News Flash

आजचं राशीभविष्य, शनिवार, २७ फेब्रुवारी २०२१

सर्व बारा राशींचे भविष्य

 1. मेष –तुमचे व्यक्तिमत्व खुलून येईल. भावंडांशी खेळीमेळीचे वातावरण राहील. दीर्घकालीन गुंतवणुकीवर भर द्यावा. विरोधकांपासून सावध राहावे. मुलांची प्रगती होताना दिसेल.
 2. वृषभ –सहकार्‍यांशी असणारा वाद संपुष्टात येईल. मित्रपरिवाराची अपेक्षित मदत मिळेल. कलाकार मंडळींची प्रगती होईल. बौद्धिक कामे करणार्‍यांना चांगली संधि मिळेल. महत्त्वाची कामे यशस्वी होतील.
 3. मिथुन –राजकारणापासून दूर राहावे. नोकरी निमित्त प्रवास करावा लागेल. वाहन जपून चालवावे. क्षुल्लक कारणांवरून रूसवे फुगवे संभवतात. नसते साहस करू नका.
 4. कर्क –कलाकारांचे मनोरथ पूर्ण होईल. सहकुटुंब तीर्थयात्रेचा योग येईल. मुलांच्या शुभ वार्तेने कान सुखावतील. आनंदाच्या भरात हुरळून जाऊ नका. जोडीदाराला अचानक लाभ संभवतो.
 5. सिंह –कामानिमित्त बराच प्रवास करावा लागेल. पैशाचा अपव्यय होणार नाही ह्याची काळजी घ्यावी. घरासाठी नवीन वस्तु खरेदी कराल. पर्यटनाचा विचार मनात येईल. घराचे सुशोभीकरण काढाल.
 6. कन्या –पदोन्नतीचे योग संभवतात. आर्थिक गरज पूर्ण होईल. कोणतेही गोष्ट अती करू नये. तुमच्या मताला प्राधान्य दिले जाईल. आलेल्या संधीचे सोने करावे.
 7. तूळ –सांस्कृतिक कामात सहभाग घ्याल. मुलांना उल्लेखनीय प्रशस्तिपत्रक मिळेल. कोणत्याही गोष्टीच्या जास्त खोलात जाऊ नका. जोडीदाराचे मत तुम्हाला पटणार नाही. बेफिकिरपणे वागू नका.
 8. वृश्चिक –तुमच्यातील कलागुणांची वाढ होईल. प्रेमप्रकरणात सावधानता बाळगा. योग्यायोग्याची खात्री करावी. तुमचा अंदाज अचूक ठरेल. मौज मजेकडे कल राहील.
 9. धनू –वाहन विषयक कामे निघतील. चैनीच्या वस्तु खरेदी कराल. व्यवसायिक ठिकाणी मन लावून काम करावे. कौटुंबिक सुख-शांति जपावी. अनिष्टता टाळण्याचा प्रयत्न करावा.
 10. मकर –आर्थिक कोंडी सोडवावी लागेल. व्यवसायिकांनी सजगता दाखवावी. वारसाहक्काच्या कामांतून लाभ संभवतो. कागदपत्रांवर विचारपूर्वक सह्या कराव्यात. कौटुंबिक ताणतणाव कमी करण्याचा प्रयत्न करावा.
 11. कुंभ –प्रकृतीची हेळसांड करू नये. जोडीदाराचे वर्चस्व राहील. मेहनतीत कसूर करू नका. वेळेचे मोल लक्षात घ्यावे. सामाजिक सेवेत पुढाकार घ्याल.
 12. मीन –चांगला आर्थिक लाभ होईल. मोहापासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. मित्रपरिवारात वाढ होईल. कोणावरही विसंबून राहू नका. मुलांची काळजी लागून राहील.

 

      – ज्योतिषी विद्याधर करंदीकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 27, 2021 12:44 am

Web Title: daily astrology horoscope saturday 27 february 2021 msr 87
Next Stories
1 आजचं राशीभविष्य, शुक्रवार, २६ फेब्रुवारी २०२१
2 आजचं राशीभविष्य, गुरूवार, २५ फेब्रुवारी २०२१
3 आजचं राशीभविष्य, बुधवार, २४ फेब्रुवारी २०२१
Just Now!
X