1. मेष – घरातील वातावरण प्रसन्न असेल. लोक तुमच्या व्यक्तिमत्वाकडे आकर्षित होतील. दिवस मजेत जाईल. तरुण वर्गाला नवीन संधी मिळेल. घरात टापटीप ठेवाल.
  2. वृषभ – जवळचा प्रवास मजेत पार पडेल. मनातील चुकीचे विचार बाजूला सारावेत. भावंडांचे सहकार्य मिळेल. मोठ्या लोकांच्यात वावराल. आवडत्या कामासाठी वेळ मिळेल.
  3. मिथुन – आवडीचे पदार्थ खायला मिळतील. कौटुंबिक सौख्य वाढीस लागेल. घरातील कामात मन रमेल. मौल्यवान वस्तू खरेदी केल्या जातील. जोडीदाराचे वर्चस्व राहील.
  4. कर्क – मनमोकळे वागाल. आवडत्या गोष्टींमध्ये वेळ घालवाल. जोडीदाराची बाजू समजून घ्यावी. स्व‍च्छंदीपणे वागण्यावर भर द्याल. सर्वांशी मिळून-मिसळून वागाल.
  5. सिंह – मानसिक चंचलता जाणवेल. भावनेच्या भरात वाहून जाऊ नका. नामस्मरण करण्यात वेळ व्यतीत करावा. अंगीभूत कलेचे योग्य कौतुक केले जाईल. जोडीदाराच्या शांत स्वभावाची प्रचिती येईल.
  6. कन्या – उत्तम व्यावसायिक लाभ संभवतो. मुलांच्या आनंदाने खुश व्हाल. उत्तम वाहन सौख्य लाभेल. स्थावरची कामे मार्गी लागतील. आरोग्यात सुधारणा होईल.
  7. तूळ – प्रतिकूलतेतून मार्ग काढावा. भावंडांचा विरोध होऊ शकतो. काही गोष्टींपासून जाणीवपूर्वक दूर राहावे. प्रलोभनाला बळी पडू नका. भागिदारीतून चांगली कमाई करता येईल.
  8. वृश्चिक – घशाचे विकार जाणवू शकतात. वस्तूंची उपयुक्तता लक्षात घेऊन खरेदी करावी. काही कामात अधिक श्रम घ्यावे लागतील. कामात उतावीळपणा करून चालणार नाही. गोड बोलण्यावर भर द्यावा.
  9. धनू – स्वभावात काहीसा हेकटपणा येईल. स्वातंत्रप्रियता दर्शवाल. पारंपरिक कामात लक्ष घालावे लागेल. हातात नवीन अधिकार येतील. भावंडांचा सहवास लाभेल.
  10. मकर – चिकाटीने कामे कराल. जबाबदारीने वागणे ठेवाल. घराची साफसफाई काढाल. जोडीदाराचा प्रेमळ सहवास लाभेल. कमिशन मधून चांगली कमाई होईल.
  11. कुंभ – स्थावरच्या कामात यश येईल. हाताखालील लोकांचे उत्तम सहकार्य मिळेल. कामात समाधानी राहाल. जवळचे नातेवाईक भेटतील. परिस्थितीशी जुळवून घ्याल.
  12. मीन – झोपेची तक्रार कमी होईल. सर्वांना प्रेमाने आपलेसे कराल. सट्टा, जुगार यातून चांगली कमाई होईल. छंद जोपासायला वेळ काढाल. अपवाद नजरेआड करावेत.

 – ज्योतिषी विद्याधर करंदीकर