03 August 2020

News Flash

बिब्बा, बुचाची फुलं आणि बरंच काही…

बुचाची झाडं उष्ण व दमट हवामानात चांगली वाढतात आणि खूप बहरतात.

दररोजच्या धावपळीत लहानसहान आनंद मिळवणं अत्यंत आवश्यक असतं. तसं पहायला गेलं तर अशा आनंदाच्या जागा शोधायला खूप लांब जावं लागत नाही. आपल्या आसपासच्या निसर्गातच असतात त्या. बघा, जमतंय का आसमंतातलं आपलं वर्तुळ विस्तारायला.

मागच्या जंगलवारीत मुलांना नीट कळलेली गोष्ट म्हणजे प्रत्येक आकर्षक रंगाच्या फुलांना सुगंध असतोच असं नाही आणि सुगंध असलेली फुलं आकर्षक दिसतातच असंही नाही. या धडय़ामुळे झाडांकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोनही बदलला गेलाय. या बदललेल्या दृष्टिकोनासोबत परिसरातली झाडं आणि फुलं शोधण्याचा झपाटा त्यांनी लावलाय. शाळेजवळच्या उंच आणि पांढरी फुलं येणाऱ्या झाडाने त्यांना सुगंधी भुरळ घातल्याने त्या झाडाचं कुळ शोधायला गेल्यावर लक्षात आलं की थेट वीस-पंचवीस मीटर्सची उंची गाठलेलं ते झाड बुचाचं आहे.

मििलग्टोनिया हॉर्टेन्सिस अशा वनस्पतीशास्त्रीय नावाने ओळखलं जाणारं हे झाड सध्या अनेक ठिकाणी फुललेलं दिसतंय. या झाडाच्या नावातलं मििलग्टन हे नाव प्रख्यात ब्रिटिश शास्त्रज्ञ मििलग्टन याच्या स्मरणार्थ नि हॉर्ट्स हे उद्यानावरून ठेवलं गेलंय. उद्यानांमध्ये लावता येईल किंवा लावला जातो असा वृक्ष म्हणजे मििलग्टोनिया हॉर्टेन्सिस. बिग्नोनिएसी कुटुंबातल्या या झाडाला इंग्रजीत ‘इंडियन कॉर्क ट्री’ असं म्हटलं जातं. गगनजाई किंवा गरुडिलब अशाही नावांनी ओळखलं जाणारं हे झाड देशात अनेक ठिकाणी दिसत असलं तरीही हे भारतीय नाहीये. आपला शेजारी देश ब्रह्मदेश म्हणजेच म्यानमार आणि मलाया इथून हे झाड कधीतरी आपल्याकडे आणलं गेलं नि आपलंच होऊन बसलं. याला बुचाचं झाड असं नाव पडण्यामागे अगदी साधं कारण आहे. पूर्वी बाटल्यांची बुचं प्लॅस्टिक किंवा धातूची बनत नसत. या झाडापासून बाटल्यांची बुचं बनवली जात असल्याने या झाडाला बुचाचं झाड हे नाव रूढ झालं.

बुचाची झाडं उष्ण व दमट हवामानात चांगली वाढतात आणि खूप बहरतात. म्हणूनच दक्षिणेच्या राज्यांमध्ये ही झाडं भरपूर आढळतात. कोरडय़ा हवामानात यांना खूप फुलं येतात. भरपूर सडपातळ फांद्या असलेल्या या झाडाच्या उपशाखा जमिनीकडे झेपावणाऱ्या असतात. याची मळकट, मातकट, पिवळट रंगाची जाड पण मऊ आणि भेगा पडलेली साल नजरेत अगदी ठळक भरते. या झाडावर हिवाळ्यातल्या पानगळीचा परिणाम होत नाही. इतर झाडं थंडीत निष्पर्ण होतात तसं याचं होत नाही. या झाडाचा सर्वात सुंदर भाग म्हणजे त्याची फुलं. वर्षांतून दोनदा हमखास फुलणारं हे झाड इतर बहुतेक पांढऱ्या रंगाच्या फुलांमध्ये उजवं ठरू शकतं. पाच पाकळ्यांचं हे फूल मोठं मजेशीर असतं. दोन पाकळ्या जोडून याची अर्धी दुभंगलेली एकच पाकळी तयार होते नि उरलेल्या तीन पाकळ्या अगदी बेलाच्या पानाप्रमाणे वेगवेगळ्या दिसून येतात. हे फूल पांढरंशुभ्र कधीच नसतं. किंचित दुधिया रंगात गुलाबी छटा मिरवणारं हे फूल सुगंधाचा स्वर्गीय आनंद देतं. साधारण पावसाळ्यात बुचाला फुलांचे घोस येतात. फांद्याच्या टोकाशी या फुलांचे घोसच्या घोस लटकताना, वाऱ्यावर डुलताना बघणं अगदी सुखद दृश्य असतं.

