05 August 2020

News Flash

आजचे राशीभविष्य, शुक्रवार, १ नोव्हेंबर २०१९

सर्व बारा राशींचे भविष्य

 • मेष:-
  जोडीदाराचा वरचष्मा राहील. अचानक धनलाभाची शक्यता. गैरसमजुतीला बळी पडू नका. पोटाच्या तक्रारी जाणवतील. प्रवासाचा योग येईल.
 • वृषभ:-
  मैत्रीचे संबंध अधिक घट्ट होतील. प्रेमसौख्यात वाढ होईल. भागीदारीतून चांगला नफा होईल. जोडदाराचा समंजसपणा ​दिसून येईल. तब्येतीची तक्रार मिटेल.
 • मिथुन:-
  उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. वेगळा दृष्टीकोन ठेवून पहावा. जवळचे नातेवाईक आणि मित्र भेटतील. कामानिमित्त बाहेर गावी जावे लागेल. उगाचच काळजी करत बसू नये.
 • कर्क:-
  तुमच्याकडील ज्ञानाचा सदुपयोग होईल. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. विविध विषयांत रुची दाखवाल. मुलांशी मतभेद राहतील. प्रेम संबंध सुधारतील.
 • सिंह:-
  महत्त्वाची घरगुती कामे उरकाल. आरोग्यात सुधारणा होईल. तुमचा दर्जा वाढेल. वरिष्ठांकडून कौतुक केले जाईल. बोलतांना सावधगिरी बाळगावी.
 • कन्या:-
  कामात सातत्य राखावे. तुमचा उत्साह ढळू देऊ नका. कसल्याही प्रकारचा उतावीळपणा करु नका. किरकोळ जखमांकडे दुर्लक्ष करू नये. निराशा दुर सारावी.
 • तुळ:-
  अनाठायी चिंता वाढवू नका. एखाद्या कामात जास्त वेळ वाया जाईल. मानापमानाचे प्रसंग येऊ शकतात. कौटुंबिक खर्च वाढू शकतो. व्यापा-यांना चांगला आर्थिक नफा होईल.
 • वृश्र्चिक:-
  चित्त एकाग्र करण्याचा प्रयत्न करावा. चुकीच्या संगतीत अडकू नये. गुरुकृपेचा लाभ घ्यावा. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. खर्चाचे प्रमाण आवरते घ्यावे.
 • धनु:-
  दिवस मनाजोगा व्यतित करता येईल. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. काही कामांत वेगळा विचार आवश्यक आहे. हातापायांची काळजी घ्यावी. काही गोष्टी क्षणिक समाधान देतील.
 • मकर:-
  नवीन मित्र जोडावे. उत्तम स्त्री सौख्य लाभेल. हातातील कामात अपेक्षित यश मिळेल. मानसिक स्वास्थ्य जपावं. व्यायामाला कंटाळा करू नये.
 • कुंभ:-
  तुमच्या अंगीभूत कलेचे कौतुक केले जाईल. व्यापाराचा विस्तार करण्याचा विचार कराल. काही अपवाद सामोरे येतील. मुलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. अडचणीतून मार्ग काढाल.
 • मीन:-
  थोरांचा आशीर्वाद लाभेल. उत्तम संगतीत रमून जाल. ऐषारामाच्या वस्तू खरेदी कराल. दिरंगाईतून मार्ग काढाल. दिवस समाधानात जाईल.– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 1, 2019 1:00 am

Web Title: daily horoscope astrology in marathi friday 01 november 2019 aau 85
Next Stories
1 आजचे राशीभविष्य, गुरुवार, ३१ ऑक्टोबर २०१९
2 आजचे राशीभविष्य, बुधवार, ३० ऑक्टोबर २०१९
3 आजचे राशीभविष्य, मंगळवार, २९ ऑक्टोबर २०१९
Just Now!
X