28 January 2021

News Flash

आजचं राशीभविष्य, सोमवार, २८ डिसेंबर २०२०

सर्व बारा राशींचे भविष्य

 1. मेष : नोकरीत भाग्यकारक घटना घडण्यास आजचा दिवस अनुकूल. व्यवसायातील महत्वाचे निर्णय घ्यावे लागतील. कार्यक्षेत्र वाढण्याच्या दृष्टीने व्यावसायिक नवीन करार करावे लागतील. पुढे घडणाऱ्या घटनांची आपल्याला चाहूल लागेल. धार्मिक-आध्यात्मिक प्रगती साधता येईल.
 2. वृषभ : पूर्वी आपण केलेल्या कामाची पत्राद्वारे/फोनद्वारे पोच मिळेल. आर्थिक उन्नतीच्यादृष्टीने आजचा दिवस अनुकूल. आपण आपले एखादे काम पूर्ण करण्यासाठी जोडीदाराची मदत घ्या. अनेक कामे मार्गी लागण्याची चिन्हे दिसू लागतील. प्रॉप्रर्टी, गुंतवणुकीस चांगला.
 3. मिथुन : आपले आरोग्य उत्तम राहिल. आज आपल्याला संतसज्जनांचा सहवास लाभेल. आपल्या हातून धार्मिक कार्ये होतील. सामाजिक, राजकीय क्षेत्रातील व्यक्तींच्या बोलण्याचा चांगला प्रभाव टाकणारा आहे. तरुणांना सुसंधीचा लाभ मिळेल.
 4. कर्क : महत्वाची कामे दुपारपूर्वीच करून घ्या. संध्याकाळी एखाद्या समारंभात सहभागी होण्यासाठी आपल्याला बाहेर पडावे लागेल. वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने आजचा दिवस आपल्यासाठी अनुकूल आहे. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी स्पर्धा परीक्षा देऊन यश मिळेल. नवनवीन कल्पना आकार घेतील.
 5. सिंह : परप्रांतातील व्यावसायिकांबरोबर आपण एखादा करार फाइनल कराल. आपल्या भवितव्याच्या दृष्टीने तो करार भाग्यवृद्धी करणारा ठरेल. आपल्या चतुर संभाषणामुळे समाजात आपल्याला प्रतिष्ठा लाभेल. आपले मनोधैर्य एखादवेळेस खचण्याचा संभव राहतो. कोणाच्याही भूलथापांना बळी पडू नका.
 6. कन्या : व्यावसायिक प्रगतीच्या दृष्टीने कार्यक्षेत्र वाढविणारा दिवस. आपल्या हुशारीवर आज आपली अनेक कामे मार्गी लागतील. आपण घेतलेले निर्णय योग्य ठरतील. न्याय प्रविष्ठ प्रकरणातून लाभ होतील. थोरा-मोठय़ांच्या सहकाऱ्याने आपली रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. कर्जप्रकरणे मंजूर होतील.
 7. तूळ : वैवाहिक सौख्याच्यादृष्टीने आजचा दिवस अनुकूल. भागिदारीत व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांनी आपली महत्वाची कामे दुपारनंतर करावीत. आपले अंदाज अचूक ठरतील. एखादी शाब्बासकीची थाप पाठीवर पडल्यामुळे हायसे वाटेल. कर्तव्यभावना जागृक ठेवून कामाची आखणी केली जाईल.
 8. वृश्चिक : पूर्वी केलेल्या आपल्या कामाची वरिष्ठ प्रशंसा करतील. आपली महत्वाची कागदपत्रे काळजीपूर्वक हाताळा. व्यावसायिक मतभेद टाळावेत. नाविण्यपूर्ण कलाकृतींचा ध्यास घ्याल. आपले आवडते छंद जोपासण्यासाठी वेळ देता येईल.
 9. धनु : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वाहने चालवताना सावधगिरी बाळगा. नोकरीत कामाची दगदग जाणवेल. राह्त्या जागेचे किंवा व्यवसायाच्या जागेचे प्रश्न सुटतील. प्रवास सुखकर होईल.
 10. मकर : आज आपल्या नवीन व्यवसायासाठीचे शुभारंभ होतील. आज भाग्यकारक घटना घडण्यास अनुकूल दिवस आहे. आपण ठरवलेली आपली सर्व कामे मार्गी लागतील. सामाजिक कार्यात आपल्याला योग्य प्रतिसाद मिळेल. समाजात आपल्या मतांचा आदर होईल.
 11. कुंभ : कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीने आजचा दिवस आपल्याला अनुकूल आहे. संतसज्जनांचा सहवास लाभेल. आपल्या हातून महत्वाचे कर्तव्य पार पडेल. आर्थिक बाबतीत काळ अनुकूल आहे. स्वकष्टाचा पैसा मिळेल. तसाच खर्चही वाढेल.
 12. मीन : आज आपल्या घरी पाहुणे येण्याची शक्यता. व्यावसायिक उत्कर्षाच्या दृष्टीने आजचा दिवस अनुकूल आहे. नवीन प्रोजेक्ट्स संबंधीची बोलणी होतील. तरुणांच्या कौशल्याला चांगला वाव मिळेल. आपल्या कर्तृत्वाला चांगली झळाळी मिळेल.

— ज्योतिषी विद्याधर करंदीकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 28, 2020 12:23 am

Web Title: daily astrology horoscope monday 28 december 2020 aau 85
टॅग Astrology
Next Stories
1 आजचं राशीभविष्य, रविवार, २७ डिसेंबर २०२०
2 आजचं राशीभविष्य, शनिवार, २६ डिसेंबर २०२०
3 आजचं राशीभविष्य, शुक्रवार, २५ डिसेंबर २०२०
Just Now!
X