1. मेष:-आपल्या व्यक्तिमत्वाला अधिक उठाव येईल. तरुणांच्या संगतीत दिवस घालवाल. लहान मुलांच्यात खेळाल. चौकसपणा दाखवाल. तुमच्यातील भावनाशीलता दिसून येईल.
  2. वृषभ:-अधिकार्‍यांचा सल्ला घ्यावा लागेल. सामाजिक कामात पुढाकार घ्याल. स्वत:चा मान राखून वागाल. मुलांचे मत विचारात घ्यावे. कमिशन मधून फायदा मिळेल.
  3. मिथुन:-चैनीच्या वस्तु खरेदी कराल. व्यापारी वर्गाचा आर्थिक स्तर सुधारेल. सहकुटुंब मौज-मजेचा बेत आखाल. हातातील अधिकार वापरण्याची संधी मिळेल. महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी पाऊले उचलाल.
  4. कर्क:-सर्वासमोर आपली कला सादर करता येईल. घरासाठी सजावटीचे सामान खरेदी केले जाईल. टाप-टिपीकडे अधिक लक्ष द्याल. स्वत:चा मान वाढवण्यासाठी प्रयत्न कराल. कामाचा उत्तम मोबदला मिळेल.
  5. सिंह:-पोटाची तक्रार जाणवेल. वात-विकाराकडे दुर्लक्ष करू नका. योग्य संधीची वाट पाहावी. सहकुटुंब प्रवास कराल. पत्नीचा सुस्वभावीपणा दिसून येईल.
  6. कन्या:-अचानक धनलाभ संभवतो. जुनी येणी वसूल होतील. जोडीदाराचे कौतुक केले जाईल. नातेवाईकांचा गैरसमज दूर करावा. मुलांच्या खोडकरपणात वाढ होईल.
  7. तूळ:-प्रेमसंबंध अधिक घट्ट होतील. भागीदारीच्या व्यवसायाला अधिक गती येईल. संपर्कातील लोकांशी एकोपा वाढेल. कौटुंबिक खर्च वाढू शकतो. मौज-मजेकडे कल राहील.
  8. वृश्चिक:-हाताखालील नोकरांचे सहकार्य मिळेल. कामे वेळेत पूर्ण करता येतील. कामानिमित्त दिवसभर बाहेर राहाल. उगाचच चीड-चीड करणे टाळावे. क्षुल्लक गोष्टी नजरेआड कराव्यात.
  9. धनू:-आवडते पुस्तक वाचायला मिळेल. जवळच्या प्रवासाचा योग येईल. बुद्धी आणि ज्ञान ह्यांचा सुयोग साधाल. चौकसपणे माहिती गोळा कराल. भावंडांची उत्तम साथ मिळेल.
  10. मकर:-जुन्या गोष्टी उगाळत बसू नका. काम आणि वेळ ह्यांचा समन्वय साधावा. रागावर नियंत्रण ठेवावे. धार्मिक गोष्टींकडे ओढ वाढेल. तीर्थयात्रेसाठी नाव नोंदवाल.
  11. कुंभ:-अघळपघळ बोलणे टाळा. जबाबदारीची जाणीव ठेवून वागावे. हस्तकलेचा प्रसार करता येईल. गुरूजनांचा आशीर्वाद मिळेल. थोर व्यक्तींचे मार्गदर्शन घ्याल.
  12. मीन:-मानसिक शांतता जपावी. कौटुंबिक सौख्यात वाढ होईल. मुलांच्या आनंदात रमून जाल. जवळचे नातेवाईक भेटतील. दिवसभर घेतलेल्या कष्टाचे चीज होईल.

  – ज्योतिषी विद्याधर करंदीकर