1. मेष:- कौटुंबिक जबाबदारी आनंदाने पार पाडाल. अनाठायी खर्च केला जाईल. कलात्मक दृष्टिकोन ठेवावा. आवडी-निवडी बाबत आग्रही राहाल. सर्वांना प्रेमळपणे आपलेसे कराल.
  2. वृषभ:- चारचौघांत मिळून मिसळून वागाल. मनाप्रमाणे हौस पूर्ण करून घ्याल. काम व वेळ यांचे गणित जमवावे लागेल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. अनावश्यक खर्च टाळावा.
  3. मिथुन:- गरज नसलेल्या वस्तु खरेदी केल्या जातील. मानसिक गोंधळ टाळावा. प्रलोभनाला भुलून जाऊ नका. स्त्री सौख्याचा लाभ होईल. प्रवासाचा योग येईल.
  4. कर्क:- चैनीच्या वस्तु खरेदी कराल. व्यापारी वर्ग अपेक्षित लाभाने खुश राहील. जवळचे मित्र भेटतील. मनमोकळ्या गप्पा मारल्या जातील. मनातील अपेक्षा पूर्ण होतील.
  5. सिंह:- कामातून आनंद मिळेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. कामातील सुसंगतता व स्थैर्य जपाल. वडीलधार्‍यांचा आशीर्वाद लाभेल. कामाच्या ठिकाणी तुमचा मान वाढेल.
  6. कन्या:- धार्मिक ग्रंथ वाचाल. इतरांच्या आनंदाने खुश व्हाल. फक्त कामावरच लक्ष केंद्रित करावे. वरिष्ठांच्या नाराजीचे कारण बनू नका. दिरंगाईतून मार्ग काढावा लागेल.
  7. तूळ:- हातातील वेळेचा सदुपयोग करा. मुलांच्या प्रकृतीकडे लक्ष द्या. आर्थिक व्यवहार जपून करावेत. उगाचच चीड-चीड करू नका. नसते साहस अंगाशी येऊ शकते.
  8. वृश्चिक:- कौटुंबिक कलह शांततेने सोडवावा. पत्नीची नाराजी दूर करावी लागेल. भागिदारीतून चांगला लाभ होईल. संपर्कातील लोकांकडून मदत मिळेल. चारचौघांत कौतुकास पात्र व्हाल.
  9. धनू:- अडचणीतून वेळीच मार्ग निघेल. सहकार्‍यांची योग्य वेळी मदत मिळेल. आरोग्यात सुधारणा होईल. हाताखालील लोकांचे सहकार्य मिळेल. मनातील काळजी दूर होईल.
  10. मकर:- मुलांचे वागणे बिनधास्त वाटू शकते. आपले कलागुण जतन करण्याचा प्रयत्न करावा. बोलतांना इतरांचे मन दुखावले जाणार नाही याची काळजी घ्यावी. फसवणुकीपासून सावध राहावे. संयम सोडू नका.
  11. कुंभ:- बर्‍याच गोष्टी सामोपचाराने हाताळाव्यात. वडीलधार्‍याच्या तब्येतीची काळजी घ्यावी. खाण्या-पिण्याची पथ्ये पाळावीत. कौटुंबिक जिव्हाळा जतन करावा. थोरांचे विचार जाणून घ्यावेत.
  12. मीन:- जवळच्या ठिकाणाला भेट देता येईल. मित्रमंडळींचा गोतावळा जमवाल. वादाचे मुद्दे लांब ठेवावेत. सामुदायिक जाणीव जागृत ठेवावी. हाती घेतलेले काम तडीस न्याल.

      – ज्योतिषी विद्याधर करंदीकर