बुचाचं झाड आपल्या देशातलं नसल्यामुळे आयुर्वेदाला याचे औषधी गुणधर्म माहीत नाहियेत. याचं लाकूड मऊ असल्याने आपल्याकडे लाकूडकामासाठी याचा विशेष उपयोग करून घेतला जात नाही. पण ब्रह्मदेशात मात्र याच्या लाकडापासून फíनचर, शो पिसेस बनवले जातातच. जोडीला चहाची खोकीही बनवली जातात. या झाडाची मुळं खूप खोल जात नसल्याने सणसणीत दिसणारी बुचाची झाडं वादळात बऱ्याचदा उन्मळूनच पडतात. तात्पर्य, घराजवळ हे झाड लावताना जपूनच लावलेलं बरं. आता थंडीबरोबर बुचाचा दुसरा बहर सुरू झालाय तो पाहायला विसरू नका.

मागच्या वेळी, जंगलवारीत कुंभारमाशांची लगबग बघताना एक गरीब शिकारी अनपेक्षितपणे पाहायला मिळाला. फांदीवर बसून जीभ लांब फेकणारा घोयरा सरडा ऊर्फ श्यामेलिऑन. बहुतांश लोकं याचा उच्चार चमेलिओन असाच करताना मी ऐकलाय. तर असा रंग बदलणारा सरडा आपण पाहिलेला नसला तरी त्याच्याबद्दल ऐकून असतो. हा प्राणी अर्थातच सरडा वर्गात मोडतो. संपूर्ण भारतभर म्हणजे आसेतु हिमाचलपर्यंत सरडे आढळतात. खास म्हणजे अगदी हिमालयाच्या पाच हजार मीटर उंचीपासून ते राजस्थानच्या पन्नास अंश वाळवंटी तापमानातही सरडे आढळतात. आपल्या परसदारात, शेतोडीत, जाता-येता सहज दिसणाऱ्या सरडय़ांच्या वर्गात मोडणारा हा घोयरा सरडा मात्र मुबलक प्रमाणात मिळत नाही. अख्ख्या भारतात घोयरा सरडय़ाची फक्त एकच जात मिळते आणि तीसुद्धा मुख्यत्वे दक्षिणेकडेच! घोयरा सरडय़ाचं वेगळेपणं अगदी त्याच्या दिसण्यापासूनच सुरू होतं. खडबडीत दिसणारं त्याचं शरीर दोन्ही बगलांकडून अगदी दाबून चपटं केल्यासारखं दिसतं. एकावर एक तीन शिरस्त्राणं घातल्यासारखं दिसणारं याच डोकं, कडबोळ्यासारखी वळलेली शेपूट, शरीराला न शोभणारे लुकडे पाय नि ‘ज्युरासिक पार्क ’ या सिनेमामधल्या डायनोसॉर्सची आठवण करून देणारा याचा जबडा असं ‘सुंदर ते ध्यान, राहे फक्त झाडावरीच!’ घोयरा क्वचितच जमिनीवर उतरतो. अगदी तहान लागली तरीही घोयरा झाडाच्या पानांवर पडलेले दविबदू पितो. शक्यतो जमिनीवर न उतरणाऱ्या या सरडय़ाची मादी अंडी घालण्यासाठी जमिनीवर उतरते आणि चक्कबीळ खोदून त्यात अंडी घालते.

