News Flash

आजचं राशीभविष्य, सोमवार, २६ एप्रिल २०२१

सर्व बारा राशींचे भविष्य

 1. मेष:- जोडीदाराच्या अपेक्षा पूर्ण कराल. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. सतत खटपट करत राहाल. कामाचा ताण जाणवेल. चिकाटी सोडू नका.
 2. वृषभ:- सर्वांशी गोड बोलणे ठेवाल. मोठ्या लोकांच्या ओळखीचा फायदा होईल. बर्‍याच दिवसांची हौस पूर्ण करून घ्याल. प्रत्येक गोष्टींचा उत्तम आस्वाद घ्याल. प्रेमाच्या दृष्टीने उत्तम मैत्री लाभेल.
 3. मिथुन:- मनातील विचित्र कल्पना काढून टाका. स्त्री सौख्याचा लाभ होईल. प्रेम प्रकरणाला बहार येईल. रेस व जुगार यांतून लाभ संभवतो. वरिष्ठांच्या मर्जीचे पालन करावे लागेल.
 4. कर्क:- नातेवाईकांकडून कौतुक केले जाईल. घरातील वातावरण खेळकर राहील. जोडीदाराची प्राप्ती वाढेल. घरगुती कामे आनंदाने पार पाडाल. जोडीदाराच्या सुस्वभावीपणा दिसून येईल.
 5. सिंह:- जवळच्या प्रवासाचा योग येईल. अपचनाचा त्रास जाणवेल. जोडीदाराशी खटके उडू शकतात. बर्‍याच दिवसांनी भावंडांची गाठ पडेल. कलेचे योग्य प्रशस्तिपत्रक मिळेल.
 6. कन्या:- कौटुंबिक वातावरणात रमून जाल. आवडीच्या गोष्टी करण्यात भर द्याल. चारचौघांत आपली कला सादर करा. योग्य संधीची वाट पहावी लागेल. कामातील अडथळे दूर होतील.
 7. तूळ:- दिवस मनाजोगा व्यतीत कराल. इतरांवर तुमच्या व्यक्तिमत्वाची छाप पडेल. नातेवाईकांचे प्रश्न जाणून घ्याल. जमिनीच्या कामातून लाभ संभवतो. आर्थिक स्थैर्याकडे लक्ष द्याल.
 8. वृश्चिक:- जोडीदाराचा लाडिक हट्ट पुरवावा लागेल. कौटुंबिक खर्च वाढू शकतो. मानसिक चंचलता जाणवेल. हातातील कामात यश येईल. तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल.
 9. धनू:- क्षुल्लक वादावादीत अडकू नका. काटकसरीवर भर द्यावा. प्रवासात योग्य सावधानता बाळगावी. हातात नवीन अधिकार येतील. केलेल्या कामाचे समाधान मिळेल.
 10. मकर:- काही कामे अडकून पडल्यासारखी वाटू शकतात. कामाच्या ठिकाणी चंचलता टाळावी. नातेवाईकांशी सामोपचाराचे धोरण ठेवावे. खर्चाचे गणित नव्याने मांडावे लागेल. नसती काळजी करत बसू नका.
 11. कुंभ:- पित्त विकार बळावू शकतो. इतरांना सहृदयतेने मदत करू शकाल. मुलांच्या आनंदात सहभागी व्हाल. घरगुती कामात वेळ घालवाल. रागावर नियंत्रण ठेवावे.
 12. मीन:- सामाजिक जाणीवेपोटी काम कराल. कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवावा. अचानक धनलाभ संभवतो. डोळ्यांची वेळोवेळी तपासणी करावी. अडथळ्यातून मार्ग काढता येईल.

    – ज्योतिषी विद्याधर करंदीकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 26, 2021 1:00 am

Web Title: daily astrology horoscope monday 26 april 2021 msr 87
Next Stories
1 आजचं राशीभविष्य, रविवार, २५ एप्रिल २०२१
2 आजचं राशीभविष्य, शनिवार, २४ एप्रिल २०२१
3 आजचं राशीभविष्य, शुक्रवार, २३ एप्रिल २०२१
Just Now!
X