1. मेष:- जवळच्या प्रवासाचा आनंद घ्याल. भावंडांचा प्रेमळ सहवास लाभेल. उत्तम वाहन सौख्य लाभेल. मध्यस्थीच्या कामातून लाभ होईल. आवडीच्या गोष्टी करायला वेळ मिळेल.
  2. वृषभ:- आवक जावक यांचा मेळ जुळवावा. अती श्रमामुळे थकवा जाणवेल. कुटुंबात तुमचा दबदबा राहील. कामात काही अनपेक्षित बदल संभवतात. घरगुती प्रश्नांकडे अधिक लक्ष द्यावे.
  3. मिथुन:- कोणत्याही गोष्टीचा फार ताण घेऊ नका. फसवणुकीपासून सावध रहा. गप्पा गोष्टी करण्यात वेळ घालवाल. अघळपघळ बोलणे टाळा. इतरांचा तुमच्याबद्दल गैरसमज होऊ शकतो.
  4. कर्क:- मानसिक चंचलतेला आवर घालावी. घरासाठी काही मोठ्या वस्तू खरेदी कराल. मानाच्या व्यक्तींची गाठ पडेल. प्रकृतीबाबत हयगय करू नका. उष्णतेचे त्रास संभवतात.
  5. सिंह:- केलेल्या कामातून समाधान मिळेल. नवीन मित्र जोडाल. खूप दिवसांनी जुने मित्र भेटतील. पत्नीशी वादाचे प्रसंग येऊ शकतात. अपचनाचा त्रास जाणवेल.
  6. कन्या:- कामाची एकाच धांदल उडेल. योग्य व्यवस्थापनावर भर द्यावा. कमिशन मधून चांगला लाभ मिळेल. इतरांचा विश्वास संपादन करावा. कौटुंबिक सौख्यात भर पडेल.
  7. तूळ:- अडथळ्यातून मार्ग काढता येईल. दिरंगाई झाले तरी कामे पूर्ण होतील. मित्रांच्या मदतीचा लाभ होईल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. दूरच्या प्रवासाचा योग येईल.
  8. वृश्चिक:- मनातील निराशा झटकून टाका. सकारात्मक विचारांची कास धरावी. कौटुंबिक गोष्टींमध्ये लक्ष घाला. कामाचा व्याप वाढता राहील. हातातील कामे पूर्ण होतील.
  9. धनू:- मनातील चुकीचे विचार दूर सारावेत. वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे. भावंडांशी सलोखा वाढवावा. खर्चाचे प्रमाण आटोपते ठेवावे. जोडीदाराशी सल्ला मसलत करावी.
  10. मकर:- कामात आळस आड आणू देऊ नका. जवळचे नातेवाईक भेटतील. इतरांचा विश्वास संपादन करावा. हाताखालील लोकांवर बारीक लक्ष ठेवावे. कुणावरही चटकन विश्वास टाकू नका.
  11. कुंभ:- तब्येतीच्या तक्रारींकडे वेळीच लक्ष द्या. गरज नसेल तर प्रवास करू नये. वाहन चालवताना सतर्कता बाळगावी. नवीन मित्र जोडण्याचा प्रयत्न करावा. मुलांच्यात दिवस खेळीमेळीत जाईल.
  12. मीन:- सामुदायिक वादापासून दूर राहावे. स्त्री वर्गापासून हानी संभवते. व्यावसायिक लाभाने संतुष्ट राहाल. उत्तम गृह सौख्या लाभेल. मित्रांबाबतचे गैर समज दूर होतील.

      – ज्योतिषी विद्याधर करंदीकर