News Flash

आजचं राशीभविष्य, गुरूवार, २५ फेब्रुवारी २०२१

सर्व बारा राशींचे भविष्य

 1. मेष – कौटुंबिक शांतता जपावी. आपली छाप पडण्यात यशस्वी व्हाल. मनमोकळ्या स्वभावाचे दर्शन घडवाल. कौटुंबिक कामात दिवस जाईल. मानसिक ताण जाणवेल.
 2. वृषभ:-जवळच्या प्रवासात सावधानता बाळगावी. मनातील नसती भीती दूर सारावी. मानसिक चांचल्य जाणवेल. नवीन गोष्टी आवडीने जाणून घ्याल. उगाचच त्रागा करू नका.
 3. मिथुन:-आवेगाला आवर घालावी लागेल. गृहोपयोगी वस्तु खरेदी कराल. व्यावसायिक कमाईकडे लक्ष द्यावे. आवाजात गोडवा ठेवावा. वैवाहिक सौख्याकडे लक्ष ठेवावे.
 4. कर्क:-मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष द्यावे लागेल. चटकन निराश होऊ नका. बौद्धिक चलाखी दाखवावी. वागण्या-बोलण्यात सज्जनपणा ठेवाल. भावनाशीलता वाढू शकते.
 5. सिंह:-वैचारिक स्थिरता ठेवावी. नैराश्याला दूर सारावे. प्रवासात सतर्कता बाळगावी. जोडीदाराची प्राप्ती वाढेल. तुमच्या संपर्कातील लोकात भर पडेल. सामाजिक प्रतिष्ठा लाभेल.
 6. कन्या:-मैत्रीचे संबंध जपावेत. स्त्री समूहात वावराल. सुखासक्तपणा जाणवेल. कामात काहीशी चालढकल कराल. पैज जिंकता येईल.
 7. तूळ:-प्रेमाच्या दृष्टीने मैत्री घट्ट होईल. चौकसपणा दाखवाल. व्यापारी वर्गाला चांगला लाभ मिळेल. कामात वारंवार बदल करू नका. आपला दर्जा टिकवण्याचा प्रयत्न कराल.
 8. वृश्चिक:-खर्च वाढू शकतो. आर्थिक व्यवहार सावधानतेने करावेत. घरातील कामात अडकून पडल्यासारखे वाटेल. शब्द जपून वापरावे लागतील. गुंतवणुकीत फसगत होण्याची शक्यता आहे.
 9. धनू:-श्रम व दगदग वाढेल. क्षुल्लक कारणांनी खिळून पडल्यासारखे वाटेल. डोकेदुखीचा त्रास जाणवू शकतो. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी. गैरसमजातून वाद वाढू देऊ नका.
 10. मकर:-जुन्या प्रकरणातून त्रास संभवतो. खर्चाचे योग्य नियोजन करावे लागेल. मानसिक स्वास्थ्य जपावे. स्त्री वर्गापासून दूर राहावे. कोर्ट कचेर्‍यांची कामे त्रासदायक ठरू शकतात.
 11. कुंभ:-गप्पांमध्ये वेळ घालवाल. मानापमानात अडकून पडू नका. मौल्यवान वस्तु खरेदी केल्या जातील. कष्टाला मागे पुढे पाहू नका. मित्र मंडळींशी सलोखा ठेवावा लागेल.
 12. मीन:-आपली प्रतिष्ठा जपावी. विरोधकांच्या कारवाया वाढू शकतात. काही अनपेक्षित बदल दिसून येतील. सहकार्‍यांशी जुळवून घ्यावे लागेल. कामाचे योग्य नियोजन करावे लागेल.

 – ज्योतिषी विद्याधर करंदीकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 25, 2021 12:19 am

Web Title: daily astrology horoscope thursday 25 february 2021 msr 87
Next Stories
1 आजचं राशीभविष्य, बुधवार, २४ फेब्रुवारी २०२१
2 आजचं राशीभविष्य, मंगळवार, २३ फेब्रुवारी २०२१
3 आजचं राशीभविष्य, सोमवार, २२ फेब्रुवारी २०२१
Just Now!
X