02 March 2021

News Flash

आजचं राशीभविष्य, गुरुवार, २८ जानेवारी २०२१

सर्व बारा राशींचे भविष्य

 1. मेष : घरात कर्तेपणाचा मान मिळवाल. मानसिक शांतता जपावी. वरिष्ठांना नाराज करू नका. गप्पा मारण्यात दिवस घालवाल. लहानांशी मैत्री-पूर्ण वागणूक ठेवाल.
 2. वृषभ : जोडीदाराशी मतभेद संभवतात. मनातील गैरसमज दूर सारावेत. मुलांच्या समस्या जाणून घ्याव्यात. कंजूषपणा करू नका. उगाच चिडचिडपणा करू नये.
 3. मिथुन : वाद वाढणार नाहीत ह्याची काळजी घ्यावी. भागीदाराची बाजू समजून घ्या. शक्यतो मतभेद दर्शवू नका. वैवाहिक सौख्य जपावे. ऐहिक गोष्टींपासून दूर व्हावे.
 4. कर्क : मोहाळा बळी पडू नका. मानसिक स्वास्थ्याला महत्व द्यावे. भावंडांची चिंता लागून राहील. गुरूजनांचा आशीर्वाद घ्यावा. कामाच्या ठिकाणी सतर्क राहावे.
 5. सिंह : खिलाडू वृत्तीत वाढ होईल. आरोग्यात सुधारणा होईल. शेअर्समध्ये गुंतवणूक कराल. अतिकाळजी करू नका. व्यावसायिक लाभावर लक्ष ठेवावे.
 6. कन्या : कौटुंबिक समस्या जाणवतील. नातेवाईकांची मदत मिळेल. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. प्रेम सौख्यात भर पडेल. मैत्रीचे संबंध दृढ होतील.
 7. तुळ : वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे. किरकोळ जखमांकडे दुर्लक्ष करू नका. घरातील वातावरणात बारकाईने लक्ष घाला. वाचनाची आवड जोपासाल. आशावादी दृष्टिकोन ठेवावा.
 8. वृश्चिक : कौटुंबिक खर्च वाढू शकतो. व्यापारी वर्गाला चांगला लाभ होईल. आवक-जावक यांचे योग्य नियोजन करावे. सांपत्तिक स्थितीकडे लक्ष ठेवा. रागावर नियंत्रण ठेवावे.
 9. धनु : उतावीळपणा करू नये. जोमाने कामे हाती घ्याल. आपल्याच मतावर ठाम राहाल. अडथळ्यातून मार्ग काढता येईल. महत्वाकांक्षा वाढीस लागेल.
 10. मकर : कामे विनाकारण अडकून पडल्यासारखी वाटतील. आध्यात्मिक ओढ वाढेल. सामाजिक बांधीलकीची जाण ठेवावी. सामुदायाईक वादाकडे दुर्लक्ष करावे. जोडीदाराचा प्रेमळ सहवास लाभेल.
 11. कुंभ : मैत्रीत मतभेद आड आणू नका. दिवसभर खटपट करावी लागेल. काही गोष्टी जुळवून घेण्याचा प्रयत्न करावा. थोरांचा सल्ला घ्यावा लागेल. कामातून समाधान शोधाल.
 12. मीन : कामातील तांत्रिक बाजू जाणून घ्याल. काही बदल अचानक घडून येऊ शकतात. फसवणुकीपासून सावध राहावे. अधिकारी व्यक्तींच्यात वावराल. करमणुकीचे कार्यक्रम पाहण्याचे बेत आखाल.— ज्योतिषी विद्याधर करंदीकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 28, 2021 12:35 am

Web Title: daily astrology horoscope thursday 28 january 2021 aau 85
टॅग : Astrology
Next Stories
1 आजचं राशीभविष्य, बुधवार, २७ जानेवारी २०२१
2 आजचं राशीभविष्य, मंगळवार, २६ जानेवारी २०२१
3 आजचं राशीभविष्य, सोमवार, २५ जानेवारी २०२१
Just Now!
X