1. मेष:-धार्मिक कामात हातभार लावाल. इतरांच्या आनंदाने खुश व्हाल. नावलौकिकास पात्र व्हाल. दानाचे महत्व पट‍वून द्याल. चांगली कल्पनाशक्ति लाभेल.
  2. वृषभ:-प्रवासात सतर्क राहावे. काही गोष्टी अकस्मात घडू शकतात. तडकाफडकी निर्णय घेऊ नका. आरोग्याची काळजी घ्यावी. मनात उगाचच भीती दाटून येईल.
  3. मिथुन:-जोडीदाराचे मत विचारात घ्यावे. काही गोष्टी दुर्लक्षित कराव्यात. उगाचच विरोध करणे टाळावे. वैवाहिक सुख-शांती जपावी. मोठ्या लोकात वावराल.
  4. कर्क:-पोटाचे त्रास संभवतात. फार तिखट व तामसी पदार्थ खाणे टाळावे. जोडीदाराच्या शांत स्वभावाचा अचंबा वाटेल. भावंडांची काळजी लागून राहील. मानसिक स्वास्थ जपावे.
  5. सिंह:-स्वत:च हेका गाजवाल. मैदानी खेळ खेळाल. आपले ज्ञान उपयोगात आणावे. चर्चेतून प्रश्न सोडविता येईल. स्वत:च्याच मतावर ठाम राहाल.
  6. कन्या:-कौटुंबिक समस्या शांततेने सोडवावी. काही गोष्टींची तडजोड करावी लागेल. रेस, जुगार यातून लाभ संभवतो. शेअर्स मध्ये गुंतवणूक कराल. वाहन सावधगिरीने चालवावे.
  7. तूळ:-मानसिक संवेदनशीलता दाखवाल. सर्वांशी प्रेमळपणे वागावे. मनात काहीशी भीती लागून राहील. नवीन विषय जाणून घ्यावेत. चलाखीने वागणे ठेवाल.
  8. वृश्चिक:-घरगुती प्रश्न भेडसावतील. कौटुंबिक खर्च वाढेल. सारासार विचार करण्यावर भर द्यावा. उगाचच दिमाख दाखवायला जाऊ नका. शा‍ब्दिक चकमक टाळावी.
  9. धनू:-मानसिक चलबिचलता जाणवेल. रागावर नियंत्रण ठेवावे. परिस्थितीला नावे ठेवू नका. विचारपूर्वक निर्णय घ्यावा. अडचणीतून मार्ग काढावा.
  10. मकर:-शांत व संयमी विचार करावा. लोकनिंदेला बळी पडू नका. जुन्या प्रकरणातून त्रास संभवतो. गैरसमजुतीतून वाद वाढू शकतो. कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवावा.
  11. कुंभ:-मित्रांशी मतभेद संभवतात. कसलाही वाद वाढू देवू नका. बौद्धिक चुणूक दाखवावी लागेल. वायफळ गप्पा मारत वेळ वाया घालवू नका. जबाबदारीची जाणीव ठेवा.
  12. मीन:-कामाचा व्याप लक्षात घ्यावा. स्वत:चे सत्व राखण्याचा प्रयत्न करावा. वागण्यातून आत्मविश्वास दाखवून द्याल. स्वभावात कणखरपणा ठेवावा. कागदपत्रे तपासून घ्यावीत.