News Flash

आजचं राशीभविष्य, गुरूवार, १५ एप्रिल २०२१

सर्व बारा राशींचे भविष्य

 1. मेष:- कौटुंबिक प्रश्न सुटतील. तुमचे व्यक्तिमत्व बहरेल. नोकरदार वर्गाला चांगला नफा मिळेल. आर्थिक व्यवहार सावधगिरीने करावेत. तुमच्यातील उद्योगशीलता वाढेल.
 2. वृषभ:- घरात महिलांचे वर्चस्व वाढेल. अवाजवी कामे अंगावर घेऊ नयेत. मेहनतीला मागेपुढे पाहू नका. उधार उसनवारीचे व्यवहार करू नयेत. खर्च आटोक्यात ठेवावा.
 3. मिथुन:- बिनधास्तपणे वागणे ठेवाल. पत्नीच्या प्रेमळ सौख्यात भर पडेल. तरुण वर्गाशी संपर्क वाढेल. नियम बाह्य कामे करू नका. योग्य मार्गदर्शनाचा लाभ घ्या.
 4. कर्क:- उत्तम वाहन सौख्य लाभेल. घरगुती कामे वेळेत पार पडतील. मनाजोगी खरेदी करता येईल. मित्र परिवारात वाढ होईल. मौल्यवान वस्तू लाभतील.
 5. सिंह:- कामानिमित्त प्रवास कराल. बोलण्यातून इतरांवर छाप पाडाल. दान धर्माचे पुण्य पदरी पडेल. स्पर्धकांवर मात करता येईल. हाताखालील लोकांवर लक्ष ठेवावे.
 6. कन्या:- तब्येतीची काळजी घ्यावी. पित्त प्रकृतीत वाढ संभवते. मुलांचे वागणे मनाविरुद्ध वाटू शकते. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. आध्यात्मिक अनुभूतीचा लाभ मिळेल.
 7. तूळ:- व्यावसायिक प्रवास करावा लागेल. स्वत:चेच खरे करण्याचा प्रयत्न कराल. मनात उगीचच हुरहूर वाटेल. मानपमानाचे प्रसंग येऊ शकतात. जोडीदाराशी विचार विनिमय करावा.
 8. वृश्चिक:- हित शत्रूंचा त्रास संभवतो. कामातील उत्साह वाढेल. भावंडांचे प्रश्न सामोरे येतील. स्वभावात काहीसा हटवादीपणा येईल. नवीन आव्हान पेलाल.
 9. धनू:- कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवावा. व्यापारी वर्गाला चांगला धनलाभ होईल. जोडीदाराशी किरकोळ मतभेद संभवतात. हाताखालील लोकांचे सहकार्य मिळेल. नातेवाईकांना मदत करावी लागेल.
 10. मकर:- काही वेळ शांत राहणे उत्तम. फार उतावीळपणा करू नका. उष्णतेचे विकार संभवतात. कामातील उत्साह वाढीस लागेल. स्वत:च्या हिंमतीवर कामे पूर्ण कराल.
 11. कुंभ:- सामुदायिक वादात अडकू नका. काही कामे खिळून पडल्यासारखी वाटतील. प्रवासात काळजी घ्यावी. गैरसमजुतीतून त्रास संभवतो. हातापायांना किरकोळ इजा संभवते.
 12. मीन:- कौटुंबिक जबाबदारी वाढेल. जवळचा प्रवास मजेत पार पडेल. मित्रांची नाराजी दूर करावी. तुमच्या शब्दाला वजन प्राप्त होईल. व्यवहारी दृष्टीकोन ठेवाल.

    – ज्योतिषी विद्याधर करंदीकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 15, 2021 12:54 am

Web Title: daily astrology horoscope thursday 15 april 2021 msr 87
Next Stories
1 आजचं राशीभविष्य, बुधवार, १४ एप्रिल २०२१
2 आजचं राशीभविष्य, मंगळवार, १३ एप्रिल २०२१
3 आजचं राशीभविष्य, सोमवार, १२ एप्रिल २०२१
Just Now!
X