1. मेष:- आवडी निवडीबद्दल दक्ष राहाल. कामाचा अतिरिक्त तान जाणवेल. बदलांकडे सकारात्मकतेने पहावे. प्रेमळपणे सर्वांना जिंकून घ्याल. बोलण्यातून उत्तम छाप पाडाल.
  2. वृषभ:- लोक तुमच्याकडे आकर्षिले जातील. भावंडांचे उत्तम सहकार्य मिळेल. दिवस मनाजोगा व्यतीत कराल. सर्व गोष्टींत मनापासून रस घ्याल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल.
  3. मिथुन:- कौटुंबिक खर्च वाढू शकतो. व्यावहारिक दृष्टिकोन ठेवावा. काही गोष्टी उघडपणे बोलणे टाळाल. आरोग्याची हयगय करू नका. नवीन मित्र जोडले जातील.
  4. कर्क:- तुमची समाजप्रियता वाढेल. सरकारी कामे पूर्ण होतील. स्त्री वर्गाशी मैत्री कराल. मित्रा परिवारात वाढ होईल. उत्तम व्यावसायिक कमाई करता येईल.
  5. सिंह:- तुमच्या कलेला योग्य प्रशस्ती मिळेल. औद्योगिक वातावरण चांगले राहील. इतरांची मने जिंकून घ्याल. चैनीच्या वस्तू खरेदी कराल. दिवस भाग्यकारक ठरेल.
  6. कन्या:- धार्मिक वृत्तीत वाढ होईल. व्यावसायिक प्रश्न मार्गी लागतील. छंद जोपासण्यात रमून जाल. नवीन विषयात रुचि दाखवाल. हातून एखादे सत्कार्य घडेल.
  7. तूळ:- कमी श्रमात कामे पार पडतील. जोडीदाराचे कौतुक कराल. शेअर्स मधून लाभ संभवतो. पैज जिंकता येईल. व्यावहारिक दृष्टीने विचार कराल.
  8. वृश्चिक:- वैवाहिक सौख्यात भर पडेल. तुमच्यातील अहंमन्यता वाढीस लागेल. एकमेकांची बाजू समजून घ्याल. भागीदारीत चांगला लाभ होईल. सर्वांच्या कौतुकास पात्र व्हाल.
  9. धनू:- नातेवाईकांची मदत घेता येईल. योग्य संधीची वाट पहावी लागेल. दिवस काहीसा आळसात जाईल. ऐशआरामाच्या वस्तु खरेदी कराल. काटकसरीकडे लक्ष द्या.
  10. मकर:- रागावर नियंत्रण ठेवावे. रेस जुगार यांतून लाभ संभवतो. मैत्रीतील घनिष्टता वाढेल. प्रेम सौख्याला बहार येईल. नातेवाईकांचे प्रश्न सामोरे येतील.
  11. कुंभ:- हातात नवीन अधिकार येतील. जवळच्या ठिकाणच्या प्रवासाचा योग येईल. घरगुती वातावरण प्रसन्न राहील. दिवस आनंदात जाईल. जवळचे मित्र भेटतील.
  12. मीन:- निसर्गाच्या सानिध्यात रमून जाल. हातातील कलेला वाव द्यावा. इतरांचे मनापासून कौतुक कराल. चांगली कल्पना शक्ति लाभेल. हस्त कलेचा आनंद घ्याल.

    – ज्योतिषी विद्याधर करंदीकर