25 February 2020

News Flash

आजचे राशीभविष्य, शुक्रवार, ०६ सप्टेंबर २०१९

सर्व बारा राशींचे भविष्य

मेष:-
अचानक धनलाभाची शक्यता आहे. काही गोष्टीत कंजूसपणा कराल. जोडीदाराच्या सुस्वभाविपणाची जाणीव होईल. काही गोष्टींचा मोह आवरता आला पाहिजे. छंदात मन रमवावे.
वृषभ:-
सांपत्तिक दर्जा सुधारण्याकडे लक्ष द्याल. कौटुंबिक मतभेद दूर करावेत. काही गोष्टीत हट्टीपणा कराल. घरगुती वातावरण शांत ठेवाल. वाहन चालवितांना काळजी घ्यावी.
मिथुन:-
इतरांच्या मदतीशिवाय कामे करावीत. उत्तम तारतम्यता बाळगावी. आत्मविश्वास वाढीस लागेल. काही बाबीत दृढनिश्चय करावा लागेल. घरात अधिकाराने वागाल.
कर्क:-
काही ठिकाणी उदारता दर्शवाल. खर्चावर लक्ष ठेवावे लागेल. डोळ्यांचे विकार संभवतात. गुंतवणुकीच्या बाबतीत सावधानता बाळगावी लागेल. प्रामाणिकपणे आपले मत दर्शवाल.
सिंह:-
काही ठिकाणी मानीपणा दाखवाल. तुमच्या वागण्यातून आत्मविश्वास दिसून येईल. कणखरपणे निर्णय घेण्यावर भर द्याल. स्वत:चे स्वत्व राखाल. मनापासून मदत कराल.
कन्या:-
काही गोष्टीत प्रतिकूलता जाणवू शकते. स्वत:चा मान जपावा. काही कामे अडकून पडू शकतात. प्रवासात संपूर्ण सतर्कता बाळगावी. फसवणुकीपासून सावधानता बाळगावी.
तूळ:-
आर्थिक अडचण दूर होईल. नोकरदारांना काही लाभ संभवतात. व्यापारीवर्ग खुश असेल. घरगुती कार्यक्रम होतील. मित्रांची मदत मिळेल.
वृश्चिक:-
सामाजिक कार्यात पुढाकार घ्याल. उत्कृष्ट तर्क वापराल. काम करण्याच्या पद्धतीचे कौतुक केले जाईल. व्यावसायिक ठिकाणी कौतुकास पात्र व्हाल. तुमच्यातील दिलदार वृत्ती दिसून येईल.
धनु:-
आर्थिक गणित नव्याने मांडावे. काही कामांमध्ये मन रमणार नाही. धार्मिक कामात मन गुंतवावे. मुलांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे. दानधर्म कराल.
मकर:-
काटकसर करण्याकडे कल राहील. मोठ्या लोकांच्या ओळखी होतील. सज्जन मित्र भेटतील. व्यवहारी दृष्टीकोन ठेवून वागाल. व्यापाऱ्यांना चांगला आर्थिक फायदा संभवतो.
कुंभ:-
व्यावसायिक चिंता मिटेल. तुमच्या बुद्धीमत्तेचे कौतुक केले जाईल. व्यावसायिक अधिकार हातात येतील. कामातील योग्य तंत्र जाणून घ्यावे. थोरांचे आशीर्वाद मिळतील.
मीन:-
दानशूरपणा दाखवाल. तात्विक ज्ञान वापराल. उपासनेत प्रगती कराल. सामाजिक कामात हातभार लावाल. परोपकारी दृष्टीकोन ठेवाल.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

First Published on September 6, 2019 1:00 am

Web Title: daily horoscope astrology in marathi friday 06 september 2019 aau 85
Next Stories
1 आजचे राशीभविष्य, गुरुवार, ०५ सप्टेंबर २०१९
2 आजचे राशीभविष्य, बुधवार, ०४ सप्टेंबर २०१९
3 आजचे राशीभविष्य, मंगळवार, ०३ सप्टेंबर २०१९
Just Now!
X