतो हाच काय तो त्याचा नि आपला घनिष्ठ संबंध. बाकी याचा अनेक प्रकारे आयुर्वेदिक वापर होतो किंवा याचं लाकूड टिकाऊ असल्याने शेती उपयोगी अवजारं बनवण्यासाठी वापरलं जातं हे आपल्या गावीही नसतं. याच्या चवीव्यतिरिक्त मला आवडणारी गोष्ट म्हणजे, कढीलिंबाची पानं खाऊन फुलपाखरांची फौज तयार होते आणि याची पिकलेली फळं खायला झाडावर वेगवेगळे पक्षी आणि खारी गर्दी करतात.

लहानपणीच्या आठवातला हा कडुिनब आणि कढीलिंबाबद्दल लिहिताना मला आठवतंय, अंगणात कडुिनबाच्या िनबोण्या खायला किडेमकोडे जमायचे. त्याच जोडीला कढीलिंबाची फळं खायला पक्षीही जमायचे. या पाहुण्यांच्या जोडीला, ‘चिक चिक’ असं उच्चरवात ओरडून खारुटल्या गोंधळ घालायच्या. त्यांचं ते शेपूट वरखाली उडवून, तुरुतुरु इथे तिथे धावून या िनबोण्या आणि फळं चाखणं मोठ मजेशीर वाटायचं. आजही, जेव्हा पण खार दिसते, तेव्हा ते शेपूट उडवून तुरुतुरु धावणं मजेशीरच वाटतं. तसं पाहायला गेलं तर, खार ऊर्फ इंडियन स्क्विरल्स आपल्या नेहमीच्या पाहण्यातला चपळ जीव. पण त्याच्याबद्दल चार वाक्ये सांगायची वेळ आली तर आपण गांगरून जातो. आपण नेहमी पाहतो ती खार रोडेन्शिया गटात मोडते. या रोडेन्शिया गटातला एक मुख्य भाग म्हणजे ‘सियुरिडी फॅमिली’ ज्यात या सगळ्या खारींचा समावेश होतो. या खारींच्या मुख्य दोन जाती आपल्यापकी अनेकांना माहीतच नसतात. भारताच्या उत्तरेकडे सर्वत्र नि दक्षिणेच्या कमी पावसाच्या प्रदेशात पाठीवर पाच पट्टे असलेली जी खार दिसते ती म्हणजे पांडवखार! ही कमालीची धीट असते. ही चिंटुकली लहानपणीच हाताळली तर माणसाळली जाते. यातील दुसरी खार म्हणजे पाठीवर तीन पट्टे असलेली खार ऊर्फ रामाची खार. ही खार दक्षिण भारताच्या जास्त पाऊस पडणाऱ्या जंगलांमध्येच आढळते. सेतूबंधनात मदत केल्याबद्दल प्रभु श्रीरामांनी हिच्या पाठीवरून हात फिरवल्यामुळे ही बोटं उमटली आहेत अशी कथा या खारीबद्दल सांगितली जाते. ही खार मात्र माणसाळली जात नाही.

या दोन्ही खारी तसं पाहायला गेलं तर मुख्यत्वे शाकाहारीच असतात. फळं, कोवळे कोंब, कोवळी झाडं नि त्यांच्या साली यांचं मुख्य खाणं असतं. कधीतरी खाण्यात चेंज म्हणजे या किडे नि पक्ष्यांची अंडी पण खातात. आपल्या जंगलांतून फुलणारी शेवरीची फुलं उमलली की त्यातला मध यांना फारच प्रिय!

यांचं कुटुंब जीवन तसं मर्यादित असतं. नर आणि मादी आयुष्यभर एकत्र राहण्याचे कसमेवादे देत-घेत नाहीत नि यांचं एकमेकांबद्दलचं आकर्षण एक-दोन दिवसांतच संपून जातं. बेचाळीस दिवस अर्थातच सहा आठवडय़ांनंतर मादी दोन-तीन पिल्लांना जन्म देते. जन्माला आलेली ही पिल्लं ठार आंधळी असतात. स्वतच्या जोरावर अन्न मिळवायला लागेपर्यंत ही पिल्लू कंपनी मऊ मऊ घरटय़ातच राहते. या खारींची घरटी लहान असतात. गवताची पाती, दोरे वापरून ही घरटी बनवली जातात. पूर्वी या लहान खारींची मोठय़ा प्रमाणात हत्या व्हायची. कारण यांच्या शेपटीचे केस चित्र रंगवण्याच्या कुंचल्यात, अर्थात ब्रश बनवण्यासाठी वापरले जायचे. भारतीय वन्यजीव कायद्याने या सर्वावर बंदी आणल्याने आता असे ब्रशेस बनत नाहीत ही सुखद गोष्ट आहे.

61-lp-kadu-nimbआपलं वय वाढत जातं तसं आपल्या बालपणीच्या रम्य आठवणींना आपण उजळवतो. आज काहीसं तसंच झालं माझं. गुढीपाडव्याच्या गुढीसाठी आणलेल्या कडुिनबाने माझं मन किती मागे गेलं. आपल्या प्रत्येकाच्या मनात आसमंत असाच दडलेला असतो. संधी मिळाली की प्रत्येकाचं मन त्यातून फेरफटका मारून येतं नि तरतरून उठतं. सध्या निसर्ग तरतरून उठलाय नि आसमंतात जागोजागी रंगीबेरंगी गुढय़ा उभारल्या आहेत. मराठी नवीन वर्षांत निसर्ग निरीक्षणाचा संकल्प करू या नि या गुढय़ा, हा बदललेला आसमंत जवळून पाहू.

मराठी नवीन वर्षांच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो. आसमंतात भेटत राहूच..

(छायाचित्र सौजन्य : विकिपिडीया कॉमन्स, जे एम गर्ग, मोहम्मद करीम, रुपाली पारखे – देशिंगकर.)
रुपाली पारखे-देशिंगकर – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 8, 2016 1:02 am

Web Title: kadunimb tree azadirachta indica
Next Stories
1 ताजीतवानी चाहूल
2 आठवणीतला आसमंत
3 वसंतसमये प्राप्ते…
Just Now!
X