News Flash

आजचे राशीभविष्य, शुक्रवार, ०६ डिसेंबर २०१९

सर्व बारा राशींचे भविष्य

 • मेष:-
  मनाची चलबिचलता जाणवेल. उगाचच नसती काळजी लागून राहील. ध्यानधारणेत वेळ व्यतीत करावा. उधारीची कामे टाळावीत. फार विचार करत बसू नये.
 • वृषभ:-
  तुमच्या आकांक्षा पूर्ण होतील. व्यापारी वर्ग खुश राहील. घेतलेल्या कष्टाचे चीज होईल. मैत्री अधिक घट्ट होईल. घरातून चांगले सहकार्य मिळेल.
 • मिथुन:-
  कामाचे योग्य नियोजन करायला हवे. एकावेळी अनेक गोष्टी अंगावर घेऊ नका. आळस बाजूला सारावा. पत्नीचे उत्तम सहकार्य मिळेल. घरगुती कामात लक्ष घालावे.
 • कर्क:-
  कामात प्रगतीला चांगला वाव आहे. सेवावृत्ती जागृत ठेवाल. कामाच्या ठिकाणी कौतुकास पात्र व्हाल. त्यागाचे महत्व जाणून घ्यावे. सर्वाना आपुलकीने जवळ कराल.
 • सिंह:-
  जुगाराची आवड पूर्ण कराल. काही गोष्टींची खिन्नता जाणवेल. सकारात्मक विचारांची जोड घ्यावी. अति विचार करणे टाळावे. जवळच्या प्रवासात काळजी घ्यावी.
 • कन्या:-
  पित्त विकार त्रास देऊ शकतो. जोडीदाराचा समजुतदार दिसेल. भागीदारीत चांगला नफा होईल. तुमचे संपर्क फळाला येतील. दिवस मजेत जाईल.
 • तूळ:-
  रागावर नियंत्रण ठेवावे. हातातील कलेत मन रामवावे. लिखाणाला बळ मिळेल. घाईने निर्णय घेतले जातील. गृहखर्च आटोक्यात ठेवावा.
 • वृश्चिक:-
  सहकाऱ्यांची चांगली मदत होईल. गप्पा मारण्यात वेळ वाया घालवू नका. अडकलेल्या कामात अधिक लक्ष घालावे. चंचलता बाजूला सारावी. ठामपणे निर्णय घ्यावेत.
 • धनु:-
  स्थावरची कामातून फायदा संभवतो. काही कामात अधिक श्रम घ्यावे लागतील. चांगला धनलाभ संभवतो. मौल्यवान वस्तू लाभतील. नातेवाईकांशी सलोखा वाढवावा.
 • मकर:-
  काहीतरी नवीन करण्याची इच्छा मनात रुजेल. वरिष्ठांशी मतभेद संभवतात. काही बदल अचानक घडतील. मित्रांच्या ओळखीने काम होईल. क्षणिक गोष्टींचा आनंद घ्यावा.
 • कुंभ:-
  मानापमानाचे फार अडकू नका. योग्य संधीची वाट पहावी. प्रवासात सावधानता बाळगावी. अधिकाराचा वापर योग्य वेळी करावा. कमिशनकडे लक्ष राहील.
 • मीन:-
  दिवस हवा तसा व्यतीत कराल. जोडीदाराशी मतभेद संभवतात. गैरसमजातून वाद वाढू देऊ नका. तुमच्या प्रेमळपणाची बाजू समजावून द्यावी. चलबिचलता दूर सारावी लागेल.

  – ज्योतिषी विद्याधर करंदीकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 6, 2019 1:00 am

Web Title: daily horoscope astrology in marathi friday 06 december 2019 aau 85
Next Stories
1 आजचे राशीभविष्य, गुरुवार, ०५ डिसेंबर २०१९
2 आजचे राशीभविष्य, बुधवार, ०४ डिसेंबर २०१९
3 आजचे राशीभविष्य, मंगळवार, ०३ डिसेंबर २०१९
Just Now!
X