1. मेष:-खाण्यापिण्याची चंगळ राहील. धार्मिक कामांकडे कल राहील. महत्त्वाची कागदपत्रे सांभाळून ठेवावीत. लेखनी जपून चालवावी. सामाजिक मान वाढेल.
  2. वृषभ:-वादा वादीचे प्रसंग टाळावेत. आर्थिक आवक चांगली राहील. उधळ पट्टीला आवार घालावी. पोटाच्या किरकोळ समस्या जाणवतील. मानसिक व्यग्रता दूर सारावी.
  3. मिथुन:-श्रद्धा व सबुरी बाळगावी लागेल. जोडीदाराचा वरचष्मा राहील. भागीदारीत मिळतेजुळते घ्यावे लागेल. तब्येतीची हेळसांड करू नका. उपासनेतून मानसिक शांतता मिळेल.
  4. कर्क:-कोणत्याही गोष्टीचा विपर्यास करू नका. कागदपत्र नीट तपासून घ्यावीत. कौटुंबिक अडचणीतून मार्ग काढता येईल. वरिष्ठांशी जुळवून घ्या. आपली प्रतिष्ठा सांभाळावी लागेल.
  5. सिंह:-भाऊबंदकीचा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी दक्षता बाळगावी. प्रकृतीची योग्य वेळी तपासणी करावी. प्रेमीकांनी अती वाहवत जाऊ नये. वरिष्ठांच्या कलाने घ्यावे लागेल.
  6. कन्या:-भागीदारीच्या व्यवसायात सबुरी बाळगा. सहकुटुंब प्रवासाचा योग येईल. छुप्या शत्रूंचा त्रास वाढू शकतो. तुमच्यातील उत्साह मावळू देऊ नका. बुद्धिकौशल्याने कामे करावीत.
  7. तूळ:-स्थावर संबंधीचे प्रश्न सोडवावेत. मुलांशी मतभेदाचे प्रसंग येतील. संघर्षाचे मुद्दे दूर सारावेत. सावधपणे व विचारपूर्वक कृती करा. कर्तव्यात व्यवहार आड आणू नका.
  8. वृश्चिक:-वैवाहिक सुखात सुधारणा होईल. क्षुल्लक कुरबुरी दूर साराव्यात. विरोधक डोके वर काढू शकतात. आळस झटकून कामाला लागावे लागेल. दुचाकी वाहन जपून चालवावे.
  9. धनू:-घरातील वातावरण खेळीमेळीचे ठेवण्याचा प्रयत्न करा. जोडीदाराला कामात मदत करावी. आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगा. धार्मिक कामांत मन रमवावे. कौटुंबिक खर्च वाढू शकतो.
  10. मकर:-मनातील इच्छा पूर्ण होईल. सरकारी कामाचा लाभ उठवावा. कागदपत्रांवर सह्या करताना काळजी घ्यावी. भावंडांची नाराजी दूर करावी. वरिष्ठांकडून कौतुक केले जाईल.
  11. कुंभ:-घराचे नूतनीकरण काढाल. अर्थार्जनात वाढ संभवते. कामाच्या ठिकाणी मान वाढेल. जोडीदाराच्या कमाईत वाढ होईल. रखडलेली कामे मार्गी लागतील.
  12. मीन:-कामाचे योग्य नियोजन करावे. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. भावंडांना आर्थिक मदत कराल. मैत्रीत वितुष्टता आणू नका. सामाजिक कामात सहभाग घ्याल.

  – ज्योतिषी विद्याधर करंदीकर