News Flash

आजचं राशीभविष्य, गुरूवार, २० मे २०२१

सर्व बारा राशींचे भविष्य

  1. मेष:- दिवस प्रसन्नतेत घालवाल. आवडीच्या गोष्टी करायला वेळ मिळेल. कुटुंबात तुमच्या शब्दाला वजन प्राप्त होईल. मनातील इच्छा पूर्ण होईल. जवळचे मित्र भेटतील.
  2. वृषभ:- कौटुंबिक सौख्य वाढीस लागेल. घरातील कामात मन रमून जाईल. बर्‍याच दिवसांनी नातेवाईकांची गाठ पडेल. कामातील बदल जाणून घ्यावेत. योग्य तांत्रिक माहिती मिळवावी.
  3. मिथुन:- मनातील नसत्या कल्पना काढून टाकाव्यात. क्षणिक आनंदाने हुरळून जाऊ नका. गप्पांचा ओघ आवरता घ्यावा. जवळचा प्रवास सुखाचा होईल. झोपेचे तक्रार जाणवेल.
  4. कर्क:- कौटुंबिक स्थैर्‍याचा विचार करावा. व्यापारी वर्गाला चांगला लाभ मिळेल. जुनी इच्छा पूर्ण कराल. भावनेच्या भरात वाहून जाऊ नका. तब्येतीची वेळेवर तपासणी करावी.
  5. सिंह:- इतरांवर तुमची उत्तम छाप पडेल. काही गोष्टीत तडजोडीला पर्याय नाही. केलेल्या कामाचे कौतुक होईल. वरिष्ठ तुमच्या कामावर खुश होतील. तरुण वर्गाशी मैत्री कराल.
  6. कन्या:- मानसिक चंचलतेवर मात करता येईल. अपचनाचा त्रास जाणवेल. कामे घाईघाईने उरकू नका. सहकार्‍यांकडून मदत घ्यावी लागेल. वरिष्ठांच्या मर्जीचे पालन करावे.
  7. तूळ:- चांगला व्यावसायिक लाभ होईल. दूरच्या प्रवासाचा योग संभवतो. मुलांकडे बारीक लक्ष ठेवावे. मेहनतीची कामे अंगावर येतील. काही कामना पुरेसा वेळ द्यावा.
  8. वृश्चिक:- जोडीदाराशी क्षुल्लक कारणामुळे मतभेद संभवतात. घाईघाईने निष्कर्ष काढू नका. कामात मन रमवावे. बुद्धीला अधिक चालना द्यावी लागेल. अपेक्षित व्यावसायिक लाभ होईल.
  9. धनू:- जवळचा प्रवास सावधानतेने करावा. वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे. परोपकाराची जाणीव ठेवून वागाल. इतरांना मनापासून मदत कराल. जोडीदाराविषयी गैरसमज संभवतात.
  10. मकर:- नातेवाईकांशी सलोख्याचे संबंध वाढवा. जुन्या गोष्टींवर फार चर्चा नको. विचारपूर्वक खर्च करावा. शेअर्स मधून लाभ होईल. अचानक धनलाभाची शक्यता.
  11. कुंभ:- आततायीपणे कोणतेही काम करू नका. स्वभावातील हट्टीपणा कमी करावा. प्रकृतीची वेळेवर काळजी घ्यावी. पत्नीशी वाद वाढवू नये. अती शिस्त कामाची नाही.
  12. मीन:- सारासार विचाराला प्राधान्य द्यावे. गैरसमजुतीतून वाद वाढू शकतो. लोकनींदेकडे दुर्लक्ष करावे. मानापमानाचे प्रसंग येऊ शकतात. काटकसरीने वागावे लागेल.

      – ज्योतिषी विद्याधर करंदीकर

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 20, 2021 1:00 am

Web Title: daily astrology horoscope thursday 20 may msr 87
Next Stories
1 आजचं राशीभविष्य, बुधवार, १९ मे २०२१
2 आजचं राशीभविष्य, मंगळवार, १८ मे २०२१
3 आजचं राशीभविष्य, सोमवार, १७ मे २०२१
Just Now!
X