01 March 2021

News Flash

आजचं राशीभविष्य, रविवार, १७ जानेवारी २०२१

सर्व बारा राशींचे भविष्य

  1. मेष : मानसिक चंचलता जाणवेल. घरापासून दूर जावे लागेल. पत्नीशी किरकोळ कारणावरून मतभेद संभवतात. जुनी येणी वसूल होतील. हातातील अधिकार वापरावे.
  2. वृषभ : जोडीदाराचे वर्चस्व राहील. एकमेकांची बाजू समजून घ्यावी. काही गोष्टी मनाविरूद्ध वाटू शकतात. कोर्ट कचेरीची कामे तूर्तास टाळावीत. मनातील इच्छा पूर्ण होईल.
  3. मिथुन : कामात चंचलता दाखवू नका. एकसूत्रतेने कामे करावीत. पोटाची काळजी घ्यावी. मुलांचे वागणे मनाविरुद्ध वाटू शकते. कौटुंबिक जबाबदारी लक्षात घ्या.
  4. कर्क : सहृदयतेने मदत कराल. परोपकाराची जाणीव ठेवा. भावनिक गुंतागुंत जाणवेल. काही लाभ अचानक होतील. जोडीदाराचे मत विचारात घ्यावे.
  5. सिंह : वैवाहिक सौख्य बहरून येईल. दूरच्या गावी जाण्याचे योग येईल. आरोग्यात काहीशी सुधारणा होईल. शेअर्समधून काही फायदा संभवतो. अचानक धनलाभाची शक्यता.
  6. कन्या : हाताखालील नोकरांचे सहकारी लाभेल. कौटुंबिक गरजा भागवटा येतील. प्रवासात सावधगिरी बाळगावी. मनातील अकारण भीती बाजूस सारा. भागीदारीत फायदा होईल.
  7. तूळ : प्रवासात काळजी घ्यावी. भावंडांची मदत मिळेल. अनाठायी खर्च वाढू शकतो. हातातील कामात चिकाटी ठेवा. प्रकृतीची काळजी घ्यावी.
  8. वृश्चिक : फार हट्टीपणा करू नका. अतिउत्साह दाखवू नका. पित्तविकार बळावू शकतो. डोकेदुखीचा त्रास जाणवेल. पराक्रमाला वाव मिळेल.
  9. धनू : जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. हातापायांची दुखणी त्रासदायक ठरू शकतात. कौटुंबिक खर्च वाढेल. आवक-जावक यांचे योग्य गणित मांडा. गैर-समजुतींपासून दूर रहा.
  10. मकर : मित्र-मंडळींशी मतभेद संभवतात. सामाजिक कार्यात मदत कराल. अतिअपेक्षा बाळगू नका. कौटुंबिक अडचणींतून मार्ग काढता येईल. अध्यात्मिक प्रगती होईल.
  11. कुंभ : नसत्या प्रकरणात अडकू नका. काही बदलांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. कामाचा ताण जाणवेल. काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न कराल. थोरांशी मतभेद संभवतात.
  12. मीन : आवडत्या कामात अधिक लक्ष्य द्यावे. वाहन वेगावर नियंत्रण ठेवा. वरिष्ठांकडून कौतूक केले जाईल. औद्योगिक वाढ करणे शक्य होईल. अधिकार्‍यांची भेट होईल.

    — ज्योतिषी विद्याधर करंदीकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 17, 2021 1:00 am

Web Title: daily astrology horoscope sunday 17 january 2021 aau 85
टॅग : Astrology
Next Stories
1 आजचं राशीभविष्य, शनिवार, १६ जानेवारी २०२१
2 आजचं राशीभविष्य, शुक्रवार, १५ जानेवारी २०२१
3 आजचं राशीभविष्य, गुरुवार, १४ जानेवारी २०२१
Just Now!
X