28-lp-nature

आपण नेहमी पाहतो की आपल्यासमोर दिसणारे सरडे अगदी तुरुतुरू पळत असतात. पण त्याच्या अगदी विरुद्ध गोष्ट घोयरा करतो. हा सरडा कधीच वेगाने धावत नाही. अगदी संशय घेत, चाहूल घेत, विचार करून प्रत्येक पाऊल टाकतो. जी गोष्ट जमिनीवर, तीच झाडावरही. अगदी कुशल कसरतपटूप्रमाणे हा लवचीक फांद्यांवरही मस्त हालचाली करतो. त्या हालचाली पाहिल्यावर एक गोष्ट ठळकपणे जाणवते ती म्हणजे याचा स्वत:च्या शरीरातल्या प्रत्येक स्नायूवर कमालीचा ताबा असतो. माझ्या अनेक जंगलयात्रांमध्ये मी याला कित्येक तास एकाच ठिकाणी बसलेलं पाहिलंय. जे चपळपणे धावू शकत नाहीत ते स्वत:च वेगाने धावणारं भक्ष्य कसं पकडणार, असा एक मूलभूत प्रश्न आपल्या मनात लगेच येऊ शकतो. निसर्गाने त्याच्या प्रत्येक अपत्यासाठी काही ना काही तजवीज करून ठेवलेली असते. घोयऱ्याची जीभ म्हणजे निसर्गातलं एक आश्चर्यच! जीभ हे त्याचं एकमेव अस्त्र आहे. या जिभेच्या जोडीला त्याचे डोळे हे निसर्गातलं दुसरं वैशिष्टय़. घोयऱ्याचे डोळे तेल भरायच्या नरसाळ्याप्रमाणे एका शंकूच्या टोकावर बसवलेले असतात. हे डोळ्याचे दोन्ही शंकू स्वतंत्रपणे वेगवेगळ्या दिशांना फिरू शकतात. म्हणजे भक्ष्य दिसलं की हा त्याचा अंदाज घेतो, सावकाश शरीर पुढच्या पायावर तोलून हळूच जबडा उघडून थोडीच जीभ पुढे काढून तयार रहतो. हे सगळं अगदी स्लो मोशनमध्ये सुरू असतं. आणि अचानक आपल्यालाच काय, त्या भक्ष्यालाही कळत नाही की ते घोयऱ्याच्या तोंडात कसं गेलंय! याची साधारण नऊ इंच लांब गुलाबीसर जीभ आपल्या चिकट टोकाने भक्ष्याला खेचून घेते. हेच ते घोयरा सरडय़ाचं जगप्रसिद्ध जीभ फेकणं आणि परत आत घेणं! याच पद्धतीने हे महाराज मस्तपकी किडेमकोडे, भुंगे, फुलपाखरं, मोठे मुंगळे मटकावून टाकतात.

आता राहता राहिला प्रश्न त्या रंग बदलण्याचा. घोयऱ्याला धावता येत नसल्याने स्वत:चा बचाव कसा करणार? मग अर्थातच सरूपता म्हणजेच कॅमॉफ्लाज होऊन सभोवतालाशी रंगानुरूप होणं सुरू होतं. याच्या शरीरातल्या रंगपेशी मेंदूकडून आज्ञा आल्यावर शक्यतो हुबेहूब रंग धारण करायचा प्रयत्न करतात. ते शक्य होत नसेल आणि शत्रू जवळ आलाच तर घोयरा स्वत:चं अंग आणि गळा फुगवून आपण भयानक असल्याचा ‘दिखावा’ करतो. घोयरा चावल्यास लहानशी जखम होते. अनेक जण घोयरा पाळण्याचा प्रयत्न करतात, अर्थात यांच्या शांत स्वभावाने ते शक्यदेखील असते. या घोयऱ्यांनाही इतर सरपटणाऱ्या प्राण्यांप्रमाणेच जिवंत भक्ष्य लागतं. उत्तम ‘दूरदृष्टी’ बाळगणारे घोयरे जवळचं दिसण्याबाबतीत बऱ्यापकी अधू असतात. मागे एका लेखात मी प्राणिवाचक शब्दांबद्दल लिहिलं होतच. दलबदलू माणसाला, िहदी चित्रपटांनी ‘तुम गिरगीट की तरह अपना रंग बदल रहे हो’ हा डायलॉग फार पूर्वी आंदण देऊन टाकलाय. घोयरा बघितला की मला नेहमी तेच आठवतं. बाकी काही असो, जितका आनंद जंगलात एखादा दादा शिकारी पाहून होतो, तितकाच आनंद मला हा चिंटुकला शिकारी पाहून होतो.

