1. मेष:- तुमचा आवेग योग्य ठिकाणीच दाखवा. काही ठिकाणी नरमाईचे धोरण ठेवणे योग्य ठरेल. मैत्रीतील कटुता टाळण्याचा प्रयत्न करावा. अनोळखी लोकांवर चटकन विश्वास ठेवू नका. कौटुंबिक कामे आनंदाने कराल.
  2. वृषभ:- घरगुती कामे वाढतील. स्थावरचे प्रश्न मार्गी लावावे लागतील. खळाळता उत्साह मावळू देऊ नका. अती कामामुळे थकवा जाणवेल. कामानिमित्त जवळचा प्रवास करावा लागेल.
  3. मिथुन:- वैचारिक गोंधळ टाळण्याचा प्रयत्न करावा. मनात अनेक शंका उत्पन्न होऊ शकतात. सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा. कौटुंबिक जिव्हाळा वाढीस लागेल. बोलतांना विचारपूर्वक बोलावे.
  4. कर्क:- स्वभावात काहीसा हट्टीपणा येईल. प्रकृतीची वेळीच काळजी घ्यावी. बाहेरील अन्नपदार्थ खाऊ नयेत. अनावश्यक गोष्टींवर खर्च केला जाईल. मनातील अपेक्षांना मूर्त स्वरूप द्याल.
  5. सिंह:- नवीन लोकांशी मैत्री वाढेल. तरुण वर्गाच्या जास्त संपर्कात याल. आधुनिक विचारांची देवाणघेवाण होईल. मानसिक चांचल्य जाणवेल. फार विचार करण्यात वेळ वाया घालवू नका.
  6. कन्या:- पोटाची काहीशी तक्रार राहील. आहाराची योग्य ती पथ्ये पाळावी लागतील. नियोजनबद्ध कामे सुरळीत पार पडतील. प्रवास सावधानतेने करावा. मन लावून काम करणे गरजेचे राहील.
  7. तूळ:- जोडीदाराची मते जाणून घ्या. वडिलोपार्जित कामे लाभदायक ठरतील. बाहेर गावी जाण्याचे बेत आखाल. कायद्याच्या चौकटीत राहून कामे करावीत. मनातील क्षुल्लक गैरसमज दूर करावेत.
  8. वृश्चिक:- जोडीदाराची प्राप्ती वाढेल. स्थावरची कामे अचानक सामोरी येऊ शकतात. पूर्व नियोजित कामात यश येईल. वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे. नको तिथे आपले मत मांडू नका.
  9. धनू:- तुमच्या कर्तृत्वात वाढ होईल. कोणतेही काम करतांना सर्व खात्री करून घ्यावी. खेळाडूंनी अधिक कसरत करावी. महत्वाकांक्षेच्या जोरावर धाडस करतांना सावधानता बाळगा. अचानक धनलाभ संभवतो.
  10. मकर:- मुलांकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. कोणत्याही प्रलोभनाला भुलून जाऊ नका. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. अनावश्यक खर्च केला जाईल. जोडीदाराचा प्रेमळ सहवास लाभेल.
  11. कुंभ:- घरातील ज्येष्ठ मंडळींची काळजी घ्यावी. प्रवासात सामानाची काळजी घ्यावी. फसवणुकीपासून सावध राहावे. कसलीही घाई त्रासदायक ठरू शकते. क्षुल्लक गोष्टी नजरेआड कराव्यात.
  12. मीन:- वादाचे प्रसंग टाळलेलेच बरे. कलात्मक दृष्टीकोन ठेवून वागाल. गप्पा मारण्याची हौस पूर्ण कराल. इतरांचा तुमच्या विषयी गैरसमज होऊ शकतो. व्यावसायिक लाभावर लक्ष केंद्रित करा.

      – ज्योतिषी विद्याधर करंदीकर