28 January 2021

News Flash

आजचे राशीभविष्य, बुधवार, १३ जानेवारी २०२१

सर्व बारा राशींचे भविष्य

  1. मेष : जलद गतीने कामं कराल. सतत आपले अस्तित्व दाखवाल. सरकारी कामात यश येईल. मनातील इच्छा पूर्ण होईल. तुमची समाजप्रियता वाढेल.
  2. वृषभ : तुमचे अंगीभूत गुण दिसून येतील. चांगल्या बोलण्याने व्यावसायिक मान मिळवाल. सजावटीच्या वस्तू खरेदी कराल. चैनीच्या वस्तू गोळा कराल. लिखाणाला प्रसिद्धी मिळेल.
  3. मिथुन : मनाची विशालता दाखवाल. वाचनाची आवड पूर्ण कराल. कलेला पोषक वातावरण मिळेल. सहृदयतेने वागाल. अचानक धनलाभ संभवतो.
  4. कर्क : जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. मुलांच्या प्रशिक्षणाकडे लक्ष द्यावे. खर्चाच्या बाबतीत अविचाराने निर्णय घेऊ नका. रेस, सट्टा यांची आवड पूर्ण कराल. कामातील विलंब टाळावा.
  5. सिंह : वैवाहिक सौख्यात भर पडेल. घरातील शांतता महत्त्वाची आहे. स्थावरची कामे पूर्णत्त्वाला जातील. कामाचे समाधान लाभेल. भावंडांची काळजी लागून राहील.
  6. कन्या : कर्तुत्वाला चांगला वाव मिळेल. आपल्याच मतावर आग्रही राहाल. नातेवाईकांची मदत घेता येईल. भावनेतून मनाचे शुद्ध रूप दर्शवावे. खाण्या-पिण्याच्या सवयी लक्षात घ्याव्यात.
  7. तूळ : सर्जनशीलतेने वागाल. आत्मिक समाधान मिळवण्याचा प्रयत्न कराल. कलेला पोषक वातावरण मिळेल. मित्रपरिवार जमवाल. गप्पा-गोष्टी करण्यात वेळ घालवाल.
  8. वृश्चिक : घरासाठी सजावटीच्या वस्तू खरेदी कराल. आपल्या प्रांजल स्वभावाची चुणूक दाखवाल. बागकामाची हौस भागवाल. महिलांना उत्तम गृहिणी पदाचा मान मिळेल. घरात समाधान निर्माण कराल.
  9. धनू : आनंदीवृत्तीने वागाल. वाचनाची आवड पूर्ण करता येईल. इतरांचे भरभरून कौतुक कराल. आध्यात्मिक बळ वाढेल. यशाची वाट मोकळी होईल.
  10. मकर : बोलण्याने इतरांवर चांगली छाप पाडाल. क्षुल्लक कमतरता भरून निघेल. गायन कलेला उठाव मिळेल. मौल्यवान वस्तू खरेदी कराल. आवडते खाद्य पदार्थ खाल.
  11. कुंभ : तुमचे व्यक्तिमत्व खुलून येईल. सर्वांशी मधुर वाणीने बोलाल. नवीन गोष्टींकडे ओढ वाढेल. प्रत्येक गोष्टीचा मनापासून आनंद घ्याल. उत्तम मैत्री लाभेल.
  12. मीन : यशाची नवीन पायरी गाठता येईल. मोठ्या लोकांच्या ओळखीतून कामे करावीत. गप्पिष्ट लोकांच्यात वावराल. मुलांकडून आनंद वार्ता मिळतील. मनातील इच्छा पूर्ण होईल.

    — ज्योतिषी विद्याधर करंदीकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 13, 2021 1:00 am

Web Title: daily astrology horoscope wednesday 13 january 2021 aau 85
टॅग Astrology
Next Stories
1 आजचं राशीभविष्य, मंगळवार, १२ जानेवारी २०२१
2 आजचं राशीभविष्य, सोमवार, ११ जानेवारी २०२१
3 आजचं राशीभविष्य, रविवार, १० जानेवारी २०२१
Just Now!
X