28 January 2021

News Flash

आजचं राशीभविष्य, शुक्रवार, २५ डिसेंबर २०२०

सर्व बारा राशींचे भविष्य

 1. मेष : महत्वाची कामे मार्गी लागतील. आज आपल्याला कौटुंबिक स्वास्थ लाभेल. शैक्षणिक दृष्टीकोनातून विचार करता आजचा दिवस आपल्याला त्रासदायक ठरेल. व्यवसायात उद्योगात पूर्वी केलेल्या गुंतवणूकीतून चांगला लाभ होईल. जुने मित्र भेटतील.
 2. वृषभ : आज आपल्या संततीच्या प्रगतीस अनुकूल दिवस आहे. आज आपल्याहातून उत्तम दर्जाचे लिखाण होण्याचा योग आहे. वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने अनुकूल दिवस आहे. व्यवसायात अभिनव तंत्र वापरल्यामुळे यश येईल. सतत प्रसिद्धीच्या झोतात राहण्याचे योग येतील.
 3. मिथुन : महत्वाची कामे करताना स्वतःचे निर्णय स्वतःच घ्या. आज आपल्या इच्छा पूर्ण होतील. घरी पाहुणे येण्याची शक्यता. व्यवसाय वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीने नवीन ओळखींचा फायदा करुन घ्याल. आपल्या वक्तृत्त्वाची सभोवतालच्या व्यक्तींवर चांगली छाप पडेल.
 4. कर्क : अपेक्षित गाठीभेटी होतील. शैक्षणिक क्षेत्राशी नोकरीचा संबंध असणाऱ्या व्यक्तींना भाग्योदयाच्या दृष्टीने आजचा दिवस अनुकूल आहे. छोटे प्रवास कराल. तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला लाख मोलाचा ठरेल. नवीन जबाबदार्या तूर्त टाळाव्यात. मन सैरभैर होईल.
 5. सिंह : आज व्यवसाय धंदा चांगला झाल्याने आवक वाढेल. महत्वाचे निर्णय अत्यंत विचारपूर्वक घ्यावेत. व्यवसायातील कामानिमित्त प्रवास करावे लागतील. जोडीदाराच्या मतांचा पगडा राहील. कामानिमित्त परदेशप्रवास घडून येण्याची शक्यता राहते.
 6. कन्या : महत्वाची पत्रे येतील. मानसिक प्रसन्नता लाभेल. अचानक धनलाभ होण्याची शक्यता. नातेवाईकात गैरसमज निर्माण होतील. प्रवासात त्रास, अचडणी येतील. मन अस्वस्थ होईल.
 7. तूळ : परप्रांताशी संबंध येऊन व्यवसायवृद्धी होईल. नोकरीत अधिकारप्राप्ती होईल. सामाजिक कार्यकर्त्यांना त्यांच्या कार्याबद्दल सन्मान मिळेल. करमणुकीच्या कार्यक्रमातून आनंद मिळवाल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात यश लाभेल.
 8. वृश्चिक : पूर्वी केलेल्या कामाची वरिष्ठ प्रशंसा करतील. तसेच वरिष्ठ जबाबदारीचे काम सोपवतील. आज आपल्याला कामातील प्रगतीमुळे मानसिक स्वास्थ लाभेल. भरपूर काम करायचे आणि गृहसौख्याचा आस्वाद घ्यावयाचा असे मनोमन ठरवाल. गृहउद्योगातून हाती पैसा येईल.
 9. धनु : नोकरी-व्यवसायात उत्कर्षकारक घटना घडतील. वैवाहिक जोडीदाराची प्रगतीकारक घटना कानी येईल. महत्वाचे निर्णय घ्याल. सामाजिक प्रतिष्ठा उंचावेल. अपेक्षित पत्रव्यवहार अथवा फोन होतील. नोकरीत बढतीचे योग येतील.
 10. मकर : मित्रपरिवाराचे सहकार्य लाभेल. व्यावसायिक उत्कर्षामुळे आपली आवक वाढण्यास आजचा दिवस अनुकूल. वैवाहिक सौख्य लाभेल. वकर्तृत्वाच्या बळावर मोठी मजल माराल. जोड धंद्यातून चांगला फायदा होईल. मनःस्वास्थ लाभेल.
 11. कुंभ : अपेक्षित पत्रव्यवहार होतील. आपले अंदाज अचूक ठरतील. आजचा दिवस व्यावसायिक कार्यक्षेत्र वाढण्यास अनुकूल. ध्येय गाठण्यासाठी अनेक अडचणींना सामोरं जावं लागेल. कामाचे पूर्वनियोजन महत्त्वाचे राहील.
 12. मीन : महत्वाची कामे मार्गी लागतील. आर्थिक उन्नतीच्या दृष्टीने अनुकूल घडामोडी घडतील. नोकरीसाठी पूर्वी मुलाखत दिली असल्यास त्यात यशस्वी झाल्याची बातमी समजेल. साचेबद्ध जीवनातून विरंगुळा मिळावा म्हणून सांस्कृतीक कार्यक्रमात सहभाग घ्याल. अचानक सहलीचे आयोजन केले जाईल.

  — ज्योतिषी विद्याधर करंदीकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 25, 2020 12:33 am

Web Title: daily astrology horoscope friday 25 december 2020 aau 85
टॅग Astrology
Next Stories
1 आजचं राशीभविष्य, गुरुवार, २४ डिसेंबर २०२० 
2 आजचं राशीभविष्य, बुधवार, २३ डिसेंबर २०२०
3 आजचं राशीभविष्य, मंगळवार, २२ डिसेंबर २०२०
Just Now!
X