19 September 2020

News Flash

आजचे राशीभविष्य, शुक्रवार, ०४ सप्टेंबर २०२०

सर्व बारा राशींचे भविष्य

  1. मेष:-
    शांतता अधिक प्रिय असेल. सारासार विचार करूनच कृती करा. संयम सोडून चालणार नाही. मनातील नसत्या चिंता काढून टाकाव्यात. आपल्या आवडत्या देवतेची उपासना करावी.
  2. वृषभ:-
    मनातील इच्छा पूर्ण करून घ्याल. संमिश्र घटनांचा दिवस. हातातील कला सादर करता येईल. कौशल्याच्या जोरावर कामे कराल. कौटुंबिक खर्च वाढू शकतो.
  3. मिथुन:-
    कामाला चांगला वेग येईल. काही क्षुल्लक समस्येतून मार्ग निघेल. अधिकाराचा वापर करण्याची संधी मिळेल. मन प्रसन्न राहील. मित्रांशी वाद घालू नयेत.
  4. कर्क:-
    चिडचिड न करता कामाला गती द्या. छानछोकीसाठी खर्च कराल. व्यापारातून चांगला लाभ होईल. कौटुंबिक जबाबदारी पेलाल. अनावश्यक खर्चाला आळा घालावा लागेल.
  5. सिंह:-
    आत्मविश्वास कायम ठेवावा. अचानक धनलाभ संभवतो. मनाच्या चंचलतेला आवर घाला. वरिष्ठांचे धोरण लक्षात घ्या. वैवाहिक जीवन सुखकर राहील.
  6. कन्या:-
    आपले बोलणे मधाळ ठेवावे. योग्य तर्क लावाल. समोरच्याचा रोख ओळखून वागावे. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. नोकरदार वर्गाला दिलासा मिळेल.
  7. तूळ:-
    स्वत:मध्येच रमण्यात वेळ जाईल. कोणत्याही विषयाचा पूर्ण अभ्यास करूनच उत्तर द्या. तिखट पदार्थ खाणे टाळावे. मौल्यवान वस्तू सांभाळाव्यात. कामातून समाधान मिळेल.
  8. वृश्चिक:-
    पोटाचे आरोग्य सांभाळावे. लोक तुमचा सल्ला ऐकतील. गरजूंना मदत कराल. परोपकाराची संधी मिळेल. संशयी वृत्तीला आळा घाला.
  9. धनू:-
    घेतलेल्या कष्टाचे फळ मिळेल. घरातील लोकांचे सहकार्य मिळेल. विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटतील. कौटुंबिक कामात अधिक वेळ जाईल. संयमाने परिस्थिती हाताळावी.
  10. मकर:-
  11. स्वत:च्याच आनंदात रममाण व्हाल. जवळचा प्रवास कराल. मित्रांची गाठ पडेल. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. भागीदारीत खूश असाल.
  12. कुंभ:-
    जुन्या विचारात गुंतून राहू नका. आवडी बाबत दक्ष राहाल. करमणुकीत वेळ घालवाल. कर्तुत्वाला चांगला वाव मिळेल. मानसिक शांतता जपावी.
  13. मीन:-
    आपला संयम सुटू देऊ नका. घराबाहेर प्रतिष्ठा लाभेल. मुलांकडून शुभ वार्ता मिळतील. नवीन सुरुवात दिलासादायक असेल. जुने मित्र भेटतील.– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2020 12:34 am

Web Title: daily horoscope astrology in marathi friday 04 september 2020 aau 85
Next Stories
1 आजचे राशीभविष्य, गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२०
2 आजचे राशीभविष्य, बुधवार, ०२ सप्टेंबर २०२०
3 आजचे राशीभविष्य, मंगळवार, ०१ सप्टेंबर २०२०
Just Now!
X