28 January 2021

News Flash

आजचं राशीभविष्य, मंगळवार, ०५ जानेवारी २०२१

सर्व बारा राशींचे भविष्य

 1. मेष : शक्यतो कोणत्याही दडपणात राहू नका. शेजारी, भावंडे यांच्याशी सबुरीने वागावे. तुमच्या मित्रपरिवारात वाढ होईल. बेसावधपणे कोणतेही काम करू नका. महिलांच्या शब्दाला मान मिळेल.
 2. वृषभ : जुन्या दुखण्यांकडे दुर्लक्ष करू नका. शक्यतो कामातील चुका टाळाव्यात. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी. क्षुल्लक कारणांवरून होणारे मतभेद टाळा. अनुभवाची शिदोरी गोळा करता येईल.
 3. मिथुन : वैवाहिक जीवनातील कुरबुरी टाळाव्यात. अल्लडपणा करून चालणार नाही. एकाचवेळी अनेक कामात लक्ष घालू नका. वडीलधार्‍यांचा शब्द प्रमाण मानवा लागेल. आशावादी दृष्टिकोन ठेवावा.
 4. कर्क : प्रवासादरम्यान सावधानता बाळगावी. मुलांविषयी चिंता लागून राहील. परिस्थिती धोरणीपणाने हाताळाल. उगाचच कोणत्याही गोष्टीचा बाऊ करू नका. ज्येष्ठांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी.
 5. सिंह : वरिष्ठ आपल्या कामावर खूष असतील. स्थावर संबंधीच्या कामात यश येईल. वाणीवर नियंत्रण ठेवावे लागेल. काही गोष्टी मनाविरूद्ध घडू शकतात. आशावादी दृष्टिकोन ठेवावा.
 6. कन्या : नियमांचे काटेकोर पालन करावे. वडीलधार्‍यांचे मत विचारात घ्यावे. कामगारांविषयीचे प्रश्न सामोपचाराने हाताळावेत. वाहनांवरील वेग नियंत्रित ठेवावा. दिवस मनाप्रमाणे व्यतीत कराल.
 7. तूळ : कामाचे योग्य व्यवस्थापन करावे. पत्रव्यवहारात अडचणी येवू शकतात. तुमच्यातील बिनधास्तपणा सकारात्मकतेने वापरावा. मित्रमंडळींचे सहाय्य लाभेल. घरातील कुरबुरी दूर कराव्यात.
 8. वृश्चिक : कोणत्याही चुकीच्या मार्गाचा अवलंब करू नका. इस्टेटीसंबंधीचे वाद वाढू शकतात. विद्यार्थ्यानी चिकाटी सोडू नये. ध्यानधारणा, ओंकार यांची मदत घ्यावी. आर्थिक परिस्थितीवर मात करता येईल.
 9. धनू : भागीदारीतील ताणतणाव दूर करावेत. वडीलधार्‍यांचे आशीर्वाद मिळतील. उधारीची कामे सावधगिरीने करावीत. तीर्थाटनाचा योग येईल. कामानिमित्त प्रवास कराल.
 10. मकर : घेतलेल्या कष्टाचे चीज होईल. काही कामात दिरंगाई होण्याची शक्यता आहे. अतिश्रमामुळे थकवा जाणवेल. वरिष्ठांची मर्जी राहील. प्रवासात समानाची काळजी घ्यावी.
 11. कुंभ : मुलांच्या तब्बेतीची कुरबुर राहील. या ना त्या कारणाने खर्च होईल. बदलीची चिन्हे दिसतील. स्थावर दृष्टीने अनुकूल फळे मिळतील. प्राणायाम, ध्यानधारणेने मनाला काबूत ठेवा.
 12. मीन : प्रलोभनापासून दूर राहावे. अध्यापन क्षेत्रात प्रगती साधता येईल. चोरांपासून सावध राहावे. प्रवासात वाहनांवरील वेग मर्यादित ठेवावा. अति धाडस करू नका.— ज्योतिषी विद्याधर करंदीकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 5, 2021 1:00 am

Web Title: daily astrology horoscope tuesday 05 january 2021 aau 85
टॅग Astrology
Next Stories
1 आजचं राशीभविष्य, सोमवार, ०४ जानेवारी २०२१
2 आजचं राशीभविष्य, रविवार, ०३ जानेवारी २०२१
3 आजचे राशीभविष्य, शनिवार, ०२ जानेवारी २०२१
Just Now!
X