1. मेष : मानसिक चंचलता जाणवेल. लहानांशी मैत्री कराल. जवळचा मित्र परिवार गोळा कराल. अभ्यासू लोकांच्यात वावराल. जुन्या कामातून धनलाभ संभवतो.
  2. वृषभ : तुमच्यातील हरहुन्नरीपणा दिसून येईल. योग्य ठिकाणी कल्पकता दाखवावी. कमिशनमधून मिळणार्‍या लाभाकडे लक्ष राहील. व्यवसायाचे सखोल ज्ञान घ्यावे. व्यवहारचातुर्य ठेवावे लागेल.
  3. मिथुन : गोड बोलण्याचा फायदा होईल. अंगीभूत कलेचे मूल्यमापन केले जाईल. लिखाणास प्रसिद्धी मिळेल. प्रवासाची आवड पूर्ण होईल. शिस्तप्रियता दाखवाल.
  4. कर्क : कफ विकाराचा त्रास जाणवू शकतो. स्मरणशक्तीला ताण द्यावा. दिवसभर विचारात गर्क राहाल. तुमच्या अनुमानास निश्चिती येईल. इतरांना स्वेच्छेने मदत कराल.
  5. सिंह : व्यावहारिक कुशलता दाखवावी लागेल. व्यापारात चांगला फायदा होईल. जोडीदाराशी गप्पा गोष्टी कराल. दुचाकी वाहन चालवताना सतर्कता बाळगावी. कामातून समाधान शोधाल.
  6. कन्या : इतरांचा विश्वास संपादन करावा. जुन्या गोष्टी उकरून काढू नका. मनातील चुकीचे विचार बाजूस सारावेत. नसत्या भांडणात पडू नका. त्वचा विकार जाणवू शकतात.
  7. तूळ : कलात्मक दृष्टीकोन ठेवाल. प्रत्येक गोष्टींत आनंद शोधाल. नवीन गोष्टी जाणून घेण्याची इच्छा दर्शवाल. जरूर नसतांना उदारपणे वागू नका. डोळ्यांचे त्रास संभवतात.
  8. वृश्चिक : गोड बोलून कार्यभाग साधता येईल. जवळचे नातेवाईक भेटतील. मित्र-परिवाराबरोबर गप्पांमध्ये रमाल. उष्णतेचा त्रास संभवतो. महत्वाकांक्षा वाढीस लागेल.
  9. धनू : काही गोष्टींचे चिंतन करावे. योग्य तर्क वापरावा लागेल. वक्तृत्वाची संधी चालून येईल. पारंपरिक कामातून लाभ संभवतो. बुद्धिमत्तेची चुणूक दाखवाल.
  10. मकर : आर्थिक उन्नतीचा विचार कराल. व्यवहारी बुद्धिमत्तेने वागणे ठेवाल. हसत खेळत कामे कराल. काही कामे अकारण रेंगाळतील. घेतलेल्या ज्ञानाचा सदुपयोग कराल.
  11. कुंभ : स्मरणशक्तीला चालना दिली जाईल. काही ठिकाणी धूर्तपणा वापरावा लागेल. सगळीकडे बारीक नजर ठेवाल. तत्परतेने कामे कराल. आवडीचे पदार्थ खायला मिळतील.
  12. मीन : कर्ज प्रकरणे तूर्तास दूर ठेवावीत. थोरांचा सल्ला घ्यावा. वरिष्ठांची मर्जी राखावी. व्यावसायिक ज्ञान गोळा कराल. दिवसभर चंचलता जाणवेल.— ज्योतिषी विद्याधर करंदीकर