News Flash

आजचं राशीभविष्य, मंगळवार, १३ एप्रिल २०२१

सर्व बारा राशींचे भविष्य

 1. मेष:- मानसिक ताण नियंत्रित ठेवावा. फार दगदग करू नका. सर्वांना गोडीने आपलेसे कराल. तुमच्या व्यक्तिमत्वाची छाप पडेल. लबाड लोकांपासून सावध राहावे.
 2. वृषभ:- मानसिक चंचलतेवर मात करावी लागेल. खर्चाला आळा घालावा लागेल. मनातील अनामिक भीती काढून टाकावी. चांगला व्यावसायिक लाभ संभवतो.
 3. मिथुन:- व्यापारी वर्गाला चांगला लाभ होईल. कामात चांगली ऊर्जितावस्था येईल. चांगल्या कमाईसाठी नवीन धोरण ठरवावे. मित्रांची मदत घेता येईल. कामात प्रगतीला वाव आहे.
 4. कर्क:- कामाच्या स्वरुपात वारंवार बदल करू नका. चित्त एकाग्र करावे लागेल. घरगुती वस्तूंची खरेदी कराल. चारचौघात तुमच्या प्रगतीचे कौतुक केले जाईल. महत्वाकांक्षी दृष्टिकोन ठेवावा.
 5. सिंह:- धार्मिक सेवेत सहभाग नोंदवाल. दूरच्या प्रवासाचा योग येईल. चांगल्या कामात सेवेला प्राधान्य द्याल. आदर्श वागणुकीतून कौतुकास पात्र व्हाल. तुमचा सामाजिक दर्जा सुधारेल.
 6. कन्या:- काही गोष्टी अकस्मात घडून येतील. चुकीच्या मार्गांपासून दूर राहावे. एककल्ली विचार करू नका. भागीदाराचे मत विचारात घ्यावे. मनातील संभ्रम बाजूस सारावेत.
 7. तूळ:- भागीदारीच्या व्यवसायात चांगला लाभ होईल. नवीन धोरण आजमावता येतील. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. योग्य नियोजनावर भर द्यावा. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल.
 8. वृश्चिक:- आरोग्यात सुधारणा दिसून येईल. क्षुल्लक गोष्टींचा त्रास करून घेऊ नका. मानसिक स्वास्थ्य महत्त्वाचे आहे. प्रतिकूलतेतून मार्ग निघेल. आत्मविश्वास बाळगावा.
 9. धनू:- अभ्यासू दृष्टिकोन बाळगावा. स्व‍च्छंदीपणे विचार मांडाल. जुगाराची आवड पूर्ण कराल. मनाची संवेदनशीलता दर्शवाल. परिस्थितीची चांगली बाजू विचारात घ्याल.
 10. मकर:- विचारांची दिशा बदलून पहावी. भावंडांची काळजी लागून राहील. घरगुती वातावरण प्रसन्न राहील. जवळचे नातेवाईक भेटतील. कौटुंबिक गोष्टीत प्रभुत्व दाखवाल.
 11. कुंभ:- बोलताना सारासार विचार करावा. हातातील अधिकाराचा योग्य वेळी वापर करता येईल. कामात प्रगतीला चांगला वाव आहे. नवीन कामात जोमाने उत्साह दाखवाल. जवळचा प्रवास घडेल.
 12. मीन:- घरगुती कामाचा ताण जाणवेल. विचारणा योग्य दिशा द्यावी. बौद्धिक ताण घेऊ नये. नवीन गोष्टीं मध्ये मन रमवावे. घरगुती जबाबदारी उत्तमरित्या पार पाडाल.

    – ज्योतिषी विद्याधर करंदीकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 13, 2021 1:00 am

Web Title: daily astrology horoscope tuesday 13 april 2021 msr 87
Next Stories
1 आजचं राशीभविष्य, सोमवार, १२ एप्रिल २०२१
2 आजचं राशीभविष्य, रविवार, ११ एप्रिल २०२१
3 आजचं राशीभविष्य, शनिवार, १० एप्रिल २०२१
Just Now!
X