असा हा मजेशीर घोयरा निरखत असतानाच आम्हाला जवळाच्या झाडावर मोकळा होऊन लटकलेला कोष दिसला. निसर्गात फिरताना डोळे उघडे ठेवले तर अनेक बारीकसारीक गोष्टी नजरेस पडतात ज्या आपल्या खिजगणतीतही नसतात. सापाची कात, पक्ष्याचं पीस, झाडावर नखं ओरबाडून केलेल्या खुणा किंवा कुठे-कुठे पडलेली प्राण्यांची विष्ठासुद्धा आपल्याला नवनवीन गोष्टी शिकवून जाते. असाच दृष्टिकोन घेऊन केलेल्या निसर्गयात्रा कायम फलदायक ठरतात हे परत एकदा जाणवलं. आम्हाला मिळालेला कोष फुलपाखराचा नसून मॉथ, म्हणजेच पतंगाचा होता आणि हा साधासुधा पतंग नसून अ‍ॅटलस मॉथ नावाच्या सर्वात मोठय़ा पतंगाचा होता. आपण सर्वसामान्यपणे फुलपाखरं आणि पतंग यातला फरक जाणून घेत नाही आणि सगळ्यांना सरसकट फुलपाखरं म्हणतो. लाखोंच्या संख्येने असलेल्या किडय़ामकोडय़ांमधले शारीरिक बदल हे लक्षात ठेवण्यास तसे कठीण असतात, पण कधी कधी ते खूपच उपयोगी असतात. फुलपाखरे आणि पतंग, या दोघांनाही नीट पाहिलं तर आपल्याला दिसून येतं की त्यांच्या मिशा किंवा अ‍ॅन्टिना ज्यांना साध्या भाषेत चाचपण्या म्हणू या, त्यात ठळक फरक असतो. पतंगांच्या चाचपण्या केसाळ आणि खाली निमुळत्या होत गेलेल्या असतात आणि फुलपाखरांच्या चाचपण्या सरळ आणि टोकाला जाड असतात. फुलपाखरांचे डोळे मोठे असतात तर पतंगांचे डोळे डोक्याच्या मानाने लहान असतात. बहुतेक फुलपाखरं दिनचर असून पतंग निशाचर असतात. यामुळेच संध्याकाळी दिवेलागणी झाली की, दिव्याभोवती घोंघावतात ते पतंग असतात, फुलपाखरं त्या वेळेस दिसतही नाहीत. पतंग बसताना आपले पंख बाजूला पसरून बसतात तर फुलपाखरं आपले पंख मिटून छातीवर उभे धरतात. पतंगांचे पुढचे आणि मागचे पंख एका लहान आकडीने एकमेकांना जोडलेले असतात. फुलपाखरांना अशी कुठलीच सोय नसून त्यांच्या पुढील पंखाचा भाग मागच्या पंखाला थोडासा झाकतोच झाकतो. या मुख्य गोष्टींनी पतंग नि फुलपाखरू वेगवेगळे कळते.

