News Flash

आजचं राशीभविष्य, सोमवार, ०१ फेब्रुवारी २०२१

सर्व बारा राशींचे भविष्य

 1. मेष : कामाचा आनंद घ्यावा. हाताखालील लोकांचे उत्तम सहकार्य लाभेल. जवळचे नातेवाईक भेटतील. स्वभावात चंचलता येईल. लहानांशी मैत्री कराल.
 2. वृषभ : पचनाच्या तक्रारी राहतील. विचारातून कर्मठपणा दर्शवाल. वडिलांचे मत विरोधी वाटू शकते. आपल्या बुद्धिमत्तेचा योग्य वापर करता येईल. जुन्या गोष्टीत अडकून पडाल.
 3. मिथुन : प्रकृतीच्या बाबत हयगय करू नका. प्रतिकूलतेतून मार्ग काढता येईल. वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे. कामाचे योग्य नियोजन करावे. घरातील कामात अधिक गुंतून राहाल.
 4. कर्क : जवळच्या प्रवासाची मजा घ्याल. जवळचे मित्र जमवाल. आपल्या छंदाला अधिक वेळ द्यावा. शांतपणे विचार करावा. आधुनिकतेने विचार करून पहावा.
 5. सिंह : गैरसमजुतीतून वाद वाढू शकतात. काही गोष्टी दिरंगाईने पार पडतील. पायाचे त्रास दुर्लक्षित करू नका. कफ विकाराचा त्रास संभवतो. मानसिक शांतता जपावी लागेल.
 6. कन्या : आपली छाप पाडण्याचा प्रयत्न करावा. बौद्धिक दृष्टीकोन ठेवावा. दिवस आनंदात घालवाल. मैत्रीचे संबंध अधिक घट्ट होतील. घरातील प्रश्नांकडे प्राधान्याने लक्ष द्यावे.
 7. तूळ : घरातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी. कष्टाला मागेपुढे पाहू नका. चिकाटीने कामे करण्यावर भर द्यावा. योग्य समतोल राखण्याचा प्रयत्न करावा. फार विचार करू नयेत.
 8. वृश्चिक : काही गोष्टींचे चिंतन करावे. धैर्याने कामे हाती घ्यावीत. तुमच्या पराक्रमाला चांगला वाव मिळेल. चटकन निराश होऊ नका. काही गोष्टींचा सखोल विचार करावा.
 9. धनू : स्थावरची कामे मार्गी लागतील. चिकाटीने अनेक कामे हाती घ्याल. व्यवहारी दृष्टीकोन ठेवाल. कंजूषपणा दाखवू नका. अगदी मोजकेच बोलाल.
 10. मकर : प्रौढपणे वागणे ठेवाल. चटकन निराश होण्याचे कारण नाही. अडथळ्यातून मार्ग निघेल. सर्वांच्या आनंदात सहभागी व्हाल. तुमचा मान वाढेल.
 11. कुंभ : मानापमानाचे प्रसंग येऊ शकतात. काही मापदंड ठरवून घ्यावेत. आलेल्या संधीचा लाभ उठवावा. गप्पा मारण्यात रंगून जाल. मौल्यवान वस्तू खरेदी कराल.
 12. मीन : सामाजिक कामात हिरीरीने सहभाग नोंदवाल. मानाने कामे हाती घ्याल. काहीसे स्व‍च्छंदीपणे वागाल. चैनीच्या वस्तू खरेदी कराल. जोडीदाराचा प्रेमळपणा दिसून येईल.

— ज्योतिषी विद्याधर करंदीकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 1, 2021 1:00 am

Web Title: daily astrology horoscope monday 01 february 2021 aau 85
टॅग : Astrology
Next Stories
1 आजचे राशीभविष्य, शुक्रवार, ०१ जानेवारी २०२१
2 आजचं राशीभविष्य, गुरुवार, ३१ डिसेंबर २०२०
3 आजचे राशीभविष्य, बुधवार, ३० डिसेंबर २०२०
Just Now!
X