News Flash

आजचं राशीभविष्य, शुक्रवार, ९ एप्रिल २०२१

सर्व बारा राशींचे भविष्य

 1. मेष:-कामाचा व्याप वाढेल. क्षुल्लक अडथळ्यातून मार्ग काढा. अति श्रमामुळे थकवा जाणवेल. बौद्धिक ताण जाणवेल.
 2. वृषभ:-झोपेची तक्रार जाणवेल. मनातील निराशा बाजूस सारावी. अनाठायी खर्च करू नये. तरुण वर्गाची मते विचारात घ्याल. कामे वेळेत पार पडतील.
 3. मिथुन:-व्यावसायिक वृद्धी च्या दृष्टीने पाऊल उचलाल. आरोग्यात सुधारणा होईल. मनातील इच्छा पूर्ण होतील. चांगल्या संगतीत दिवस जाईल. किरकोळ दुखापतींकडे दुर्लक्ष करू नका.
 4. कर्क:-दिलेली योग्य वेळ पाळता येईल. मनाजोगी खरेदी करता येईल. बौद्धिक मूल्यमापन कराल. विशिष्ट धोरण ठेवून वागाल. बौद्धिक छंदांसाठी वेळ काढावा.
 5. सिंह:-मानसिक स्थैर्य जपावे. काही गोष्टींत कंजूषपणा दाखवाल. कफ विकाराचा त्रास जाणवेल. अती विचार करू नये. भागिदारीतून चांगला फायदा होईल.
 6. कन्या:-जोडीदाराच्या सुरक्षितपणाचे कौतुक कराल. सहकार्‍यांची उत्तम प्रकारे साथ मिळेल. बौद्धिक दृष्टीकोन ठेवाल. व्यापारी वर्गाला लाभ होईल. हाताखालील लोकांचे सहकार्य मिळेल.
 7. तूळ:-छंद जोपासला वेळ काढाल. कौटुंबिक बाबतीत शांतता ठेवावी. जोडीदाराचा तुमच्यावर प्रभाव राहील. काही कामे विनासायास पार पडतील. शेअर्स मध्ये गुंतवणूक कराल.
 8. वृश्चिक:-तुमच्यातील धैर्य वाढीस लागेल. कर्तबगारीला नवीन वाटा फुटतील घरगुती वातावरण प्रसन्न असेल. दुचाकी वाहन चालवताना काळजी घ्यावी. भावंडांना मदत करावी लागेल.
 9. धनू:-मागचा पुढचा विचार करून खर्च करा. गरज असेल तरच शब्दांचा वापर करा. जवळचे मित्र भेटतील. जोडीदाराशी क्षुल्लक कारणांवरून मतभेद संभवतात. कौटुंबिक खर्चाचा आकडा पुनर्विचारात घ्या.
 10. मकर:-काही गोष्टींचा चंग बांधावा. क्षुल्लक गोष्टींवरून होणारा गैरसमज टाळावा. तुमच्यातील कार्य कुशलता वाढीस लावावी. डोकेदुखीचा त्रास जाणवेल. स्वत:साठी वेळ काढा.
 11. कुंभ:-डोळ्यांची वेळेवर तपासणी करावी. जुनी कामे पुन्हा सामोरी येऊ शकतात. खर्चाचा आकडा कोलमडू देऊ नका. आधुनिक गोष्टी समजून घ्याव्यात. अघळ-पघळ बोलणे टाळा.
 12. मीन:-मौल्यवान वस्तूंची खरेदी कराल. चित्रकलेची आवड जोपासाल. मानसिक चंचलता जाणवेल. मित्रमंडळींची नाराजी दूर करावी. वादाच्या मुद्दयात अडकू नका.

       – ज्योतिषी विद्याधर करंदीकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2021 12:45 am

Web Title: daily astrology horoscope friday 09 april 2021 msr 87
Next Stories
1 आजचं राशीभविष्य, गुरूवार, ८ एप्रिल २०२१
2 आजचं राशीभविष्य, बुधवार, ७ एप्रिल २०२१
3 आजचं राशीभविष्य, मंगळवार, ६ एप्रिल २०२१
Just Now!
X