29-lp-nature

आपल्या सह्य़ाद्रीच्या जंगलांमध्ये मिळणारा अ‍ॅटलस मॉथ हा असामान्य पतंग बघताच प्रेमात पडावा असाच आहे. जगातल्या सर्वात मोठय़ा आकाराच्या पतंगाच्या प्रेमात पडणं काही नवल नाही राव! पंख उघडून बसल्यावर तब्बल बारा इंचांपर्यंत लांबी भरणाऱ्या या पतंगाला मोठ्ठं नाही म्हणायचं तर काय म्हणणार? हा पतंग भारतातच नाही तर संपूर्ण दक्षिण आणि मध्यपूर्व आशियात आढळतो. या पतंगाला अ‍ॅॅटलस नाव का पडलं असेल, या पुढच्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे याच्या पाठीवर दिसणाऱ्या रेषा अगदी नकाशाप्रमाणे असतात. म्हणून कदाचित असू शकेल ही एक गोष्ट. मात्र चिनी लोकांच्या मते अ‍ॅटलस मॉथ म्हणजे स्नेक हेड मॉथ होय. याच्या पंखांच्या कडांना असणारी नक्षी जणू सापच वाटावी अशी आहे. नीट पाहिलं तर त्याचं अंग जणू सापच वाटतं. मी जेव्हा जेव्हा सह्य़ाद्रीच्या जंगलात या पतंगाला पाहते तेव्हा अगदी खूश होते. आपल्या जंगलात हा पतंग दुर्मीळ नाहीये पण बघायला मिळणं तितकं सोप्पंही नाहीये. याचं कारण या पतंगाचं अल्पायुष्य. अल्प म्हणजे किती, तर जेमतेम दोन आठवडे इतकंच. त्याचं आयुष्य इतकं कमी आहे कारण त्याला तोंड नावाचा अवयवच नसतो. आपल्या अळी ते सुरवंट आणि पूर्ण वाढीचा पतंग या अवस्थांमधून जाताना शेवटच्या अवस्थेत म्हणजे पंख पसरून उडणारा पतंग बनल्यावर हा स्वत:च्या सुरवंट अवस्थेतल्या कोषातल्या चरबीयुक्त द्रवपदार्थावर जगतो आणि थोडय़ाच दिवसांत मरून जातो.

या पतंगांमध्ये मादी पतंग जरा मोठा आणि जाडसर असतो म्हणजेच तिचं शरीर बल्की असतं. साटय़ूनिडी कुटुंबातल्या या पतंगाचा जन्म जणू काही फक्त पुढच्या पिढीची वीण करण्यासाठीच झाला आहे असं एकंदर त्याच्या जीवनक्रमाकडे पाहिलं तर वाटून जातं. हे पतंग जास्त लांबलांब पल्ल्याच्या भराऱ्या मारत नाहीत. कारण यांच्या अंगात तेवढी ताकदच नसते. म्हणूनच जिकडे अंडी घातली जातात आणि फळतात, त्याच्याच जवळपासच्या भागात हे पतंग मोठे होतात आणि राहातात. या पतंगांमध्ये मिलनासाठी मादीच पुढाकार घेते हे विशेष. मादी पंख पसरून उडायला लागल्याबरोबर स्वत:च्या शरीरातून ‘फेरोमोन्स’ नावाचा गंध वाऱ्यावर सोडते. त्यामुळे नर पतंगाला त्याच्या अँटिनांच्या साहाय्याने काही किमी परिसरातील मादीचा शोध लागतो. मिलनानंतर मादी साधारण अडीच मिलीमीटर व्यासाची अनेक अंडी हिरव्यागार पानांच्या खालच्या बाजूला चिकटवून ठेवते. साधारण दोन आठवडय़ांच्या काळानंतर, या अंडय़ांतून सुरवंटासारखे जीव बाहेर येतात. ते अतिशय खादाडपणे झाडाची ‘हिरवाई’ खाऊन टाकतात. साधारण साडेचार इंचाचे झाल्यावर हे खादाड गब्दुल सुरवंट स्वत:भोवती पानांचा आणि पांढरट मेणसदृश पदार्थाचा कोष बनवतात. या कोषात हे सुरवंट चार आठवडे राहातं. महिनाभर या बंद अवस्थेत राहिल्यावर कोषातून बाहेर येऊन हा राजा पतंग आपले पंख पसरवून मोकळ्या हवेत झेपावतो आणि जेमतेम दोन आठवडेच जगून मरून जातो. भारतात काही ठिकाणी या पतंगाच्या कोषापासून लहान प्रमाणात रेशीम बनवण्याचा उद्योग केला जातो. हे रेशीम अगदी उत्कृष्ट नसतं, पण आपल्या खादीच्या रेशमासारखंच असतं. या खरखरीत, रफ रेशमाला ‘फगारा’ असं म्हणतात. ही झाली आपल्याकडची गोष्ट. तिकडे चीनमध्ये या गब्दुल सुरवंटांना खातात. आणि त्यांच्याच शेजारी म्हणजे तवानमध्ये याचे सोडून दिलेले कोष चक्क सुट्टे पसे ठेवण्यासाठी वापरात येतो. आहे की नाही माणसाची कमाल? अतक्र्य जमात असलेला माणूस निसर्गाच्या चक्रात कसा आणि कुठे बिब्बा घालेल हे सांगता येत नाही.

