1. मेष:-सर्वांना गोडीने आपलेसे कराल. कामाचा ताण जाणवेल. कामातील दिरंगाई टाळण्याचा प्रयत्न करावा. मित्रांशी वाद वाढवू नयेत.
  2. वृषभ:-आपले विचार कौशल्याने मांडाल. तुमच्यातील चतुरता दिसून येईल. इतरांवर तुमचा चांगला प्रभाव पडेल. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. अचानक लाभ संभवतो.
  3. मिथुन:-मोठ्या लोकांचा सहवास लाभेल. कामात अधिकारी वर्गाची मदत मिळेल. भागिदारीतून चांगला लाभ संभवतो. कामात कसलीही कसूर करू नका. वातविकाराचा त्रास जाणवू शकतो.
  4. कर्क:-स्त्रियांशी मैत्री कराल. खेळकरपणे दिवस घालवाल. कामाच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल. कामाचा उरक वाढवावा लागेल. पोटाची किरकोळ तक्रार जाणवेल.
  5. सिंह:-काही तडजोडी स्वीकाराव्या लागतील. रेस, जुगार यांत अडकू नका. कलेला योग्य दाद मिळेल. सामाजिक कामात सहभाग घ्याल. चटकन कोणावरही विश्वास ठेवू नका.
  6. कन्या:-कौटुंबिक वातावरण चांगले राहील. कुशलपणे आपले मत पट‍वून द्याल. उगाच शिस्तीचा बडगा आमलात आणू नये. प्रवासाचा योग येईल. अपचनाचा त्रास संभवतो.
  7. तूळ:-भावंडांची काळजी लागून राहील. भागीदारीत अधिकाराने वागाल. जवळच्या प्रवासाचा योग येईल. नातेवाईकांशी सलोखा वाढवावा. काहीसा मानसिक ताण जाणवेल.
  8. वृश्चिक:-घरगुती प्रश्न चिघळू देवू नयेत. चांगला व्यावसायिक लाभ होईल. काहीसा मानसिक ताण जाणवेल. जोडीदाराचे बोलणे लाडिक वाटेल. चारचौघांत तुमचे कौतुक केले जाईल.
  9. धनू:-दिवस सत्कारणी लावाल. धार्मिक कामात सहभाग घ्याल. जवळचे नातेवाईक भेटतील. जुन्या प्रसंगांना उजाळा देण्यात येईल. प्रवास जपून करावा.
  10. मकर:-तुमच्या बोलण्याला धार येईल. मागच्या पुढच्या गोष्टींचा विचार करणे अपरिहार्य आहे. तुमच्या जवळील ज्ञानाचा सदुपयोग होईल. आर्थिक गोष्टींचा पुनर्विचार करावा.
  11. कुंभ:-रागावर नियंत्रण ठेवा. अती महत्त्वाकांक्षा चांगली नाही. तुमच्यातील धाडस वाढीस लागेल. उत्साहाने कामे पूर्ण कराल. डोकेदुखीचा त्रास संभवतो.
  12. मीन:-डोळ्यांची वेळेवर तपासणी करावी. गैरसमजुतीमुळे त्रास संभवतो. कामातील चलबिचलता टाळावी. व्यावसायिक बाबींचा सखोल विचार करावा. जबाबदारी योग्य रीतीने पार पाडाल.   

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

Hanuman Jayanti
Hanuman Jayanti : हनुमान जयंतीच्या दिवशी मंगळ गोचरमुळे ‘या’ राशींचे नशीब चमकरणार, मिळणार बक्कळ पैसा?
21st April Panchang Daily Marathi Horoscope Sarvarth Siddhi Yog
२१ एप्रिल पंचांग: आजचा सर्वार्थ सिद्धी योग १२ पैकी ‘या’ राशींना देईल मान व धन; रविवारी कुणाचं नशीब चमकणार?
9th April 2024 Panchang & Marathi Horoscope
गुढीपाडवा विशेष राशी भविष्य: ९ एप्रिलला मेष ते मीनपैकी कुणाचं नशीब घेईल कलाटणी; तुमचं नववर्ष होणार गोड?
Shani Dev Vakri In Kumbh saturn vakri in Aquarius these three zodiac sign big success in life
३० वर्षांनंतर शनिदेवाची कुंभ राशीत वक्री चाल; ‘या’ राशींना येतील सोन्याचे दिवस? मिळू शकेल बक्कळ पैसा