28 January 2021

News Flash

आजचं राशीभविष्य, गुरुवार, ३१ डिसेंबर २०२०

सर्व बारा राशींचे भविष्य

 1. मेष : घरी पाहुणे येण्याची शक्यता. शोभेच्या, मौल्यवान वस्तूंची खरेदी कराल. आपले निर्णय योग्य ठरतील. सकारात्मक विचारांमुळे अनपेक्षित चांगल्या गोष्टी घडतील. कामाच्या विस्ताराचा सतत ध्यास घ्याल.
 2. वृषभ : आपल्याला महत्वाची कागदपत्रे मिळतील. आपल्या निर्णयांवर ठाम राहा. छोटे प्रवास करावे लागतील. दैनंदिन जीवनात बदल करण्यासाठी आपण उत्सुक असाल. नावीण्यपूर्ण कलाकृती मन मोहून घेतील.
 3. मिथुन : आर्थिक उलाढालींच्या दृष्टीने आजचा दिवस अनुकूल. शोभेच्या मौल्यवान वस्तूंची खरेदी कराल. सामाजिक कार्यात आपल्या बोलण्याचा प्रभाव पडेल. आर्थिक परिस्थिती सुधारेल. शेअर बाजारातील गुंतवणूक आर्थिक फायदा करुन देईल.
 4. कर्क : मानसिक स्वास्थ सुधारेल. महत्वाची कामे मार्गी लागतील. आपले निर्णय योग्य ठरतील. तीव्र इच्छाशक्ती व प्रगल्भ विचारसरणी यांतून आपल्या अडचणींवर सहजपणे मात कराल.
 5. सिंह : भावंडांच्या परदेशगमन योगासाठी आजचा दिवस अनुकूल. नोकरी-व्यवसायाव्यतिरिक्त आर्थिक आवक होण्याच्या दिवस कौटुंबिक कलह टाळावेत. जुन्या मित्रमंडळींचा सहवास लाभेल. एखाद्या सेवाभावी संस्थेतून किंवा सहकारी संस्थातून काम करता येईल.
 6. कन्या : आज नोकरीच्या ठिकाणी आपल्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडेल. आपल्याला महत्व प्राप्त होईल. जबाबदारीची कामे आपल्यावर सोपवली जातील. अनपेक्षित धनप्राप्तीचे योग. सासूरवाडीकडून आर्थिक लाभ घडून येतील. कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नका.
 7. तूळ : ठरविलेली कामे यशस्वीरीत्या पूर्ण होतील. आपली कौटुंबिक कर्तव्ये पार पाडाल. आज आपण आकर्षक खरेदी कराल. समोरच्या व्यक्तीची बाजू ऐकूण घेवूनच त्यावर आपले मत व्यक्त करा. विवाहेच्छूक तरुणांचे विवाह ठरतील.
 8. वृश्चिक : खरेदीसाठी अनुकूल दिवस. आज आपल्या जोडीदाराबरोबर सहलीचे बेत आखाल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीच्या दृष्टीने अनुकूल दिवस. व्यवसायात जवळच्या नातेवाईकांना सहभागी करून घेणे शक्य असेल तर जरूर करा. नव्या कामाचा प्रस्ताव येईल.
 9. धनु : संतसज्जनांचा आज आपल्याला सहवास लाभेल. आजचा दिवस आपल्यासाठी व्यवासायिक कार्यक्षेत्र वाढण्याच्यादृष्टीने अनुकूल. आज आपल्या आप्तस्वकियांशी गाठीभेटी होतील. महिलांची विवाहकार्यातील मध्यस्थी योग्य व निर्णायक ठरेल. संततीसंबंधी चिंता दूर होतील.
 10. मकर : वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने आजचा दिवस अनुकूल. तरुणांना आपला जोडीदार निवडता येईल. मामा-मावशीच्या गाठी भेटी घडतील. महिला स्वतःच्या पद्धतीने गृहसजावट करतील. महिलांना बदलाची नितांत गरज भासेल.
 11. कुंभ : विरोधकांशी मत्तभेद टाळावेत. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. संसर्गजन्य विकार उद्भवण्याची शक्यता. पत्रव्यवहार करताना सावधगिरी बाळगा. घरात वैचारिक मतभेद होण्याची शक्यता. त्यामळे मनावर तणाव राहील.
 12. मीन : शैक्षणिक प्रगतीच्या दृष्टीने आजचा दिवस अनुकूल. नोकरीसाठी मुलाखतीला आज आपण जाणार असाल, तर नक्की यशस्वी व्हाल. संतसज्जनांचा सहवास लाभेल. योग्य व्यक्तीच्या मार्गदर्शनाचा लाभ होईल. गृहसुशोभिकरणासाठी शोभेच्या वस्तूंची खरेदी कराल.

  — ज्योतिषी विद्याधर करंदीकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 31, 2020 9:34 am

Web Title: daily astrology horoscope thursday 31 december 2020 aau 85
टॅग Astrology
Next Stories
1 आजचे राशीभविष्य, बुधवार, ३० डिसेंबर २०२०
2 आजचं राशीभविष्य, मंगळवार, २९ डिसेंबर २०२०
3 आजचं राशीभविष्य, सोमवार, २८ डिसेंबर २०२०
Just Now!
X