चांगल्या कामात बिब्बा हा वाक्प्रचार अनेक वेळेस आपण ऐकलेला असतो. हा बिब्बा असतो तरी काय, जो चांगल्या कामात घातला जातो? आपल्या देशात बहुतेक सर्व राज्यांमध्ये आढळणारा बिब्बा नावाचा हा वृक्ष आपल्याला दैनंदिन जीवनात सतत उपयोगी पडत असतो, पण त्याबद्दल आपण अगदी अनभिज्ञ असतो. भल्लात:, भेला, भिलवा, भिलामु, केरु इत्यादी नावांनी ओळखलं जाणारं हे झाड साध्या भाषेत बिब्बा म्हणून ओळखलं जातं. बिब्ब्याच्या वनस्पतीशास्त्रीय नावात, अर्थात अनाकाíडयम सेमेकार्पसमध्ये खूप मजेशीर अर्थ दडलाय. सेमेकार्पस म्हणजे खुणा करण्यासाठी योग्य फळ. आणि अनाकाíडयम म्हणजे ज्याचा आकार हृदयाकृती आहे. म्हणजेच खुणा करण्यासाठी वापरता येऊ शकतं असं हृदयाकृती फळ असलेला वृक्ष तो हा बिब्बा.

साधारण पाच ते आठ मीटर उंच वाढणारा हा पानझडी वृक्ष मध्यम सदरात मोडतो. डेरेदार आकारात वाढणारा वृक्ष अगदी साध्या पानांचा असतो. अगदी सरळ कडा असणारी याची पानं लांबट आणि जाड देठाची असतात. या पानांच्या खालच्या बाजूस बारीक लव असते. साधारण सरता उन्हाळा व भर पावसाळ्यात, आपल्या आंब्याला येतात तशीच मोहोराची फुलं बिब्ब्याला येतात. ही फुलं भरगच्च नसून विरळ असतात. पिवळसर पांढरी असणारी ही लहानसर फुलं किंचित हिरवट छटा घेऊनच मोठी होतात. बिब्ब्याच्या झाडाला, नरफुले आणि मादीफुले वेगवेगळ्या तुऱ्यांवर येतात. साधारण ऑक्टोबरनंतर थंडीत, काजू बोंडासारखीच दिसणारी बिब्ब्याची लहानसर फळं धरायला सुरुवात होते. पूर्ण हिवाळा ही फळं मोठी होतात व उन्हाळ्याच्या सुरुवातीस म्हणजेच मार्चपर्यंत ही फळं, अर्थात बिब्बे तयार होतात. तयार झालेले काळसर रंगाचे बिब्बे झाडावरून गळून पडतात. गळून पडलेले हे काळसर बिब्बे साधारण तीनेक सेमी लांब चप्पट, हृदयाकृती दिसतात. बिब्ब्याच्या फळाचा मागचा देठ काजूच्या बोंडाप्रमाणे फुगीर व मांसल असा दिसतो. हा मांसल भाग बिबुटी म्हणून संबोधला जातो. या बिबुटीच्या आतला गर अगदी पौष्टिक तर असतोच पण चविष्टही असतो. या गराला गोडांबी असं मजेशीर नाव दिलं गेलंय.

