- मेष : व्यवसायातून चांगली प्राप्ती होईल. बढतीची शक्यता दिसून येईल. मित्रांच्या ओळखीचा फायदा होईल. कामात स्त्रियांची मदत मिळेल. तुमची समाजप्रियता वाढेल.
- वृषभ : सांपत्तिक स्थिती सुधारेल. अनपेक्षित लाभ होतील. कलेला चांगली प्रसिद्धी मिळेल. प्रशस्तिपत्रकास पात्र व्हाल. इतरांची मने जिंकून घेता येतील.
- मिथुन : सर्वांशी सहृदयतेने वागाल. कलेला पोषक वातावरण लाभेल. चांगले साहित्य वाचनात येईल. परोपकारीवृत्तीने वागाल. लेखकांना चांगली प्रतिभा लाभेल.
- कर्क : काही कामे कमी श्रमात पार पडतील. सासुरवाडीची मदत मिळेल. वारसाहक्काची कामे मार्गी लागतील. रेस, सट्टा यांतून लाभ संभवतो. शेअर्समध्ये गुंतवणूक कराल.
- सिंह : पत्नीचा सुस्वभावीपणा दिसून येईल. तुमच्यातील एकोपा वाढेल. वैवाहिक सौख्याला उधाण येईल. प्रलोभनाला बळी पडू नका. भागीदारीत चांगला लाभ होईल.
- कन्या : काही इच्छा पूर्ण होण्यास वेळ लागेल. लोकोपवादाकडे दुर्लक्ष करावे. व्यसनाच्या आहारी जाऊ नका. काहीसा आळशीपणा जाणवेल. हाताखालील कामगार चांगले मिळतील.
- तूळ : तुमच्यातील गुण प्रकट होतील. व्यवहाराला विसरू नका. चांगले आत्मिक समाधान लाभेल. मनाजोगा छंद जोपासता येईल. कलात्मक दृष्टीकोन ठेवाल.
- वृश्चिक : घराची टापटीप ठेवाल. प्रेमभावनेत वाढ होईल. मित्र-परिवारात वाढ होईल. प्रेमाचे योग्य मूल्यमापन कराल. नवीन कल्पना रूजवाल.
- धनू : हातातील कलेत रममाण व्हाल. इतरांचे कौतुक कराल. प्रवासाची हौस भागवाल. नव्या स्फूर्तीने बघाल. मदतीचा हात पुढे कराल.
- मकर : तुमची उत्कृष्ट छाप पडेल. आवाजात गोडवा ठेवाल. कमतरता भरून निघेल. गोड पदार्थ खायला मिळतील. महिला अलंकार खरेदी करतील.
- कुंभ : आवडी-निवडीवर भर द्याल. महिला नटण्याची हौस पूर्ण करतील. प्रत्येक गोष्टीत रस घ्याल. चांगला दृष्टीकोन रूजवाल. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल.
- मीन : क्षुल्लक अडचणीतून मार्ग काढावा. मानपमानाचे प्रसंग फार मनावर घेऊ नका. प्रवासात काळजी घ्यावी. मनातील विचित्र कल्पना काढून टाकाव्यात. काही गोष्टी मनात नसतांना सुद्धा कराव्या लागतील.— ज्योतिषी विद्याधर करंदीकर
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 16, 2021 12:44 am
Web Title: daily astrology horoscope saturday 16 january 2021 aau 85