26 February 2021

News Flash

आजचं राशीभविष्य, बुधवार, १७ फेब्रुवारी २०२१

सर्व बारा राशींचे भविष्य

  1. मेष:-हौस पूर्ण करून घ्याल. आकर्षणाला बळी पडाल. चारचौघात मिळून मिसळून वागाल. आवडीचे कपडे खरेदी कराल. सर्वांशी गोडीने वागाल.
  2. वृषभ:-काही गोष्टी लपविण्याकडे कल राहील. मनातील विचित्र कल्पना काढून टाकाव्यात. वैवाहिक सौख्य वाढीस लागेल. मानसिक चांचल्या जाणवेल. पत्नीचे लाडिक हट्ट पुरवावे लागतील.
  3. मिथुन:-रागावर नियंत्रण ठेवावे. स्वभाव विरोध दर्शवू नका. वाहन चालवताना काळजी घ्यावी. लहान-सहान गोष्टींनी निराश होऊ नका.
  4. कर्क:-दिवसभर कामात व्यग्र राहाल. पित्त विकार बळावू शकतात. भांडकुदळ व्यक्तींपासून दूर राहावे. कामे वेळेत पूर्ण करता येतील. उष्णतेचे त्रास संभवतात.
  5. सिंह:-जोडीदाराची प्राप्ती वाढेल. मैदानी खेळ खेळता येतील. चपळाईने कामे हाती घ्याल. आपल्यातील कौशल्य दाखवून द्यावे. अविचाराने पैसे गुंतवू नका.
  6. कन्या:-वाहन चालवताना सावधगिरी बाळगावी. घरातील कुरबुरी मध्ये लक्ष घाला. स्थावरच्या कामाला गती येईल. दिवसभर कार्यरत राहाल. जमिनीच्या कामातून लाभ संभवतो.
  7. तूळ:-परिस्थितीचा योगी आढावा घ्यावा. कानाच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करू नये. टीकेकडे दुर्लक्ष करावे लागेल. प्रतिकूलतेतून मार्ग काढता येईल. खंबीरपणे निर्णय घ्यावेत.
  8. वृश्चिक:-बोलण्याच्या भरात जबाबदारी घ्याल. खाण्यापिण्याची पथ्ये पाळावीत. लहरीपणे वागू नये. गरज असेल तेंव्हाच उदारपणे वागा. वाद विवादात भाग घेणे टाळा.
  9. धनू:-लहानसहान दुखण्याकडे दुर्लक्ष करू नये. आपलाच हेका पूर्ण करण्यावर भर द्याल. अडथळ्यातून मार्ग काढता येईल. उष्णतेचे विकार संभवतात. ध्येयवादी दृष्टिकोन बाळगाल.
  10. मकर:-सामुदायिक वादापासून दूर राहावे. धार्मिक स्थळांना भेट द्याल. ध्यान धारणे साठी वेळ काढा. सामाजिक बांधीलकी जपावी . शांततेचा मार्ग स्वीकारावा.
  11. कुंभ:-वेळेचे बंधन पळावे लागेल. श्रम वाढण्याची शक्यता आहे. गप्पांमधून नवीन माहिती मिळवाल. मित्रांशी वाद घालणे टाळा. खर्चाचे योग्य नियोजन करावे लागेल.
  12. मीन:-कौटुंबिक सौख्यात भर पडेल. आवडीच्या गोष्टींसाठी वेळ काढाल. कामातील बदलांकडे दूर दृष्टीने पहावे. घरगुती कामात वेळ जाईल. सर्वांशी गोडीने वागाल.

     — ज्योतिषी विद्याधर करंदीकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 17, 2021 12:20 am

Web Title: daily astrology horoscope wednesday 17 february 2021 msr 87
Next Stories
1 आजचं राशीभविष्य, मंगळवार, १६ फेब्रुवारी २०२१
2 आजचं राशीभविष्य, सोमवार, १५ फेब्रुवारी २०२१
3 आजचं राशीभविष्य, रविवार, १४ फेब्रुवारी २०२१
Just Now!
X