बिब्ब्याचे लाकूड खूप भारी प्रकारच्या कामासाठी वापरले जात नाही. साधारण काडय़ापेटय़ा, लाकडी वल्ही, लाकडी फळ्या बनवण्यासाठी याचा वापर केला जातो. या झाडाचं लाकूड कापताना यातून विषारी द्रव बाहेर येतो. हा विषारी चिक अंगाला लागल्यावर त्वचेची आग होते आणि सूजही येते. या विषारी चिकामुळेच या झाडाला कापण्याच्या विशेष फंदात कोणी पडत नाही. असे असले तरी या झाडाची उपयुक्तता कमी होत नाही. बिब्ब्याचं तेल, ज्याला ब्लॅक रेझीन म्हणतात, ते आपल्या वॉíनशमध्ये कीडनाशक म्हणून वापरलं जातं. या तेलाचा वापर गाडय़ांच्या अ‍ॅक्सेल्सना वापरण्यात येणाऱ्या वंगणासाठी केला जातो. हे तेल अर्धवट वाळवून लाकूड पोखरणाऱ्या किडींसाठी नियंत्रक म्हणून लाकडावर वापरलं जातं. याचा अजून प्रचलित उपयोग म्हणजे कपडय़ांवर खुणा करण्यासाठी या तेलाचा वापर केला जातो. म्हणूनच बिब्ब्याला माìकग नट म्हणूनही ओळखतात. बिब्ब्याच्या फळातल्या फिलॉल या रसायनाचा वापर वॉटर प्रूफिंग साहित्य, वेगवेगळे रंग निर्मितीसारख्या अनेक दैनंदिन गोष्टींमध्ये केला जातो, हे आपल्याला माहीतच नसतं. आणि मजेशीर गोष्ट म्हणजे, या भयानक वाटणाऱ्या बिब्ब्याच्या झाडावर लाखेचे किडे चांगले वाढतात.

बाकी, हा बिब्बा म्हणजे विषारी असा एक सर्वसाधारण समज आपल्याकडे पिढय़ान्पिढय़ा प्रचलित आहे. काही अंशी तो योग्यही आहे. मात्र बिब्ब्याचे अनेक उपयोग आयुर्वेदात दिले असून खोकला, दमा, अपचन, सूज वगरेसाठी याचा उपयोग निष्णात वैद्य करतात. बिब्बा अनुभवी व निष्णात वैद्यकीय तज्ज्ञाच्या मार्गदर्शानाखाली घ्यावा. कारण याचे तीव्र गुणधर्म शरीरास हानीकारक ठरू शकतात. बिब्ब्याच्या बिया सहज रुजतात व झाडे उत्तम तग धरून वाढतात. या झाडांचा व्यावसायिक वापर करणे म्हणजे शून्य भांडवल गुंतवणूक शेती करणे असेच होऊ शकते. आपली वनसंपदा जोपासताना त्याचा फायदा होत असेल तर उत्तमच.

दररोजच्या धावपळीत लहानसहान आनंद मिळवणं अत्यंत आवश्यक असतं. तसं पाहायला गेलं तर अशा आनंदाच्या जागा शोधायला खूप लांब जावं लागत नाही. शिस्तीत चालणारी मुंग्यांची रांग, त्या रांगेजवळ एखादा किडा, मुंगळा आल्यास त्याच्यावर तुटून पडण्याची त्यांची सामूहिक सहजता, धूळस्नान करून थंडीच्या उन्हाचा आनंद घेणाऱ्या साळुंक्या, चिमण्या, उगाचच घोळका करून कलकलणाऱ्या कावळ्यांची आणि बदलत्या हवामानानुसार आपलं रुपडं पालटणाऱ्या हिरवाईच्या अस्तित्वाचीही जाणीव आपण करून घेतली की या आनंदाच्या जागांमध्ये दररोज भर पडत रहाते. आसमंतातले हे बारकावे निरखण्यातून जंगलातले बारकावे टिपायला प्रेरणा मिळते आणि आनंदाचं वर्तुळ विस्तारतं. बघा, जमतंय का आसमंतातलं आपलं वर्तुळ विस्तारायला!
रुपाली पारखे-देशिंगकर – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 16, 2016 1:02 am

Web Title: semecarpus anacardium bibba
Next Stories
1 थंडीतलं निसर्ग निरीक्षण
2 जंगलाची भूषणं!
3 निसर्ग पर्यटनाची वेळ झाली
Just Now!
X