28 January 2021

News Flash

आजचं राशीभविष्य, शुक्रवार, ०८ जानेवारी २०२१

सर्व बारा राशींचे भविष्य

 1. मेष : कौटुंबिक सौख्य जपावे. उगाचच चीड-चीड करू नका. क्षुल्लक गोष्टी मनावर घेऊ नयेत. गुरु कृपेचा लाभ होईल. शैक्षणिक प्रश्न मार्गी लागतील.
 2. वृषभ : जोडीदाराच्या प्रकृतीची काळजी घ्यावी. पोटाचे त्रास संभवतात. जवळच्या प्रवासात सावधानता बाळगा. कला जोपासायला वेळ द्यावा. वडीलधार्‍यांचा विरोध होऊ शकतो.
 3. मिथुन : खाण्या-पिण्याचे पथ्य पाळा. मुलांच्या तब्येतीकडे लक्ष द्यावे. जोडीदाराची प्रगल्भता लक्षात येईल. हातातील कामात यश येईल. उष्णतेचा त्रास संभवतो.
 4. कर्क : मुलांशी मतभेद संभवतात. वात-विकाराचा त्रास जाणवेल. जोडीदाराचा वरचष्मा राहील. एकमेकांचे मत समजून घ्यावे. कामानिमित्त प्रवास घडेल.
 5. सिंह : घरातील शांतता जपावी. कर्जप्रकरणं पुढे ढकला. तूर्तास जमिनीची कामे करू नयेत. मुलांची प्रगती दिसून येईल. कामाच्या ठिकाणी समाधान लाभेल.
 6. कन्या : जवळचे मित्र भेटतील. लहान प्रवास घडेल. कामाला अधिक हुरूप येईल. उपासनेला अधिक बळ मिळेल. बौद्धिक दिमाख दाखवाल.
 7. तूळ : वाहन चालवताना काळजी घ्यावी. तिखट पदार्थ खाण्याची हौस भागवाल. आवडी-निवडींबाबत जागरूक राहाल. बोलताना सावधगिरी बाळगा. कौटुंबिक खर्च वाढेल.
 8. वृश्चिक : रागाचा पारा चढू देवू नका. आततायिपणा करू नये. इतरांची मदत घेण्यास हरकत नाही. योग्य तारतम्यता बाळगावी. घरात मानाने राहाल.
 9. धनू : मानसिक चंचलता जाणवेल. घरातील जबाबदारी उचलाल. गोड बोलून कार्यभाग साधावा. खर्चाचे प्रमाण लक्षात घ्यावे. घशाचा त्रास संभवतो.
 10. मकर : स्वत:चे स्वत्व राखून वागाल. वागण्यातून आत्मविश्वास दर्शवाल. जुन्या गोष्टींकडे दुर्लक्ष करावे. कणखरपणा ठेवावा. मित्रांशी वाद संभवतात.
 11. कुंभ : इतरांना मदत करण्यात आनंद मानाल. सर्वांशी हसून-खेळून वागाल. छंदाला अधिक वेळ द्याल. प्रतिकूलतेतून मार्ग काढाल. व्यावसायिक बदल कराल.
 12. मीन : वरिष्ठ नाराज होण्याची शक्यता आहे. काही गोष्टी लपविण्याकडे कल राहील. मनातील इच्छा पूर्ण होतील. सामाजीक बाबीत पुढाकार घ्याल. मुलांची प्रगती दिसून येईल.

  — ज्योतिषी विद्याधर करंदीकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 8, 2021 1:00 am

Web Title: daily astrology horoscope friday 08 january 2021 aau 85
टॅग Astrology
Next Stories
1 आजचं राशीभविष्य, गुरुवार, ०७ जानेवारी २०२१
2 आजचं राशीभविष्य, बुधवार, ०६ जानेवारी २०२१
3 आजचं राशीभविष्य, मंगळवार, ०५ जानेवारी २०२१
Just Now!
X